Saturday, March 8, 2014

स्त्री, अस्मिता आणि राजकारण : घाणेरडा खेळ

निवडनुका जवळ आल्या की हे होताच राहणार हे आपण सगळे जाणतोच. पण या आधुनिक शतकात येउनही आपले 'चिंदी' चाळे न सोडणारे आपण कुठल्याच लायकीचे नाहीत हे वारंवार सिद्ध करत आहोत.

याची नुकतीच दोन उदाहरणे म्हणजे:

१) अमरावती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत कौर-राणा यांच्या बदनामीचे प्रयत्न : स्त्री ला राजकारणात किंवा कुठेही नमोहरम करण्यासाठी हमखास वापरले जाणारे शस्त्र म्हणजे तिचे चारित्र्य. पवित्रता, देवित्व आणि अजून काय काय विशेषनांनी नटवून ठेवली स्त्री आपल्याला आदर्शवत वाटते.

बाकी सगळ्यांबद्दल आपण 'फक्त ऐकीव माहितीवर' आणि आपल्या 'बौद्धिक कुवती' नुसार निर्णय घेऊन टाकतो आणि संधीच मिळाली तर वाचाळपणे बोलूनही दाखवतो. 

तर राजकारणात आणि इतर ठिकाणीही या असल्या फालतू चाली खेळून स्त्रीला नमोहरम करण्याची ही भारतीय संस्कृती नाही.  "तुमच्या भारतात" तसे सर्रास केले जात असेल तर वाटून घ्या देश आणि घाला धिंगाणा!

असो. "अंतरराष्ट्रीय" महिला दिनाचा हार्दिक शुभेच्छा!
२) शिवाजी महाराजांच्या फोटो सारखा नरेंद्र मोदींचा फोटो: तर याही  फालतू मार्गाने धार्मिक, जातीय आणि प्रांतीय भावना भडकावणे हे इलेक्शन चे लक्षण आहे. 

शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदीच काय पण गेल्या काही शतकात महाराजांशी तुलना करता यावी असा राज्यकर्ता जन्माला आलेला नाही. महाराज काही देव किंवा अवतार नव्हते पण त्यांच्या सारखे गुण अंगी बाळगणारा आणि जनतेबद्दल कळवळ असणारा राज्यकर्ता आता जन्माला येणे अशक्य वाटते. असो इलेक्शन आहे महाराजांशी कुणाचीही तुलना होवूच शकत नाही. आणि कुणी करत असेल तर,  'त्याला' कळेल त्या दिवशी 'तो स्वतःच' टक-मक टोकावरून उडी मारेल! म्हणून तुम्ही निश्चिंत रहा. 

फक्त एकच करा विचार करून मतदान करा!                 

No comments:

Post a Comment