Wednesday, October 23, 2013

मी आणि आशा वाघमारेने प्रेम विवाह केला. मी मुस्लीम घरात जम्नालो... अमर हबीब

अमर हबीब यांना एक लाखाचा पुरस्कार 'आम्ही सारे' या संघटनेने नुकताच दिला. सत्काराला उत्तर देतांना त्यांनी केलेल्या भाषणातील काही मुद्दे. हे शेखर सोनाळकर यांनी लिहून काढले आहेत.

“मी आणि आशा वाघमारेने प्रेम विवाह केला. मी मुस्लीम घरात जम्नालो. ती ख्रिश्चन. दोघांनीही धर्म बदलला नाही. प्रेम कोणातही होऊ शकते. ती एक भावना आहे. आज जर कोण दोन भिन्न धर्मियांना लग्न करायचे असेल तर धार्मिक पद्धतीने तत्काळ करता येते. एकाचा धर्म बदलून मंदिरात, मशिदीत किंवा चर्चमध्ये लगेच लग्न करता येते. पण स्पेशल मारेज एक्ट खाली लग्न करायचे असेल. प्रेमात, लग्नात धर्म भादालाण्याची अट नको असे वाटत असेल, तर एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. हा एक महिना घरच्यांना दबाव आणण्यासाठी,लग्न मोडण्यासाठी मिळतो. हे चुकीचे आहे."

"मला पहिली मुलगी झाली. तरंग. मी तिचे नाव बालवाडीत टाकायचे ठरविले. आशाची भाषा मराठी. आम्ही दिल्लीकडचे आमच्या घरात उर्दू बोलली जात असे. माझी मातृभाषा उर्दू. पण मी ठरविले घरात आईची भाषा चालली पाहिजे. आणि मी ठरवून घरात मराठीत बोलायचो. यामुळे तरंग आणि सारंगचे नाव मी मराठी शाळेत घालायचे ठरविले. एका ख्यातनाम शाळेत गेलो. समोरच देवी सरस्वतीचा पुतळा. मला मुख्याध्यापक म्हणाले आम्ही तर रोज सरस्वतीची प्रार्थना घेतो. दुसऱ्या शाळेत रोज तीन हिंदू देवाच्या प्रार्थना. मी वैतागलो. अखेरील घराच्या सर्वात जवाच्या शाळेत नाव टाकले. माझी साडेचार वर्षाची तरंग एक दिवस शाळेतून आली आणि घडाघडा गायत्री मंत्र म्हणून दाखवला. माझी सून मुस्लीम. तिची मातृभाषा उर्दू. मी ठरविले नातवाला उर्दू शाळेत घालायचे. तेथे त्याला बालवयात इस्लाम व कलमा शिकवल्या जातात. का ? असे सरकारी अनुदानावर चालणाऱ्या शाळात आपापला धर्म जबरदस्तीने का लादला जातो ? मला माझ्या मुलांना चवदा वर्षांचे होइपर्यंत धर्म शिकवायचा नव्हता. १४ वर्षानंतर त्यांना समज येते. त्यांनी त्यांचा मुक्त मनाने धर्म ठरवावा. अशी एकही शाळा नसावी की जेथे धर्माची जबरदस्ती नसेल."

"मला सगळे विचारतात की तु मुसलमानांसाठी काय केलेस ? का ? हा प्रश्न ही मंडळी चंद्रकांत वानखडेला विचारीत नाहीत की तु मराठ्यांसाठी काय केलेस ? शेखर सोनाळकरला विचारीत नाहीत की तु सीकेप्यांसाठी काय केलेस ? मलाच काय विचारतात ? मी सर्व समाजाचा आहे."

"येत्या चार महिन्यात देशाला एका महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर द्यावयाचे आहे. पुन्हा १९४०च्या जर्मनीच्या वंशद्वेषाच्या मार्गाने आपल्याला जायचे आहे की भारतींय संविधानाच्या, स्वतंत्र चळवळीच्या विचाधारेच्या, सुसंस्कृत मार्गाने जायचे आहे ?”

(एका फाटक्या कार्यकर्त्याला विदर्भातल्या ११ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ११ लाख रुपयाचा निधी जमा करून दिला. त्याने त्यातून स्वत:साठी एक पैसाही न घेता 'आम्ही सारे' प्रतिष्ठान बनवून त्या मार्फत दरवर्षी एका कार्यकर्त्याला १ लाख रुपयाचा पुरस्कार द्यायला सुरुवात केली. त्या कार्यकर्त्याचे नाव चंद्रकांत वानखडे . कधी एके काळी वानखडे एका प्रतिष्ठानाकडून स्वत:साठी मदत घेत होते आणि त्यांच्या अटी जाचक वाटल्याने वर्षभरातच त्यांनी ती मदत घेणे सोडूनही दिले होते!)

अमर हबीब यांच्याविषयी माहितीसाठी सुधाकर जाधव यांचा लेख पहा http://myblog-common-nonsense.blogspot.in/2013/10/blog-post_21.html

सौजन्य: https://www.facebook.com/murli.khairnar

No comments:

Post a Comment