Tuesday, December 2, 2014

दुष्काळात सगळ्यात आधी मारते ती माणुसकी

Need your Help!
----
शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या रोज येणाऱ्या बातम्यांनी मन अगदीच निराश होते. अगदी ५० हजारांच्या अडचणी मुळे जीव द्यावासा वाटणाऱ्या शेतकऱ्याच्या मनाचे दुख इतक्या दूर राहून समजणे अशक्य. पण नक्कीच जीवन भयंकर असह्य झाल्या शिवाय कुणीच ती स्टेप घेत नसणार. ती असह्यत्ता आणि ते दुख: किती असेल हे त्रयस्थ हुवून समजले जाऊच शकत नाही.
मुला-बाळांनी भरलेला संवसार असा अर्ध्यावर तोही मागे पुढे काहीच ठेवून न जाता सोडून जाने ही अतिशय क्रूर गोष्ट आहे. आत्महत्या करणाराला यासाठी माफी नकोच. तो गुन्हेगारच असतो सबंध माणुसकीचा. पण कदाचित, चूक कळत असूनही टोकाचे पाऊल उचलणारा व्यवस्थेकडून इतका छळला गेलेला असावा की या जाणीवा हि त्याच्या बोथट झालेल्या असाव्यात.
पण आता सत्य स्वीकारावे लागणारच. मारणारे मेलेत. अर्ध्यावर सगळ टाकून मेलेत. मागे मुल-मुली आहेत. हिरमुसल्या चेहऱ्यांनी जग न्याहाळणारी आपल्या बापाला शोधत. तो भेटणार नाही हे सत्य.
अस म्हणतात दुष्काळात सगळ्यात आधी मारते ती माणुसकी. पण त्यातही तुम्ही आम्ही ठरवलंच आणि अशा कठीण काळी घास वाटून खायचे ठरवले तर दुष्काळ आणि कठीण काटणे थोडे का होईना सुसह्य होते. म्हणूनच या सगळ्या परीस्थित आपण सगळे जे जे सुस्थितीत आहोत त्यांनी असा निश्चय करू की घरातल्या कर्त्याने आत्महत्या केलेल्या घरातील मुलांचे शिक्षण बंद पडू नये आणि अशा कठीण प्रसंगात कमीत कमी आता तरी काही काळ पैशाची चन-चन भाषु नये.
म्हणून यातल्या (किमान) ५० शेतकर्यांच्या मुला-मुलींच्या पुढील वर्षापासून शिक्षणाची संपूर्ण मदत Kartavya: A Duty Towards Society आणि www.jijau.com मार्फत करणार आहोत.
पण सध्या त्यांच्या विधवा पत्नीला तातपुरता प्राथमिक हातभार म्हणून प्रत्येकी रु. १०,०००/- तत्काळ मदत करण्याचा विचार आम्ही करतोय.
हे तुमच्या मदतीनेच होणार आहेत. या वेळी अगदी हक्काने मगतोय. ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया Rs. 5000/- (or 100 USD) या कामी मदत करावी. ज्यांना मदत करतोयेत त्यांची नावे आणि इतर माहिती तुम्हाला काही दिवसात देऊच. तरीही २ (तारीख २० डिसे. २०१४ आधी) आठवड्यांच्या आत त्यांना ही मदत पोहचल्यास त्यांचा माणुसकीवरचा विश्वास कायम राहील.
For Account details: drop me an e-mail: pbpimpale@gmail.com

No comments:

Post a Comment