Sunday, April 14, 2013

आनंद याचाच आहे कि वेळेत बाबासाहेब कळले!

समानतेच्या दीपाला, जाती आणि धर्मात विभागलेल्या राष्ट्राला 'भारत' हीच एक ओळख देणाराला आणि इथून पुढे घडणाऱ्या क्रांतीची मशाल अनेक वर्षे आधीच पेटवून जाणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. अस म्हणून बाबासाहेबंवरील एका लेखाची एक दोन वर्षान पूर्वी सुरवात केली होती. म्हणून आजच्या भीम जयंतीच्या शुभेच्यांचे टायटल हि तेच. यातला सगळ्यात महत्वाचा वाक्य:  "इथून पुढे घडणाऱ्या क्रांतीची मशाल अनेक वर्षे आधीच पेटवून जाणाऱ्या....". खरच इथून पुढचा काळ हा बाबासाहेबांच्या विचाराचा आहे. आज अनेक पुरोगामी जे आर्थिक आणि सामाजिक विचार मांडत आहेत ते अनेक वर्षा पूर्वी बाबासाहेबांनी मांडून ठेवले. चूक आपलीच झाली कि आपण त्यांना इतकी वर्ष झाकूनच ठेवले. तर, ग्लोबलाइज्ड जगात आपण सध्या जो स्टेट कंट्रोल असावा असा म्हणत आहोत तेच बाबासाहेब अनेक वर्षान पूर्वी म्हणून गेले. मुंबईतील पावसा सारख्या येणाऱ्या ग्लोबल रीसेशनला हे एक चांगले उत्तर राहील. सध्या पहिले गेल्यास बाबासाहेबांचे साम्यावादशी पटले नाही. पण ते अनिर्बंध भांडवलशाहीचे सुधा समर्थक नव्हते. मुळात त्यांचा पिंडच समाजवाद्याचा. पण त्यात हि त्यांनी हवे तिथे बदल स्वीकारून पैसा आणि व्यापार हे समाज उत्थानाचे मोठे साधन आहे हे दाखवून दिले. म्हणूनच तर त्यांच्या 'स्टेट कंट्रोलच्या' भाषेने ते समाजवादी वाटतात आणि कधी "प्रोब्लेम ऑफ रुपी..." मुळे ते फ्री मार्केटचे समर्थक वाटत. पण माझ्या सारख्या सामान्याला या सगळ्यांच्या वादाच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आपले वाटत. खरच त्यांच्या चळवळीचा हेतू फक्त एक किंवा दोन समाजाची प्रगती नव्हताच, किंवा फक्त समाजवाद किंवा भांवालशाही हा हि नव्हता. प्रत्येक भारतीयाच जीवन कस सुखकर होईल याच हेतूने त्यांची चळवळ आयुष्यभर चालत राहिली. आता त्याच्या चळवळीचा हेतू आतापर्यंत झाकून ठेवला गेला या बद्दल मी रडणार नाही. कारण आनंद याचाच आहे कि वेळेत बाबासाहेब कळले!
जय भीम! जय महाराष्ट्र!

No comments:

Post a Comment