Wednesday, September 9, 2009

आमची माती आणि आमचेच माणसं...

आमची माती आणि आमचेच माणसं...

या एका वाक्यात कित्ती मर्म आहे .. महाराष्ट्राची अवस्था सांगायची झाल्यास .. हे एकच वाक्य पुरेसा आहे.. कि आमच्याच माणसांनी आमची माती केली.. !

माफ करा.. पण खरच परिस्थितीच तशी बोलकी आहे.

जो स्वाभिमानी महाराष्ट्र आम्ही दिल्लीश्वरांनाही खाली झुकवून घेतला .. ज्या महाराष्ट्राचे उज्वल भवितव्या ची स्वप्ने आमच्या बाप लोकांनी पहिले होते .. त्या महाराष्ट्राची आज दशा आणि दिशा या दोन्ही हरपल्या सारख्या वाटत आहेत. हा महाराष्ट्र गेली शतकानु शतके उभा आहे तो इथल्या ग्रामीण संस्कृतीच्या जोरावर.. इथल्या कष्टकरी आणि इमानदार सामान्य माणसाच्या जोरावर, याच महाराष्ट्राने सबंध देशा समोर अनेक वेळा उत्कट राष्ट्रप्रेमाचे उदाहरण दिले आहे.

पण आज परिस्थिती बघता खरच मन खिन्न होते, आज जर आपण गंभीरपणे विचार केला तर आपल्याला दिसून येईल कि आज आमच्या राज्यामध्ये एकीकडे खेडी भकास पडत आहेत .. ग्रामीण भागात रोजगार नाही.. धंदे नाहीत .. पुरेशा सोयी सुविधा नाहीत म्हणून लोक वरचेवर शहरांकडे विस्थापित होत आहेत, आणि दुसरीकडे आमची शहरे अपूऱ्या साधन संपतीमुळे, अपूऱ्या नियोजनामुळे एखाद्या भयानक साथीच्या रोगा सारखी विचित्र पणे वाढत आहेत .

मला या सर्व गोष्टींचे नवल या साठी वाटते कि स्वातंत्र्य काळातील सुरुवातीच्या पुढार्यांनी एक खूप सुंदर महाराष्ट्राचे स्वप्न पहिले होते, आज त्यांचे तथाकथित वारस कोणत्या न कोणत्या मार्गे आपली सत्ता कायम राखून आहेत. मग कुठे गेली त्यांची स्वप्ने, आणि गेली ६० वर्षे आम्ही का अजून हि पाणी, वीज, रास्ते याच विषयांवर निवडणुका लढत आहोत.

आज आमच्या महाराष्ट्र कडे काय नाहीये .. सर्वात जास्त धरणे महाराष्ट्र मध्ये असताना आमच्या इथे फ़क़्त ५ टक्के जमीन हि ओलिताखाली आलेली आहे.. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दिवसोंदिवस गंभीर होत चालाल आहे, एकीकडे मुंबई - पुण्या सारख्या शहरामध्ये रोषणाई चा भरमसाट उपयोग होतो आणि एकीकडे आमच्या ग्रामीण भागामध्ये २० २० तास लाईट नसते.

आमच्या ग्रामीण भागामध्ये आज शिक्षण सुद्धा आम्ही नीट नाही पोहोचू शकलो , बसायला साधे बाकडे नाही आहेत , शिकवायला शिक्षक नाहीये , स्वच्छता गृह नाहीये, न हि त्यांना एक पूर्ण शिक्षण देण्यासाठी तेवढा कुशल कर्मचारी वर्ग तिथे आहे.. मग कशा प्रकारे हे उद्या बाहेर पडून या जीवघेण्या स्पर्धे मध्ये टिकणार. तज्ञ शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शनच नाही भेटले तर ते तरी कसे घडणार.

आज १०० कोटींच्या या देशात आम्हाला अनेक खेळाडू, वैज्ञानिक, शिक्षक, साहित्यिक तथा विचारवंत भेटू शकतील पण त्यांना पुरेशा संधी मिळाली तर. हे सर्व कौशल्य आपल्या महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर सापडले जाते पण शासन त्यांच्या साठी काहीच करत नाही..

मी स्वतः कित्येक ठिकाणी ग्रामीण भागात आपल्यालाही हेवा वाटावा अशा हुशारीची मुले बघितली आहेत , पण संधी आणि मार्गदर्शनाच्या अभावी ते लोक तिथेच खितपत पडतात.

हे सर्व बदलण्या साठी आपल्याला नवीन विचारांची कास धरावी लागणार आहे, शुद्ध चारित्र्याची तथा आधुनिक महाराष्ट्राची स्वप्ने पाहणारे लोक प्रतिनिधी आपल्याला पुढे पाठवावे लागतील. आमचा प्रतिनिधी हा अम्च्यातूनच निर्माण झालेला हवा, आयत्या मिळालेल्या प्रतिष्ठे च्या जोरावर अजून कित्येक वर्ष आपण त्याच त्या निष्क्रिय नेत्यांना वर पाठवणार आणि वर्ष नु वर्षे फ़क़्त महाराष्ट्राच्या समस्यांवरच चर्चा करणार,

आम्हाला हा महाराष्ट्र घडवणारे लोक हवे आहेत, त्यांना शोधा, त्यांना साथ द्या , त्यांच्या लढाई मध्ये आपला हि आवाज सामील होऊ द्या .. त्याला एकाकी पडण्यासाठी प्रस्थापित सर्वोपतरी प्रयत्न करणारच .. पण या लोकशाही मध्ये जो खरा राजा आहे .. त्याने ह्या सर्वां विरुद्ध आपले सर्वात मोठे मतदानाचे हत्यार आता उगरायालाच पाहिजे ... आमच्या सर्व महाराष्ट्रातील मतदारांनी न चुकता या वेळेस आपले मतदान केलाच पाहिजे.

मला खात्री आहे .. भावनिक विषयांवर गेली कित्येक वर्षे आपण नुसते घरात बसून चर्चा केली .. आता आपण बाहेर पडू .. एक बदल घडवायला. ते आपले कर्तव्यच आहे .

सध्या साठी जय महाराष्ट्र ...... पुन्हा भेटू
अमोल सुरोशे

2 comments:

Anonymous said...

Amol'rao manala bar ka ! tumahala ! Tumachyasarkhi lok ahet mhanun tar Lokshahi thodifar Jiwant ahe ! Dhanywad ! Raju Shetti ha evadha mothha vishay ahe ki tyavar P.hd. karata yeil.

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

dhanyawad, Lokshahi hi aaplyamulech banadte.. ti aaplya madhe jivant thevane hi kalachi garaj aahe...

tumche nav nahi kalale..

Anyways .. keep reading.

Post a Comment