Thursday, April 1, 2010

एक क्रांतिकारक पाऊल.. शिक्षणाचा अधिकार विधेयकआज भारताचे पंतप्रधान एका ऐतिहासिक विधेयकाचे वाचन करणार आहेत .. देशातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार असणारे हे हे विधेयक आज पासून कार्यरत होणार आहे.
आज पासून शिक्षण हे कायद्याने प्रत्येक भारतीय बालकाचा मुलभूत अधिकार असणार आहे. मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा हा कायदा येणाऱ्या काळात नक्कीच खूप मोठा बदल घडवून आणेल ह्याची मला खात्री आहे.

या क्रांतिकारक निर्णयाबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो, तसेच त्यांना ह्या शिक्षणाच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी असे हि सूचित करू इच्छितो !

चला तर मग एका नव्या भारत देशाचे स्वप्न बघूया .. ते साकार करण्यासाठी आपणही त्यासाठी प्रयत्न करूया ....

जय हिंद .. जय महाराष्ट्र

अमोल सुरोशे

1 comment:

प्रकाश बा. पिंपळे said...

खरच शासनाच्या या पावला बद्दल आभार मानायला हवेत आणि अभिनंदन ही करायला हवे!

Post a Comment