Wednesday, March 12, 2014

यशवंतरावराव चव्हाण जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



पुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला. त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात साहेबांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. साहेबांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रात पुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला. महाराष्ट्रातील राजकारणाला अतिशय आदर्श असे मापदंड घालून दिले. व्यक्तिगत आणि क्षेत्रीय विचारांच्या पलीकडे राष्ट्रहितासाठी राजकारण हा जो पायंडा महाराष्ट्रातील राजकीय चळवळीला लाभलाय तो म्हणजे यशवंतरावांचीच देन.

यशवंतरावराव चव्हाण जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!




यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणी नव्हते तर ते खरे समाजकारणी होतेराज्याचा व देशाचा डोलारा सांभाळताना धावपळीच्या काळातही त्यांनी साहित्यातील व्यासंग कायम ठेवलाम्हणूनच यशवंतराव देशाच्या राजकारणात पट्टीचे व्याख्याते बनलेअखेरपर्यंत त्यांनी साहित्यसेवा केलीत्यांच्या साहित्य प्रेमाचे अनुकरण आजच्या विद्यार्थ्यांनी करावेयशवंतराव चव्हाण हे आजच्या पिढीसाठी व सत्ताधाऱ्यासाठी समाजसेवेचा खरा आदर्श आहेतत्यांचे विचार देशाला तारणारे व प्रेरक होतेसंरक्षणमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली म्हणून देश मोठ्ठ्या अडचणीतून सहीसलामत बाहेर आलामहाराष्ट्राची नवनिर्मिती करणारा स्वच्छ चारित्र्याचा हा नेता राज्य व देश विकासासाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे....”
-
मा.श्रीविनायकराव अभ्यंकरनिवृत्त नौसेना अधिकारी
-- 
"यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असतानाच्या काळात समाज परिवर्तन घडविणारे अनेक चांगले निर्णय घेतले.आपण राज्य करायला सत्तेत कुणासाठी बसलोय याचे भान त्यांना होतेयशवंतराव चव्हाण हे समाजाच्या दु:खाचे भान असलेले नेते होतेत्यांच्या आईविठाई या न शिकलेल्याघरात आर्थिक चणचणकोणताही आधार नाहीअशा परिस्थितीत यशवंतराव मोठे झालेत्यांच्या आईने त्यांना काबाडकष्ट करून शिकविलेयाचे भान ठेऊन यशवंतरावांनी पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय घेतला तो गरीब मुलांसाठीया मुलांना शिक्षण घेताना कुठल्याही अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी 900 रुपये आर्थिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना शिक्षण शुल्कात सवलती देण्याचा निर्णय घेतलाविधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्यावर विरोधकांनी खूप टीका केलीयात तीव्रता होती,मात्र कटूता कुठेही नव्हतीसंरक्षणमंत्री झाल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा व निरोपाचा ठराव विरोधी पक्षाने मांडला होता.यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होतेहीच याश्वान्त्रावांची खरी कमाई होती..."
-
माश्रीमधुकर भावेज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार
--
"यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे असामान्य सुसंस्कृत व्यक्तिमत्व होतेम्हणूनच त्यांच्या नावाचे प्रभुत्व मराठी मनांवर आजही आहेया नावाला अन्य विशेषणांची गरज नाहीत्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगनिर्णय त्यांची संवेदनशीलतासुसंस्कृतता यांचा प्रभाव नव्या पिढीवर पडणे गरजेचे आहेशिक्षणाला साधन मानणाऱ्या यशवंतरावांनी गरीब घरातील मुलांसाठी आर्थिक निकष लावून मोफत शिक्षणाची सोय करताना आपले मुख्यमंत्रीपद पणाला लावले होते...."-माडॉएसकेकुलकर्णीज्येष्ठ पत्रकारपुणे.
--
युरोप अमेरिकेत शेतकऱ्यांची संख्या कमी आहेत्यामुळे त्यांचे औद्योगिक धोरण भारतात आणणे चुकीचे आहे.कृषीकडे दुर्लक्ष केल्याने देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेतसहकार व कृषी औद्योगिक विकास आणि ग्रामीण विकासाची यशवंतराव चव्हाण यांची मांडणी आज हवी तशी स्वीकारली जात नाहीसद्द्यस्थितीत महाराष्ट्राला त्याचीच आवश्यकता आहे...”
-
माश्रीभाई वैद्यज्येष्ठ समाजवादी विचारवंत 
--
यशवंतरावांनंतर राज्याचे विघटन सुरु झालेयशवंतरावांनी महाराष्ट्राला जातीविरहित शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलीत्यांच्यानंतर अनेक सहकारी संस्था डबघाईला आल्याशेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा,यासाठी यशवंतरावांनी प्रयत्न केलेमात्र आजही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकले नाहीतयशवंतरावानंतर महाराष्ट्र पोरका झालात्यांच्यासारखे समर्थ नेतृत्व आज देशात व महाराष्ट्रात राहिले नाही...”
-
माश्रीश्रीनिवास पाटीलमाजी खासदारकराड 

No comments:

Post a Comment