Wednesday, September 30, 2009

वारी विधानसभेची .. वारी बंडखोरीची ...

मागील काही दिवसा पासून महाराष्ट्रा मध्ये स्वाइन फ्लू ने धुमाकूळ घातला, आमचे लोक घाबरून बिचारे घरातच बसून राहू लागले, तोंडाला रुमाल आणि मनामध्ये धास्ती.. सध्या हि परिस्थिती फारशी सुधारलेली नाही फ़क़्त आमच्या मेडिया वाल्यांनी त्या बातमीला थोडी बगल दिली आहे, कारण स्पष्ट आहे, सध्या महाराष्ट्र मध्ये अजुन एका भयंकर रोगाची लागन झालेली आहे, हा रोग म्हणजे राजकीय बंडखोरी. सर्वच राजकीय पक्ष या रोगाने त्रस्त झालेले आहेत . हा रोग तसा स्वाइन फ्लू पेक्षा हि महा भयानक.. या आमच्या महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात चाललेल्या या रोगाचा धसका सर्वच पक्षांनी घेतला आहे, सर्वच प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. या सर्व गोंधळा मध्ये आम्ही मात्र पुन्हा घाबरून आप आपल्या घरातच बसून आहोत.. बाहेर चाललेला गोंधळ आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत.

वर्ष नु वर्षे फ़क़्त सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याचा अखेर सय्यम तुटला ... "पक्ष बिक्ष गेला खड्ड्यात" असेच मानणार्यांची संख्या आता वाढली आहे, "अभी नही तो कभी नही " या उक्ती प्रमाणे सर्वच उम्मेद्वार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या मांडवात उभे आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणा मध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे, महाराष्ट्रा सारख्या राजकीय, सामाजिक तथा आर्थिक रित्या पुढारलेल्या आणि प्रगल्भ अशा राज्याच्या राजकारणाला लागलेले हे वळण नक्कीच येणाऱ्या एका धोक्याची पूर्व सूचनाच आहे.

या महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला सांगतो कि इथे बरेचसे पक्ष मग ते राष्ट्रीय असो व क्षेत्रीय त्यांची ओळख हि काही ठराविक व्यक्तींमुळेच या महाराष्ट्राला झाली, मग ते यशवंतराव चव्हाण असो वसंतदादा पाटील किंवा यशवंतराव नाईक असो, किंवा आजच्या काळातले शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे असो, ह्या लोकांची सामाजिक व राजकीय उंची हि नेहमीच येथील पक्षांच्या उंची पेक्षा जास्त राहिलेली आहे. ह्या लोकांनी केलेले कष्ट, त्यांची इमानदारी आणि त्यांची ती धमक या सर्व कारणामुळे आमच्या महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना पक्षा पेक्षा नेहमी मानाचे स्थान दिले.

पण याच महाराष्ट्रात आज .. काल पर्वाचे स्वयंघोषित .. सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, कार्य सम्राट तथा स्वाभिमानी नेते जन्मास येऊ लागले आहेत. निवडणुकीचे बिगुल वाजताच हे सर्व सम्राट सर्व शक्तीनिशी आप आपल्या आखाड्यात उतरण्याची तयारी करू लागतात. काही लोक पैसा .. दबाव .. आणि इतर बरेच काहींचा वापर करून आपले तिकीट मिळवण्यात यशस्वी होतात .. मग आमच्या याच वर्षानु वर्षे मागासलेल्या जिल्ह्यातील उरलेले २ ३ विकास पुरुष ज्यांना तिकीट नही भेटले ते त्यांच्या विरुद्ध दंड थोपटतात.

या सर्व प्रक्रिये मध्ये ज्याच्या साठी हे सर्व खेळ चालू असतो तो आमचा मतदार राजा मात्र कुठे तरी एका कोपर्यात चोर सारखा उभा आसतो आणि सर्व काही आपल्या या उघड्या डोळ्यांनी बघत असतो.

महाराष्ट्राच्या प्रश्नावर वेळोवेळी ज्यांनी आवाज उठवला आणि पक्षांनी त्यांच्या वर नेहमीच अन्याय केला त्यांच्या बद्दल नक्कीच मी बोलत नाहीये .. कारण ते लोक पक्षीय राजकारणाच्या नेहमीच वरचढ ठरले आहेत.

पण ४-५ वर्षे एका पक्षाच्या नावाने रोज रोज भाषण ठोकायची आणि प्रसंगी तिकीट नाही मिळाले तर त्याच पक्षाच्या विरोधात बोंब ठोकायची .. काल पर्यंत जे आदर्श होते, प्रेरणास्थान होते तेच नेते आज या लोकांना शत्रू वाटतात, अन्याय करणारे वाटतात.. खर तर या बंडखोरांना जनतेशी काहीच देणे घेणे नसते.. आपल्या हातातील सत्ता जात असलेली पाहून हे लोक आपला सर्वस्व पणाला लावतात.. आणि मग गेली अनेक वर्षे असलेली सत्तेची नशा.. जनतेचा नाश केल्याशिवाय राहत नाही.

खर तर सामन्यांचा नेता हा सामान्यच असला पाहिजे, पण आमच्या इथे सगळाच काही आलबेल दिसतंय .. आमचे अपक्ष उम्मेद्वार कोटींच्या घरामध्ये त्यांची मालमत्ता दाखवतात.. वर्षानु वर्षे आपल्याच घरात सत्तेची सारी पदे उपभोगतात.. मग आशा लोकांच्या दबावाखाली येऊन आमचे राजकीय पक्षा एक तर त्यांना उम्मेदावारी देतात नाही तर पुढील काही राजकीय सेटिंग केली जाते आणि त्यांना भरपूर मलई भेटणाऱ्या ठिकाणी त्यांना वसवले जाते.

ह्या राजकीय सत्ता प्राप्तीच्या वारी मध्ये आमचे हे राजकीय पुढारी म्हणजेच आमचे राजकीय वारकरी आपल्या वेग वेगळ्या दिंड्या पताके घेऊन निघालेले असतात .. आणि आमचा मतदार राजा पांडुरंगा सारखा आपल्या कमरेवर आपले दोन्ही हाथ ठेवून त्यांच्या कडे बघत असतो .. त्याला अजून हि आशा आहे कि माझ्या ह्या पंढरी मध्ये माझा सामान्य शेतकरी ..कष्टकरी .. सुखाने दोन घास खाईल आणि आनंदाने जगेल .. पण पांडुरंगा कधी तुझी ह्या बडव्यांच्या घेरावातून मुक्तता होणार आणि कधी तुला याची देही याची डोळा साक्षात पंढरी अवतरलेली दिसणार???

सध्या तरी .. दिंडी चालली चालली ... सत्तेच्या भक्षणाला... !!!

जय महाराष्ट्र
अमोल सुरोशे

1 comment:

Mayur Chitnis said...

Very true amol....

If it will not be stopped. Maharashtra assembly will be in hang stage all the time ...

I appeal to all, refraime youself from votting rebels.
Jai Maharashtra

Post a Comment