Tuesday, August 25, 2009

गोष्ट छोटी डोंगरा एवढी [http://mukhyamantri.blogspot.com/]

कालच "गोष्ट छोटी डोंगरा एवढी" हा मराठी चित्रपट पाहीला. तस आम्हाला मराठीचा आणि तिच्या संवर्धना साठी झटनार्यांचा फार अभिमान. पण नुसत्या पोकळ गप्पा न मारता कुणी काही करून दाखवलं तर आम्हाला अधिक आनंद होईल. आणि तोच हा मुव्ही पाहिल्यावर झाला. निळू फुले, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे , नागेश भोसले आणि अनेक पट्टीच्या कलाकारांनी केलेली हि एक अप्रतिम कलाकृती आहे.
त्यासोबतच आम्हाला जे भावले, ते म्हणजे विषय आणि त्याची तंतोतंत हाताळणी. अहो शेतकऱ्याच्या प्रश्नाला असा हात घातलाय जसा बरोबर अर्जुनाने पक्षाचा डोळा नेमावा [उदा: निळू फुलेंचा एक डायालोग: "अहो, मरण्याचे शेतकऱ्याला एक लाख देता, जगण्याचे पंधरा-वीस हजार तरी द्या"]. एकंदर चित्रपट एकदाच नव्हे तर अभ्यास म्हणून अनेकदा पाहण्यासारखा आहे. अभिनय करताना कलाकाराच्या तर डोळ्यात पाणी येतेच पण बघानाराच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणल्याशिवाय कलाकार राहत नाहीत. मी सर्वाना कळकळीची विनंती करतो कि आपण फुटकळ मुव्ही बघतो, अहो कधी कधी तर भंकस पानाचा कयास करणारे मुव्ही सुद्धा बघतो, तेंव्हा या कृषिप्रधान देशातील नागरीकानो हा मुव्ही तर खूप चांगला आहे, नक्की पहा. शेतकऱ्याचे प्रश्न समजून घ्या, ते तुमच्याशी कशे निगडीत आहेत ते हि समजून घ्या. शेवटी तुम्हाला आम्हाला पोसणारा उपाशी राहिला आणि पटा पटा आत्महत्या करायला लागला तर.......? तुम्हीच विचार करा काय होईल! अहो, निराश होऊन तो शहरात येईल, कारखान्यात काम करेल, तिथे हि तो चटणी भाकरच खात होता आणि इथे हि तेच खाईल. त्याला काही फरक पडणार नाही, पण आपल्यासारख्यांचे काय ......? आपण उपाशी मरू! त्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय उरणार नाही.[घेताय ना आजच महागाची डाळ विकत; बघा एक दिवस दाना सुद्धा मिळणार नाही!]

मुंबईमध्ये मुव्हीचा चांगला व्यवसाय होतो, मग काही भंकस हिंदी मुव्ही सुधा पोटापाण्यापूरत कमावतात. अहो विनोदी मराठी मुव्ही असतील तर ते हि धक्के खात चालतात, पण चालतात. एकंदर काय तर टाइम पास होणार असेल तर आम्हाला काहीही चालेल."पण आता आमचेच प्रश्न कमी आहेत का की आम्ही ते शेतकऱ्यांचे प्रश्न बघायला जाउत", हा विचार ही काही बहादूर करणार असतील त्यांना आमचा सलाम! [जा XXXकात]. आम्ही काल मुव्ही ला गेलो तर तिथे सगळे मिळून लोक ४! मुंबईत बरेच मराठी लोक आहेत हे राज ठाकरेंच्या कर्तुत्वाने कळले; पण असा शेतकऱ्याच्या प्रश्नावर हा मुव्ही आला आणि सगळे कुठे गायब झाले कि अन् काय कि? मला एक घटना आठवते, गांधीजीकडे आफ्रिकेत काही भारतीय आले आणि ते म्हणत होते आमच्यावर अन्याय होतो आहे, आमच्याशी विषम व्यवहार होतोय कारण आम्ही भारतीय आहोत. आणि तिथेच हे जमलेले भारतीय आपल्या वर्णा नुसार वेग-वेगळे बसले होते. तेंव्हा गांधीजीने त्यांना ठणकावले होत कि आधी आपले भेदाभेत कमी करा! तसच मला वाटते आज जेंव्हा आपण मराठीचा, मराठी माणसाचा प्रश्न उभा करतो तेंव्हा मग आम्हाला फक्त मुंबई आणि इतर काही शहरातील मराठीच दिसतात! काय तर म्हणे आमच्याशी विषम व्यवहार होतोय. हाच विषम व्यवहार काही प्रमाणात याच काही शहरात असपृश्या मानल्या जाणार्या शेतकऱ्यांशी होतो, त्यांचे प्रश्न ऐकायालाच नाही, तर त्यांच्याकडे ढुंकून हि बघायला कुणी तयार नाही. हा आमचा राग असेल कदाचित, आम्ही चुकलो हि असू; पण जे दिसला त्यांन मन हेलावलं; नव्हे हलच!

एकून आमच्या मनाची स्थिती फार विक्षिप्त झालेली आहे. एक तर ते प्रश्न पाहून मन हळहळत आणि त्या प्रश्नांपायी असलेली आपली उदासीनता पाहून मग जखमी होते. अहो आम्ही छोट्यामोठ्या रोगावर [...तारे xyx पर ..... {मी ते बघू नका असा म्हणत नाही}, प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे आणि ते हि स्वाभिमानाने, पण मग हाडामासाच्या सुदृढ शेतकर्यालाच का नाही?], छोट्या छोट्या प्रश्नावर निघालेले मुव्ही किती छान आहेत, अभिनय कसा अप्रतिम केलं अस म्हणतो आम्ही, आणि कुणाच्या जीवन मरणाशी निगडीत गोष्टी " ह्या, ती भंकस कुणी झेलावी तीन तास!" असा म्हणून दुर्लक्षित करतो. धन्य आम्ही!

हा मुव्ही अगदी वेगळा आहे, शासन व्यवस्थेवर, त्याच्या चुकावर बरोबर बोट ठेवणारा आहे. माणूस म्हणून शेतकऱ्याच असतीत्व मान्य करा हे अगदी ठासून सांगणारा आहे. आमची गाडी जागतिकीकरणात अगदी वेगाने धावत आहे, पण धावण्यात मागे किती धूर निघतोय हे पहायचं कदाचित आमचे ड्रायव्हर विसरलेत अस वाटत. अहो कुत्र्या-मांजरांच्या प्रश्नावर ही आंदोलन करणारे आम्ही, त्यांच्या प्रश्नांना देशाचा प्रश्न करणारे आम्ही, माणसाचं माणूस म्हणून जगणं जो पर्यंत मान्यकरत नाहीत, समाजाच्या आणि सामाजिक रित्या अक्षम गटाच कल्याण आम्ही चिंतीत नाही, तोपर्यंत आम्हाला भारत महासत्ता बनण्याच्या फुटकळ गप्पा मारण्याची शरमच वाटावी!

ज्यांना हा धूर बघायचा असेल, शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे नेमकं काय करतो? तो ती का करतो? आणि मग त्यानंतर त्याच्याशी आणि मागे राहिलेल्यांशी काय होत? याची माणूस म्हणून थोडी जरी जाणीव करून घ्यायची असेल तर "गोष्ट छोटी डोंगरा एवढी" नक्की बघावा!

[भावनेच्या भारत माझ्याकडून कुणी दुखावलं गेलं असेल तर, क्षमा करावी!]

या विषयावर इतर काही: http://www.pbs.org/wnet/wideangle/episodes/the-dying-fields/video-full-episode/1952/

प्रकाश पिंपळे-पाटील .

Creative Commons License
Blog by Amol Suroshe is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

10 comments:

Unknown said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

Aaho,

Swatala "Janata Raaja" mhanavun ghenarech ahet na Krushi mantri geli anek varshe...
Tyanna vichara ki hya prashna baddal. Dusrya konala sheti madhla kalat nahi asa he mhantat na..
Tyanna tari kalata ka ? Ka kalun suddha kahi karat nahit...

Aho hech tar mukhya nadnare ahet shetkarayala...
Kadhi lokanna kalnar kai mahit...

प्रकाश बा. पिंपळे said...

ho kharay saheb tumcha! ha prashna fakt sharad pawaranach nahi ani kah geli 60 warshe sheti fakt sharad pawarch baghat ahet he hi nahi! tya mule pratek rajkarani ani shsakiya adhi kari yani ya gostikade lakasha dyal have.
kadachit tumche mhane amhal kalale nasel. aso thoda spashta bolale aste tar bare zale aste!

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

kharach Mandar .. whatever u r saying is correct .. But this is not the solution to blame on somebody specifically ..

Its a problem of wrong policies n their implementation.

What sharad pawar is saying .. ki sheti madhala kahi kalat nahi vaigere or konala te kalate is not important .. tyane shetkaryanche problem solve nahi honar .. we just want to make you feel sensitive on this issue n make you aware about the problems of our farmers ..

hope if you have any good comments n solution regarding their problem .. we would like to welcome it.

keep reading ..

bye

प्रकाश बा. पिंपळे said...

are re re! asa hoy .... raj sahebanbaddal tar bolat nahi ahat na tumhi! ghya hach ghol ghalto marathi manus. aho raj sahebanbaddal amhala khup adar ahe. tyanchya vision che amhi chahate ahot. Pan tumhi ya post madhlya kahi vakyancha uchit artha kadhalela nahi ase watte.Aho tya kahi wakyancha artha asa nahi ki Marathicha prashna uthau naye. Nakki uthava, Raj saheb akhand maharashtra tumchya pathishi ahe!Ata rajsahebacnhya ya karyala samarthan karnarya [kahi]marathi mansana maze he vicharne ahe, aho itka changal marathi chitrapat ka nahi chalat ho [kadachit to chalat nahi ha maz gair samaj hi asu shakto pan mi jenva pahila tenva tar kucih navte ani theater wal hi tech mhnatal ki Movie chnagal ahe ho pan lok nahit]...? ani ka kaminela gardi hote... ti hi Kanat balya ghatalelya ardha marathi ani ardha hindi bolnarya MARATHI mansanchi! Jo paryant maharashtrachya PRATEK prashnavar sagal rajya eksandh hot nahi to paryant na amcha marathi manasancha prashna sutnar ahe na shetkaryacha. sehvati sattet yenyasathi saglya rajytun pthimba milvava lagto! Ani krupaya, mi Raj sahebanbaddal kahi bolalo kinva tyna Rajkaran shikavanyacha pratyan kelay asa kunal vatat asel tar te CHUk ahe. Mazi titki vaicharik baithak hi nahi ani khara pahava tar tyanchay uddat hetula maza sadaiva pathimbach ahe. Mala thoda far rag ahe to kanat balyaghalun RAJ Thakare jindabad mhnaun, ardha Hindi ani ardha marathi bolun, hindi chitraptaNACH gardi karnyarya swayamghoshit marathi mansancha!
Jai Maharashtra!

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

खरोखरच .. शेतकऱ्यांची परीस्थ्तीचे एकदम वास्तविक चित्रण या चित्रपट मध्ये बघायला मिळते ..

मी जेंव्हा हा चित्रपट पहिला .. खरच सांगतो मनाची विचित्र अवस्था झाली होती... डोळ्यासमोर भयाण गावाचे चित्रच उभे राहिले .. प्रत्यक्ष डोळ्याने पहिले आणि अनुभवलेले क्षण आहेत ते .. मना मध्ये प्रचंड राग होता .. राग होता सरकारी अनास्थे चा .. चुकीच्या योजनाचा .. शेतकऱ्याला मिळणाऱ्या वागणुकीचा .. आणि राग होता आपल्या सारख्या स्वतः ला उच्च शिक्षित म्हणवून घेणार्यांचा .. राग होता स्वतः चा .

चित्रपट पाहताना डोळे खाडकन उघडले .. माझ्या देशात मला अन्न खाऊ घालानार्यचे चाललेले हाल पाहून मी पुरता थंडच झालो .. कारण स्वातंत्र्याच्या साठ वर्ष नंतर देखील आम्ही आमच्या या कृषी प्रधान देशामध्ये ७० टक्क्याहूनही जास्त लोक जिथे राहतात त्यांना काहीच देऊ शकलो नाही .. शेतकरी.. कष्टकरी .. कामगार.. ह्यांचा न भूतकाळ होता नाही वर्तमान काळ आहे नाही त्यांच्या समोर काही भविष्य काळ आहे ..

मग आपण काय करत आहोत .. मी नाही म्हणत कि लगेच काही होईल पण आपल्याने .. पण काही करण्या आधी .. आपण काही समस्या या जाणून घेतल्याच पाहिजेत .. कारण आपण उच्च शिक्षित आहोत.

आपल्याच मस्तका मध्ये जर हे प्रश्नच आले नाहीत तर या प्रश्नांची उत्तरे तरी कसे येतील .. ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न .. त्यांना स्वतंत्र भारता मध्ये असणारे स्थान ह्याचा आता विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे ...

आपल्या पैकी बरेच जन हे ग्रामीण भागातून आलेले आहेत .. आणि बर्याच लोकांनी ग्रामीण जीवन पहिले देखील आहे..

त्यांच्या काय समस्या आहेत .. त्या जाणून घेणे .. आणि त्या साठी आपण सर्वोपातरी मदत करणे .. हे आपले कर्तव्यच आहे .. कारण आपण खाल्लेल्या मिठाला जगणारी मानसं आहोत .. आपण आपल्या आन्नादात्याला असा मारू देणार नाहीत ..

प्रोब्लेम्स समजून घ्या ... त्यांचे प्रोब्लेम्स योग्य ठिकाणी मांडा, त्या प्रोब्लेम्स ला काही तरी उत्तर शोधा.. आपण शिक्षण घेतलाय .. आपल्याला संस्कारांची देन आहे .. एकत्र येऊया .. आणि काही तरी करूया ..

या आधी तुम्ही सर्व जगाला दिसणाऱ्या समस्यांकडे डोळेझाक करू नका .. उद्या याच समस्या खूप मोठा रूप घेण्या अगोदरच आपण काही तरी करणे हेच योग्य ठरेल..

नाही तर हाच शेतकरी उद्या नक्षलवादी बनेल .. त्या शिवाय त्याचा आवाज कोणी हि ऐकणार नाही .. पक्ष .. संघटना .. जात .. धर्म ह्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे शोधण्याचे काम आपला आहे ..

त्यांचे प्रश्न खूप साधे आणि सोपे आहेत ... फ़क़्त या प्रश्नाची जाणीव आज आपल्या समाजाला राहिली नाही म्हणून तो एकाकी पडला आहे ... आपल्यातला हा संवेदनाशुन्य स्वभाव आपल्याला झटकून टाकायला हवा .. साध्या साध्या गोष्टीवर आम्ही चर्चेचा महापूर निर्माण करणारे .. मग या प्रःनावर आम्ही गप्प कसे.. ???

एकीकडे महासत्ता होण्याची स्वप्ना पहायची पण सत्य परिस्थिती खूप भयाण आहे .. त्याच्या कडे मुद्दाम डोळेझाक करायची .. हे एक दिवस सर्वांनाच महाग पडणार आहे..

काही तरी करण्याची उमेद आपणा सर्वांमध्ये आहेत .. हे आपण आधी पण पहिले आहे .. म्हणूनच म्हणतो आपणच शांत पाने विचार करायला हवा ,.. कि आता काय केले जाऊ शकते ..

सर्वात आधी हा चित्रपट ज्यांनी पहिला नाही त्यांनी तो जाऊन पाहावा.. म्हणजे तुमचे मनच तुम्हाला मग काही प्रश्न विचारेल .. त्याची उत्तरे तुम्हीच शोधा.. आणि बोला ..

प्रकाश बा. पिंपळे said...

काही मते ई- मैल द्वारे कळाली आहेत ती हि येथे देत आहोत! संदर्भा साठी:


मित्राणो ,

कुणाच्या सांगण्यान जर का प्रश्न सुटले आसते तर मग आशी वेळ आलीच नसती. तरी पण राहावत नाही म्हणून सांगतो...रविवार मी आणि सुधाकर गेलो होतो "गोस्ट छोटी डोंगरा एवढी" हा चित्रपट पाहायला. प्रामाणिक पणे सांगेन 'श्याम वाढेकर' एक शेतकरयचा मुलगा आहे म्हणून त्या वेदना , ते द्रष् पाहून माझे मन हळवळले यात नवल नाही कारण आम्ही ते सार आजु बाजूला पाहतो, एकतो. पण खरच मनातून सांगतो महाराष्ट्रात शेतकरी त्याच अवस्थेत आहेत. ते जे काही दाखवलाय ते सर्व अक्षरशहा खर आहे. माणूस जीवन भर मेहनत करतो जे मजेत जगण्या साठी. 100 व्या वर्षी देखील म्हातार्याला वाटते आणखी थोडा जगाव ...मग विचार करा शेतकरी तरुण वयात मरण पत्करायला तयार होतो ती काय अवस्था आसेल ? एक अन एक मुद्दा खरा आहे... शेत मालाला योग्य भाव नाही , भरपूर सुविधा-योजना आसूनही तीत पर्यंत पोहचत नाही , दुकानात खत आसूनही वाटले जात नाहीत , त्याचेच शेत मालाचे पैसे त्याला मिळवे म्हणून भीक मागाल्यागत ते साले फडतूस आधिकारी त्याला 100 फेटे मारायला लावतात , प्रतेक जागी पैसे खाउ घालायचे नाही तर काही ना काही नियम लाउन त्याचे काम रोखायचे... भडवे गिरी चालू आहे दुसरे काय !! आन देवाही त्यात भरच घालतो...!!!

तुमच्या पैकी किती जन त्या शनिवार रविवार "कमिने" नाही तर आणखी कोणता दुसरा मूवी पाहायला गेले होते ... पिझा/बुर्गर्वर किती सोडले ?
जाउ द्या तुम्ही कमावता , काय करायचे ते तुम्ही प्रतेकाने ठरवावे. फक्त माझा एकच प्रश्न "तुम्ही का गेला नाही तो चित्रपट पाहायला" ? मला पटण्याजोगे कारण आसेल तरच उत्तर द्या ...नाही तर बोलण्याची काही एक गरज नाही. थंड च बसा !!

बोलायला मी खूप बोलू शकतो..पण यासाठी आज लिहीत नाहीए......मी येताना सुधाकरला एक गोस्ट म्हणालो "ज्यानी चित्रपट् पहिला नाही त्याना शेतकरी कळ्नार नाही. पण ज्यानी पहिला ..त्याना कळला..तरीही त्यानी काही केले नाही तर त्या दोघात काहीच फरक नाही !! " तुम्ही माना वा नको पण हेच खर आहे. हेही सांगतो प्रश्न खूप मोठा आहे..आपण खूप लहान...सगळा सुटणार तर नाहीच पण एका चांगल्या विचारसरणी ची सुरूवात मात्र आपण नक्की करू शकतो. माझ्या आनुभवातून सांगतो कोणताही काम आधी खूप अवघड वाटते , पण एकदा का सुरूवात झाली की मग सर्व काही आपोआप सोप होते....मग आपण करायची का सुरूवात ????

- श्याम वाढेकर,


I again repeat "its not so easy to work on such issue". By collecting Rs. 500-1000 such thing can be driven... we have to think at highest point...surely it would require dare to pitch in !!

========================================

प्रकाश बा. पिंपळे said...

काही मते ई- मैल द्वारे कळाली आहेत ती हि येथे देत आहोत! संदर्भा साठी:

Shyam and All,

Haan gosht tar hi khari aahe , ki aapan yeka khedegawatun aaloy, Shetakaryachya ghari jalmala aaloy , mhanun aaplyala ha movie manala bhavla ,

Je ithale loka aahet tyana watel ki ke jarasa kalpanik aahe pan te aaplyala nahi watatat hyacha Karan yekach aahe mitraho, he je kahi dakhawalay, tyatali yek na yek goshta khari aahe , yek na yek wakya khara aahe , he mi prateksha practically face kelay, face karatana pahilay.

Hushyar aasunahi shiku shakat nasalele mula mi pahilet, loka majabur houn aabhiman visarun talukyala jayayla Rs 20 magtat, majabur houn udari magatat,
mi pahilay check aalyawarchi paristithi, mi pahilay khata aalyawarchi paristithi , Savkara kasa pilato lokana, savkara cha karja pidhya n pidhya kashya prakare wadhat jata, savkarakade mangalsutra thevne aani dusryanche ghalun pahunyakade jane , bankechi Gharawar nilami yene............................. Even mitraho mi majhya gawat vish piun melele aatmahatya kelele aani kartana pahilela aahe . Inshort aapan he je kahi aahe te pahilela aahe te aaj jagasamor director ne jashi chya tashi mandala aahe mhanun he aaplya manala bhavla aahe.

Mitraho,

konatihi gosht lahan wa mothi nasate, haaan mi 2 Years aadhi pan hech mhanat ( mi je 2 years pasun aadhi bolat hoto exact tech movie madhe aahe , Mayur u can see all my words in that movie) hoto ki kahi tari suruwat kara, nusata fukat bolat basanya pekshya chotich activity ka hoina suru kara, aani mala aaplya saglyancha aabhiman aahe ki aapan kahitari kartoy , kamala suruwat tari kelay, samor houn karanare jari Mi, Sudh, Shyam, Amol, Mayur aaslo tari Indirectly khup loka hya Punnyachya kamat Involve aahet tya sarwancha mala Abhiman aahe.

Bus mala yevdhach mhanaycha aahe ki, aaj Movie baghitla 1 mahina tyawar discuss karat basun na rahata Shyam Mhatlya pramane kahitari karayla pahije waa asa hi mhanen ki je kartoy tyala continue karayla pahije.

( Mitraho Kalach mala 2 mitrancha phone aale , te doghancha pan hech bolana hota ki , " Mala majhya Wadilancha abhiman aahe aahe ki te mala yek Shetmajur ( not shetkari also) aasun mala shikawale, aani tujhya bolnya warun mala mi khedyatla aasnyacha pan Abhiman watat aahe , tell me what can I do .......... " --- tyatla yekta aahe Jarmani la aani one is in IIM , Inshort aamhi shetkaryache mula kuthaparyant pan jhep gheu shakato ....... aadacha aahe te fakta............. )

Chala tar mag ti aadach kashi dur karawi tyacha vichyar karu.

Thanks and regards,
Sudhakar Patil

प्रकाश बा. पिंपळे said...

आपणा सगळ्यांचे हे विचार ऐकून खूप आनंद झाला. प्रत्येकाच्या मनात चीड आहे आणि खूप काही करण्याची दृढ इच्छाशक्ती सुद्धा आहे. आता आपण काही तरी करायचे म्हणजे नेमक काय करायचे हे ठरवायला हवे आणि तेच सुदर्शन रावांच्या ई-मैल मधून बर्यापैकी स्पष्ट झालय. आपण रूट लेवेल ला काम करू शकतो पण नेमका काय तर "जागृती"! अमोलराजे ही तेच म्हणतात; आपण त्यांना हजार पाचशे देऊन नाही मदत करू शकणार, त्यांना आपण द्याला हवा प्रकाशाचा स्त्रोत जो आपण आणि आपल्या सारखे सोबत नसताना ही ते या अंधकारातून बाहेर येण्या साठी वापरतील. म्हणजे शासकीय योजन त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीत याच कारण ही मधली हरामी नौकरशाही. आता ती सामान्य [शिक्षित/अशिक्षित] शेतकर्याची पिळवणूक का करते तर, शेकार्याना त्यांचे हक्कच नीट माहित नाहीत; बर माहित असले तरी त्याचा नीट उपयोग कसा करायचा हे माहित नसते आणि फक्त याच कारणमुळे त्यांना त्यांची हक्काची घर घेण्यासाठी १०-१२ हजार मोजावे लागतात, सातबारावर स्टंप जरी मरायचा तरी ५ रुपये मोजावे लागतात.
मग अशा भ्रष्टाचाराला दाद कुठे मागायची आणि कोण ऐकणार या भीतीने मग तो अशे ५, मग ५०.... ५००० अशा चीर्यामिर्या द्याला लागतो आणि आज मग ती एक संस्कृती झाली आहे, म्हणा ना कर्मकांड; कारण मग आपण ही लालचावतो खोटी कामा करून घ्याला. आणि मग त्यात मारतो तो ती पाच रुपयांची ची ही चिरी मिरी ना देऊ शकणारा गरीब शेतकरी आणि कष्टकरी. काही दिवसांपूर्वी लोकमतला एक लेख आलता, ज्यात काही आदिवासी युकांच्या मुलाखती आल्या. त्यांना विचारल की ६० वर्षात तुम्हाला काय मिळाल ? तर ते म्हणाले आपण [एक सामान्य आदिवासी युवक] ही जिल्हाधिकार्याला धडक जाऊन बोलू शकतो ही ताकद आम्हाला कळली. त्या युवाकंनी बर्याच शासकीय योजना या प्रकारे आमलात आणून घेतल्या. आणि हीच ताकद आणि आत्मविश्वास जरी प्रत्येक शेतकऱ्याच्या येणाऱ्या पिढ्यात आला तरी आपण त्यांना तो प्रकाशाचा स्त्रोत दिला म्ह्नणून समजा. त्यासाठी च्नागल शिक्षण जे त्यांना या गोष्टी शिकवेल, वक्तव्य जे त्यांना आतमविश्वास देईल आणि त्यांच्या अंधारात असल्याची जाणीव आणि हक्कांची माहिती. कारण आपण आंध्रात आहोत हेच त्यांना माहित नाही असा वाटते कधी कधी. शहरात लोकांना त्यांच्या हक्काची नीट जाणीव आहे आणि ते तिचा छान वापर करतात. आपल्याकडे शेतकरी संघटना होती, विविध राजकींय पक्षांनी ही काही काही काळ हे प्रश्न उचले, पण हा प्रकाशाचा स्त्रोत त्यांनी पुढे जाऊ दिला नाही; कारण याच्यात पुन्हा नवे नेते आणि द्रष्टे निर्माण करण्याची ताकद आहे. आणि हे जर निर्माण झाले तर आहे त्यांचा स्वार्थ कसा पूर्ण होईल. ६० वर्षां पूर्वी जे कारकून तयार होत होते तशेच spectators ही शिक्षण व्यवस्था निर्माण करत आहे. त्या शिक्षण व्यवस्थेत ला दोष मला दाखवायचा नाहीये कारण त्याच शिक्षण व्यवस्थेने काही आपल्यासारखे कमीत कमी जाणीव तरी असणारे लोक बनवले. ते असो; पण माहिती हे फार मोठे अस्त्र आहे, ज्याला इंग्रजीत आपण Information-Weapon म्हणू; ते आपण या नव्या शेतकरी पिढीच्या हातात देऊ शकू. क्रिकेट आणि सिनेमाच्या मागे लागलेला ग्रामीण युवक त्यातून बाहेर पडला पाहिजे [गप्पा मरण फार सोप आहे याची मलाच नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येकाला जाणीव आहे पण उदिस्त समोर ठेवणे जरुरी आहे म्हणून बोलतो], त्यान भविष्याचा विचार एका नव्या चष्म्यातून केला पाहिजे.
ही माहित आपण शिकलेल्या लोकांनी अवगत करून तिच्या प्रचार आणि प्रसाराचे काम संघठीत होऊन करावे किंवा जमेल तस व्यक्तिगत पातळीवर कराव. कधी कधी वाटू ही शकत; नव्हे बर्याच वेळेस वाटते ही कि आपण फक्त गप्पा मारत आहोत, काहीच करत नाहीत. ते कधी कधी वाटावा ही पण प्रश्न नीट समजून त्याचा परिपूर्ण आणि Root Cause शोधणारा उत्तर आपल्याला हवं आहे. ते मिळवण्यासाठी आयुष्याचा थोडा वेळ लागेलच. काही लोकांना ती उत्तर मिळालीत त्यांची अमलबजावणी आणि कॉपी आपण करावी, उदा. श्यामरावांनी गावाचा रस्ता केला तो अनुभव आपल्यासागल्यांसाठी खूप महत्वाचा कारण तो pure practical आहे. अशे अनुभव आणि practical रास्ते आपल्याला माहित झाले की उदेश्या साधायला वेळ लागणार नाही. शेवटी एकच म्हणेल प्रश्न समजून घेण्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल, मग त्यासाठी करुत की संघठण! आपल्यात उत्साह आहे, ताकद ही आहे, गरज आहे ती कुणी तरी पुढकार घेण्याची; तो कुणीच एकटा घेणार नाही, सगळ्यांनाच घ्यावा लागेल!
जय महाराष्ट्र!
प्रकाश पिंपळे

साळसूद पाचोळा said...

कालच सोनिया गान्धिच्या नाशिक मधल्या सभेत शेतकरी महिला-पोरी याना सभेसाठी १०० रु रोजाने आणले होते,.. ..
दिवसभर त्याना काही खायलाही दिले नाही. त्यातील काहिना ५० रु दिले तर काही महिलांना "रोजनदारी" मागितली म्हनू कान्ग्र्स्च्या टेकेदारान्नि मारहाण केलि...
.
गरीब शेतकरी म्हणजे पैश्यासाठी लाचार असाच यांचा द्रुष्टि कोण आहे... तो लाचार नाही पण ती गरीबाची अगतिकता आहे हे ही दुर्दैव आहेच..
.
गरीबी मुळे तो घोड़ खिन्डितिलि बाजी प्रमाने झाला आहे...

Post a Comment