Tuesday, December 16, 2014

तुझ्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या फक्त शेतकरी होवोत हा श्राप

लोकसत्तेत आज कुणा मुर्खाने आपले भोकाड उघडले आणि "बळीराजाची बोगस बोंब" हा लेख लिहिलाय. बऱ्याच वेळेस काही घटनांचा नुसता निषेध व्यक्त करून काही होत नाही. अशा ठिकाणी दगडफेक आणि नैसर्गिक प्रकारे राग व्यक्त करणे ठीक असते. तरी कायद्याच्या भीतीने ते श्याक्या नाही. असो. भयंकर राग आलेला आहे.

लेखक नक्कीच शेती या व्यवसायापासून कोसो दूर असावा किवा त्याचे पोट शेती या व्यवसायावर कधीच आधारलेले नसेल. जगात जितके व्यवसाय आहेत त्या पैकी शेती हा सगळ्यात जुना. अन्न ही मुलभूत गरज म्हणून त्यावर आणि त्याच्या भावावर अनेक बंधने. तशी ती इतर अनेक व्यवसायात नाहीत. शेती कशी तोट्याची आहे हे सांगण्यासाठी मी पुन्हा अजून काही लिहायची गरज नाही. हजारो चालवली आणि अभ्यासकांनी ते केलेय. कुणाला ते वाचण्याची तसदी घ्यावीशी वाटली नसावी इतकेच.

अनेक शेतकऱ्यांच्या गळ्यातील सोने दिसते. ते शेतकरी नसतात. मुर्ख ते भूखंड किंग असतात. ते तुला नव्याने सांगायची गरज नाही. शेवटी तुझ्या सारख्याच्या हाती लेखणी म्हणजे दारू पिलेल्या माकडाच्या हाती आगकाडी. इतकेच हा लेख वाचल्यावर सुचले. कुणाला ही श्राप देवू नये असे म्हणतात. पण नापिकीने हैराण झालेल्या सगळ्या कुटुंबांकडून ज्याच्या परिस्थितीची आणि अश्रूंची तू बोंब म्हणून खिल्ली उडवलीस, त्या सगळ्यांकडून तुझ्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या फक्त शेतकरी होवोत हा श्राप!   

No comments:

Post a Comment