Showing posts with label गोष्ट छोटी डोंगरा एवढी. Show all posts
Showing posts with label गोष्ट छोटी डोंगरा एवढी. Show all posts

Tuesday, August 25, 2009

गोष्ट छोटी डोंगरा एवढी [http://mukhyamantri.blogspot.com/]

कालच "गोष्ट छोटी डोंगरा एवढी" हा मराठी चित्रपट पाहीला. तस आम्हाला मराठीचा आणि तिच्या संवर्धना साठी झटनार्यांचा फार अभिमान. पण नुसत्या पोकळ गप्पा न मारता कुणी काही करून दाखवलं तर आम्हाला अधिक आनंद होईल. आणि तोच हा मुव्ही पाहिल्यावर झाला. निळू फुले, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे , नागेश भोसले आणि अनेक पट्टीच्या कलाकारांनी केलेली हि एक अप्रतिम कलाकृती आहे.
त्यासोबतच आम्हाला जे भावले, ते म्हणजे विषय आणि त्याची तंतोतंत हाताळणी. अहो शेतकऱ्याच्या प्रश्नाला असा हात घातलाय जसा बरोबर अर्जुनाने पक्षाचा डोळा नेमावा [उदा: निळू फुलेंचा एक डायालोग: "अहो, मरण्याचे शेतकऱ्याला एक लाख देता, जगण्याचे पंधरा-वीस हजार तरी द्या"]. एकंदर चित्रपट एकदाच नव्हे तर अभ्यास म्हणून अनेकदा पाहण्यासारखा आहे. अभिनय करताना कलाकाराच्या तर डोळ्यात पाणी येतेच पण बघानाराच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणल्याशिवाय कलाकार राहत नाहीत. मी सर्वाना कळकळीची विनंती करतो कि आपण फुटकळ मुव्ही बघतो, अहो कधी कधी तर भंकस पानाचा कयास करणारे मुव्ही सुद्धा बघतो, तेंव्हा या कृषिप्रधान देशातील नागरीकानो हा मुव्ही तर खूप चांगला आहे, नक्की पहा. शेतकऱ्याचे प्रश्न समजून घ्या, ते तुमच्याशी कशे निगडीत आहेत ते हि समजून घ्या. शेवटी तुम्हाला आम्हाला पोसणारा उपाशी राहिला आणि पटा पटा आत्महत्या करायला लागला तर.......? तुम्हीच विचार करा काय होईल! अहो, निराश होऊन तो शहरात येईल, कारखान्यात काम करेल, तिथे हि तो चटणी भाकरच खात होता आणि इथे हि तेच खाईल. त्याला काही फरक पडणार नाही, पण आपल्यासारख्यांचे काय ......? आपण उपाशी मरू! त्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय उरणार नाही.[घेताय ना आजच महागाची डाळ विकत; बघा एक दिवस दाना सुद्धा मिळणार नाही!]

मुंबईमध्ये मुव्हीचा चांगला व्यवसाय होतो, मग काही भंकस हिंदी मुव्ही सुधा पोटापाण्यापूरत कमावतात. अहो विनोदी मराठी मुव्ही असतील तर ते हि धक्के खात चालतात, पण चालतात. एकंदर काय तर टाइम पास होणार असेल तर आम्हाला काहीही चालेल."पण आता आमचेच प्रश्न कमी आहेत का की आम्ही ते शेतकऱ्यांचे प्रश्न बघायला जाउत", हा विचार ही काही बहादूर करणार असतील त्यांना आमचा सलाम! [जा XXXकात]. आम्ही काल मुव्ही ला गेलो तर तिथे सगळे मिळून लोक ४! मुंबईत बरेच मराठी लोक आहेत हे राज ठाकरेंच्या कर्तुत्वाने कळले; पण असा शेतकऱ्याच्या प्रश्नावर हा मुव्ही आला आणि सगळे कुठे गायब झाले कि अन् काय कि? मला एक घटना आठवते, गांधीजीकडे आफ्रिकेत काही भारतीय आले आणि ते म्हणत होते आमच्यावर अन्याय होतो आहे, आमच्याशी विषम व्यवहार होतोय कारण आम्ही भारतीय आहोत. आणि तिथेच हे जमलेले भारतीय आपल्या वर्णा नुसार वेग-वेगळे बसले होते. तेंव्हा गांधीजीने त्यांना ठणकावले होत कि आधी आपले भेदाभेत कमी करा! तसच मला वाटते आज जेंव्हा आपण मराठीचा, मराठी माणसाचा प्रश्न उभा करतो तेंव्हा मग आम्हाला फक्त मुंबई आणि इतर काही शहरातील मराठीच दिसतात! काय तर म्हणे आमच्याशी विषम व्यवहार होतोय. हाच विषम व्यवहार काही प्रमाणात याच काही शहरात असपृश्या मानल्या जाणार्या शेतकऱ्यांशी होतो, त्यांचे प्रश्न ऐकायालाच नाही, तर त्यांच्याकडे ढुंकून हि बघायला कुणी तयार नाही. हा आमचा राग असेल कदाचित, आम्ही चुकलो हि असू; पण जे दिसला त्यांन मन हेलावलं; नव्हे हलच!

एकून आमच्या मनाची स्थिती फार विक्षिप्त झालेली आहे. एक तर ते प्रश्न पाहून मन हळहळत आणि त्या प्रश्नांपायी असलेली आपली उदासीनता पाहून मग जखमी होते. अहो आम्ही छोट्यामोठ्या रोगावर [...तारे xyx पर ..... {मी ते बघू नका असा म्हणत नाही}, प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे आणि ते हि स्वाभिमानाने, पण मग हाडामासाच्या सुदृढ शेतकर्यालाच का नाही?], छोट्या छोट्या प्रश्नावर निघालेले मुव्ही किती छान आहेत, अभिनय कसा अप्रतिम केलं अस म्हणतो आम्ही, आणि कुणाच्या जीवन मरणाशी निगडीत गोष्टी " ह्या, ती भंकस कुणी झेलावी तीन तास!" असा म्हणून दुर्लक्षित करतो. धन्य आम्ही!

हा मुव्ही अगदी वेगळा आहे, शासन व्यवस्थेवर, त्याच्या चुकावर बरोबर बोट ठेवणारा आहे. माणूस म्हणून शेतकऱ्याच असतीत्व मान्य करा हे अगदी ठासून सांगणारा आहे. आमची गाडी जागतिकीकरणात अगदी वेगाने धावत आहे, पण धावण्यात मागे किती धूर निघतोय हे पहायचं कदाचित आमचे ड्रायव्हर विसरलेत अस वाटत. अहो कुत्र्या-मांजरांच्या प्रश्नावर ही आंदोलन करणारे आम्ही, त्यांच्या प्रश्नांना देशाचा प्रश्न करणारे आम्ही, माणसाचं माणूस म्हणून जगणं जो पर्यंत मान्यकरत नाहीत, समाजाच्या आणि सामाजिक रित्या अक्षम गटाच कल्याण आम्ही चिंतीत नाही, तोपर्यंत आम्हाला भारत महासत्ता बनण्याच्या फुटकळ गप्पा मारण्याची शरमच वाटावी!

ज्यांना हा धूर बघायचा असेल, शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे नेमकं काय करतो? तो ती का करतो? आणि मग त्यानंतर त्याच्याशी आणि मागे राहिलेल्यांशी काय होत? याची माणूस म्हणून थोडी जरी जाणीव करून घ्यायची असेल तर "गोष्ट छोटी डोंगरा एवढी" नक्की बघावा!

[भावनेच्या भारत माझ्याकडून कुणी दुखावलं गेलं असेल तर, क्षमा करावी!]

या विषयावर इतर काही: http://www.pbs.org/wnet/wideangle/episodes/the-dying-fields/video-full-episode/1952/

प्रकाश पिंपळे-पाटील .

Creative Commons License
Blog by Amol Suroshe is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

Sunday, August 23, 2009

गोष्ट छोटी डोंगरा एवढी...............

नमस्कार मित्रानो ,

कालच हा चित्रपट पहिला .. खरच काळजाचा थरकाप उडवणारी हि कथा आहे .. शेतकर्याची कथा ..

कसा आमचा हा बळी राजा रोज मृत्युच्या दारात ढकलला जातोय ह्याचे खूप विदारक दृश्य ह्या चित्रपट मध्ये बघायला मिळते ..

त्यांचे प्रश्न कित्ती साधे आणि सोपे आहेत पण गेली साठ वर्षे आम्ही त्यांना काय देऊ शकलो ह्याचे दर्शन ह्या चित्रपट मध्ये होते ..

जग फार वेगाने धावत आहे .. पण आम्हीच ज्यांना मागे ठेवले आहे त्यांच्या मध्ये आणि आमच्या मध्ये जमीन आसमानीचा फरक आहे .. आम्हाला खाऊ घालणारच आज उपाशी आहे ..

एकीकडे महासत्ता होण्याची स्वप्ना पाहणाऱ्या आमच्या ह्या देशाचा राजा .. भिकेला लागायची वेळ आली आहे .. शाषण आणि प्रशासन मेलेल्या मुडद्या सारखे पडून आहेत ..

ह्याच चित्रपटातील शेवटचा एक वाक्य आहे जे तुमचे काळीज चिरून बरेच प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करून जातो ...

"एका किलो गव्हा साठी जेंव्हा सारा देश गहन ठेवावा लागेल न तेव्हाच माझ्या पिंडाला कावळा शिवेल "

खरच एका शेतकऱ्याच्या मनातले बोल काळजाचा ठाव घेतल्या खेरीज राहत नाहीत ...

प्रत्येक माणसाने .. ज्याला माणुसकीची कदर आहे आशाने .. आणि आमच्या शेतकर्यांच्या मुलांनी हा चित्रपट जरुर बघावा ..

शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्यावर जेवढ्या सहजतेने बोलता... त्याच मोठे पनाने हा चित्रपट एकदा तरी पाहावा .. तेव्हाच तुम्हाला आपल्या या कृषिप्रधान देशातील बळीराजाचे काय हाल चालले आहेत हे लक्षात येईल ......

एक चित्रपट म्हणून देखील आतिशय उच कोटीचा सिनेमा मराठी रंगभूमी वर आणल्या बद्दल मी सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो ...


जय महाराष्ट्र ......