Tuesday, March 9, 2010

प्रवास: कार्यकर्ता ते मुख्यमंत्री कार्यकर्ता !

सदर पोस्ट ही आमच्या ह्या ब्लॉग बद्दल आहे. या ब्लॉगने आम्हाला विचार करायला शिकवले खूप काही छोटे मोठे अनुभव दिले. आपल्याच लिखाणातून आपल्यावर कसे चांगले संस्कार होऊ शकतात याचे आम्ही दोघे म्हणजे अमोल सुरोशे आणि मी ज्वलंत उदाहरण. विचार, लिखाण आणि भाषणे तसं आधी पासूनच करत, पण कधी इतक्या पब्लिक फोरमवर लिहिले नव्हते. २००७ साली शेवटी शेवटी  हा ब्लॉग सुरु केला. ब्लॉग साठी नाव शोधत होतो- 'कार्यकर्ता'. कारण नांदेडला असताना बरेचजन कार्यकर्ता म्हणून बोलावत. कॉलेज मध्ये शिवजयंती, भीम जयंती, शेतकऱ्यांसाठी कृषी प्रज्ञा असे काही उपक्रम करत म्हणून! शिवजयंतीचा वारसा मला अमोल कडूनच मिळाला. अमोला आम्ही सगळे राजे म्हणत आणि आज ही त्याच नावाने  बोलावतो. आम्ही तिथूनच समविचारी! तसं 'कार्यकर्ता' ही  टर्म मला फार आवडायची. एकदा माझ्या मित्राला, विशाल चौहानला, मनवत मध्ये म्हंटला सुद्धा कि मला एक 'कार्यकर्ता' नावाचं मासिक काढायचं (;-)). कारण अस वाटायचं- की सगळे जे राष्ट्रनिर्मिती साठी झटले ते सगळे कार्यकर्तेच. आणि अशा कार्यकर्त्यांचा आपण समजा समोर, युवकांसमोर आदर्श ठेवायला हवा आणि एक कार्यकर्ता निर्मितीचे मध्यम व्हयला हवे. लीडरशिप तर सगळेच शिकवतात पण कार्यकर्तेपण कुणीच नाही! आणि सगळेच नेते होवून करणार काय? असो! तर मग मला ब्लोगस्पॉट कडून 'कार्यकर्ता' हे नाव मिळाले नाही. आता मात्र थोडा हिरमुसलो. मग पुन्हा थोडा लहानपनाकडे गेलो, मित्रांसोबत केलेल्या चर्चा आठवल्या आणि पुन्हा लक्षात आला की प्रत्येक जन कार्यकर्ता असतोच, मग तो नेता का असेना. पण आजकाल तो आपाल्यातील कार्यकर्तापण हरवतो आणि म्हणून संघटनांचा ह्रास होतो आणि राष्ट्रानिर्मितीत बाधा येते. मग 'मुख्यमंत्री' हा शब्द समोर आला. त्याला ही विचारांचा पाठींबा. कारण लहान पाणी वाटायचे सगळेच प्रश्न मुख्यमंत्री सोडवू शकतो. मग मुख्यमंत्रीच का नको. आणि शेवटी 'मुख्यमंत्री' हे नाव (युआरएल) मिळाले.[आता गुगलनेच आम्हाला मुख्यमंत्री करायचे ठरवल्यावर आम्ही तरी का नको म्हणायचे :-) ]. एकंदर ब्लॉग सुरु झाला. वेब २.० मध्ये आमचा यशस्वी प्रवेश [या पूर्वी काही ब्लॉग होते पण चालत नव्हते :-(] आणि एका लोकशाही माध्यमाचे आम्ही भागीदार झालो!
पहिली पोस्ट टाकली (थोडीशी मस्करी भाषेत) पण मनातली खरी तळमळ बाहेर आली. आणि ब्लॉगला पहिली कॉमेंट अमोल राजेंची! (तेंव्हा चुकून ही वाटले नाही की हा प्रवास इतका लांब असणार!) काही लोकांनी याच्या प्रिंट काढून वाचल्या! छान प्रतिसाद पहिल्याच पोस्ट ला! 
पुढे २००८ लाच अमोल राजे ब्लॉगवर पूर्ण सक्रीय झाले. 


                               
ब्लॉगचे जुने हेडर असे होते. [हात दाखवत आहेत ते अमोल राजे (रायगडावरील होळी चौकात उभे आहेत) आणि घडी घालून तो मी. मागे विधान भवन ;-)]


पुढे विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा झाल्या रंगल्या. श्याम वाढेकर, मयूर चिटणीस, सुधाकर पाटील, प्रशांत मिसळ, सुदर्शन जगदाळे असे अनेक मित्र या ब्लॉगवरील राजकीय आणि सामाजिक विषयावरील चर्चांवर भाग घेत होते. आणि वाचक वर्ग ही फार होता त्यांना आणि अजूनही आहे  (गुगल सांगतेच ते!). मग तेंव्हा कळाले अरे  सगळ्यांना एकच वाटतेय पण बोलायचे कुठे आणि कोण बोलू देणार? हे प्रश्न. पण कुणी तरी बोलायला सुरवात केली की मग सगळेच बोलायला लागतात. त्यामुळे आधी काहीच न करण्यापेक्षा कमीत कमी बोलला तरी पाहिजे. कारण वैचारिक बैठक होते आणि प्रगल्भता येते. प्रश्नांचे मूळ कळते. आणि सरळ काही तरी करायलाच लागत असाल तर ते खूपच चांगले. पण जे करत आहात ते सुद्धा बोलायलाच पाहिजे [पण म्हणून फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी होऊ नये]. आमच्या सगळ्या तरुण मित्रांना एक अनुभवाची शिकवण सांगतो. जे वाटते ते बोला, कारण त्यानेच तुमचे अस्तित्व दिसून येते, कळून येते. कारण एक दिवस मी काही तरी करेल की जगच बदलेल अस म्हणत वाट पाहत बघण्यात काहीच अर्थ नाही. खूप उशीर झालेला असतो! समाज तो पर्यंत तुमच्या अस्तित्वाला नाकारून आपले वैचारिक संस्कार येणाऱ्या समाज मनावर करून मोकळा झालेला असतो. म्हणून बोला आणि लिहा. अमोल नेहमीच म्हणतो 'मागची पिढी वर्तमानपत्र वाचून घडली, ही आणि या पुढच्या पिढ्या नेट सर्फ करून घडतील'. खरं लोकशाही-स्वातंत्र्य मिळवण्याच एक मध्यम म्हणून इंटरनेटचा उपयोग व्हायला हवा. समानता आणि निरपेक्ष माहितीच मध्यम म्हणून या माध्यमाचा उपयोग व्हायला हवा. वेब २.० च तेच उदेष्य. खरी लोकशाही ती इथेच. विकीपेडिया आणि तत्सम माहिती माध्यमात निरपेक्ष माहिती असण्याची शक्यता असते कारण तिच्यावर हजारो लोकांच्या नजरा असतात (ओपन सोर्सचा हाच फायदा) आणि ती सार्वजनिक मालमत्ते सारखी असते. तुम्हाला ती ताकद दिली गेलेली आहे तिचा पूर्ण उपयोग करा नसता उद्या तुमच्या मुलाने काही गुगल सर्च केले आणि त्याला काही चूक माहिती मिळाली तर त्याचे खरे जबाबदार तुम्हीच! तुमचा इतिहासच उद्या तुमच्या वेब वर नसल्याने  चुकीचा मांडला गेला तर आश्चर्य करू नका! म्हणून बोला आणि वेब वर रहा! आज मराठी मुद्दा या विषयावर इंग्रजीत शोधा जास्त अँटी मराठी मिळेल. कारण मराठी माणूस इंटरनेट वर तुलनेने कमी आहे. (आता उगाच कुणी यावर  वाद करू नये). कारण एक निरीक्षण केलय मी, 'मराठी माणूस आपल्या न्युनगंडाला अहंगंडाचे पांघरून घालून गोंजारतो'. असो. तर राजकीय-सामाजिक(२०-८०) विषय चर्चिले गेले आणि ब्लॉग थोडा नियमित लिहिला जाऊ लागला.
अमोल ने मागील वर्षी ब्लॉगला खूप समर्पक रूप दिले. ब्लॉगची थीम आणि हेडर सगळेच त्याच्या विचार सारणी ला साजेशे झाले; ब्लॉगचे नाव 'मुख्यमंत्री कार्यकर्ता' आणि तो प्रतिक सत्तेतील सामान्य माणसाचा असे.  म्हणजेच "मुख्यमंत्री कार्यकर्ता- एक सामान्य माणूस सामान्य माणसाकरिता". हेडर मधील आर. के. लक्ष्मण काकांचा कॉमन मॅन, आधी विचार करताना, मग चालताना आणि मग रूपाच बदलून राष्ट्राच प्रतिक होवून धावतांना, ब्लॉगच्या ध्येयाचे पूर्ण चित्रीकरण करतो. अमोल राजेंच्या ह्या कल्पकतेला त्रिवार प्रणाम [:-)]! शेवटी हा ब्लॉग एक नवे स्वरूप घेवून तयार झाला.
आता अमोल आणि मी,  दोघे ही, वेळ मिळेल तेंव्हा काही ना काही लिहित असतो. ब्लॉग लिहायचा म्हंटल की संध्याकाळची वेळ हीच चांगली आणि शनीवार रवीवार ही चांगला वापरता येतो. आता आम्ही दोघांनी  जिजाऊ.कॉम ही सुरु केले आहे. ते ही चालवण्यात आणि मेंटेन करण्यात शनिवार रविवार जातो. या सगळ्यात खूप जणांचे  सहकार्य लाभले आणि पाठीवर खूप जणांची शबासकी ही पडली. बर वाटतं! मधेच आम्ही पाहुणे ब्लॉगर हा प्रकार सुरु करून सुधाकर पाटील, श्याम वाढेकर आणि रवींद्र पवार यांना ब्लॉगवर आमंत्रित केले, आणि त्यांच्या लिखाणाला ही खूप प्रतिसाद मिळाला. रोहन पाटील ह्यांच्या नटरंग आणि झेंडा ह्या रीव्हीवला मिळालेला  प्रतिसाद तर खूप प्रचंड आहे. आता ई -कार्यकर्ता या नावाने एक अनियतकालिक ही काढत आहोत त्याचा दुसरा अंक इथे मिळेल.
प्रवास खूप झालाय, अनुभव ही खूप आलेत. अजून खूप काही गाठायचय आणि लिहायचय.
वाचकांचा असाच प्रतिसाद मिळत राहो आणि आमच्या लिखाणाच निर्मितीमूल्य वाढत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना. शेवटी वाचकांना ही विनंती- काही करा/बोला, कुठे ही करा/बोला पण काही तरी करा/बोला (चांगल)!
आमचे प्रयत्न तर चालूच आहेत आणि असणार आहेत कारण, आम्हाला माहित नाही आम्ही जग बदलू शकतो की नाही, पण ते बदलण्याची तीव्र इच्छा मात्र आम्ही हृदयात बाळगतो!


 जय महाराष्ट्र!

3 comments:

Rohan said...

इतक्य्का महान कार्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद..

तुमच्या दोघांच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा ...

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

रोहन साहेब .. आहो कार्यकर्ता हा कधीच छोटा अथवा मोठा नसतो, आपण ब्लॉग च्या माध्यमातून लोकांशी जुडण्याचा प्रयत्न करत असतोत.. आणि तुम्ही केलेले अचूक निरीक्षण, नटरंग आणि झेंडा चे हजारो लोकांपारांत पोचले .. खरच आज आम्हाला अभिमान आहे .. कि वेगवेगळ्या विचारांचे .. लेख आपल्या या ब्लॉग वर आले .. लोकांनी ते वाचले.. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते गेले ...

तुम्हीच नाही . पाटील .. श्याम .. रवींद्र पवार .. ह्या सर्वांचे आभार .. कारण आपल्या सर्वांमध्ये तो "कार्यकर्ता " अजून जिवंत आहे .. तो असाच राहावा म्हणून आपले सहकार्य / सहभाग कायम अपेक्षित असेल,

आणि प्रकाशराव .. गेल्या २ वर्षाचा हाल काळ अचानक डोळ्यासमोर आला..आपल्या वैचारिक स्तराला एक उंची देण्याचे काम या ब्लॉग च्या माध्यमातून झाले, आणि त्या बद्दल मी तुमचे आभार मानतो आणि खरच अभिमान आहे कि आपण दिलेली विचारांची हाक आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलो ..
उत्तरोत्तर .. आपली वैचारिक बैठक प्रगल्भ होत राहो.. प्रश्नाचे ज्ञान, त्याचे मूळ समजून घेण्य एवढा समजूतदार पणा आपल्या अंगी येवो. हीच अएई भवानी चरणी प्रार्थना.

तमाम वाचक वर्गाचे .. धन्यवाद .

अमोल नांदापूरकर

प्रकाश बा. पिंपळे said...

khara mhantalay amolni. @rohan khra tar tumache abhindana karayla hawe karan kahrach natarng jar google serch kela marathit tar pahila result mukhymantri hota. hya nimityane thoda ka hoina pan aapana sarvancha natrangachya prasidhila hatbhar lagala. marathi cinema la ani kalela ashich aaplya sagalyankadun prasidhi milo ani hya digital jagat tyala puna ubhari yewo. sarvanche khup khup abhar.

Post a Comment