Showing posts with label pune band. Show all posts
Showing posts with label pune band. Show all posts

Wednesday, December 29, 2010

सांस्कृतिक दहशतवाद आणि महाराष्ट्र !!!

जागतिकीकरणामुळे जग खूप जवळ आलंय..... पण माझ्या मते जग तर जवळ आलंय पण माणसे एकमेकांपासून वरचेवर दुरावली जात आहेत.

असाच आमच्या मध्ये दुरावा निर्माण करणाऱ्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून घडतांना दिसत आहे,

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कधीच योग्य नसतो ह्याचाच प्रत्यय काल परवाच्या घटनांवरून आला. साहित्य संमेलनाला एक चळवळीतला कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून लाभला, उत्तम कांबळे. पारंपारिक पद्धतींना मोडून काढत त्यांने दिल खुलासपणे श्रोत्यांशी संवाद देखील साधला, खरोखरच उत्तम भाषण होते ते. पण लगेच दुसर्या दिवशी समजले कि साहित्य संमेलनातील एका स्मरणिके मध्ये नथुराम गोडसे चे महात्म्य सांगणारा एक लेख प्रसिद्ध झाला, भारताच्या या "महान?" गांधी द्वेष्ट्याचा किती दिवस असा उदो उदो करणार आहेत, ६० वर्षे झाली गांधींना मारून पण अजूनही हा द्वेष ! खरच खूप शरमेची बाब आहे जेव्हा जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राचा राष्ट्र प्रमुख या देशात येऊन सांगतो कि जर महात्मा गांधी झाले नसते तर कदाचित मी हि घडलो नसतो आणि त्यांच्या विचारांना कित्येक वेळा सलाम केला आणि आपण मराठी .. आपल्या मराठी साहित्य संमेलनात असल्या घोडचुका "जाणीवपूर्वक" करतोय, स्वतंत्र भारताच्या त्या कटू घटनांचे आता कित्ती उदात्तीकरण करणार, शेवटी माणूस मारणार पण त्याचे विचार कसे संपवता येऊ शकतात म्हणूनच मला वाटते हा आता सांस्कृतिक दहशतवादाचा पुन्हा एक प्रयत्न.

तशीच घटना पुण्यातली देखील, पण त्याचे राजकारणच जास्त झाले. राजकारण हे होणारच कारण तो मुद्दाच तसा भावनिक आणि आम्ही भारतीय, त्यातल्या त्यात मराठी आणि प्रश्न आमच्या आराध्य छत्रपती शिवरायांशी निगडीत .. मग हे राजकीय दुकानदार तरी कसे गप्प बसतील. पण ज्या शिवरायांचे हे नाव घेऊन सगळे राजकारण करीत आहेत त्यांना कदाचित माहित नाही कि छत्रपती शिवराय हे एक स्वयंप्रकाशित सूर्यासारखे तेजस्वी व्यक्तिमत्व. त्यांच्या वर पहिला संस्कार घडवला तो राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी, माँ साहेब जिजाऊ यानि आपल्या प्रखर आणि तेजस्वी विचारानी या स्वराज्याचा पहिला मावळा घडविला तो म्हणजे शिवबा। याच शिवबाने सबंध अठरा पगड़ जातीच्या लोकांमधे जिजाऊ प्रेरित स्वभिमानाची अखंड ज्योति पेटाविली। आणि त्याना ह्या स्वराज्याचा मावळा बनवले।
सर्व जाती धर्माच्या आमच्या ह्या मावळ्यांच्या रक्तातून हे स्वराज्य निर्माण झाले अणि जिजाऊ माऊलिं च ते देखन स्वप्न प्रत्यक्षात अवतरल। पुढे हेच स्वराज्य, आपला महाराष्ट्र धर्म आणि स्वाभिमान आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत टिकवला तो स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतिने जिजाऊंच्या शंभू बाळांने ।
या शिवरायांचे चरित्र घडण्यामध्ये बऱ्याच लोकांचा हातभार आहे, पण आज प्रत्येक जन असे दाखवण्याचा प्रयत्न करतोय कि शिवबा घडला तो आमच्या मुळेच ! मग त्यात कोण्या एकाचे उदात्तीकरण किंवा कोण्या एकाचा वयक्तिक उपहास, तिरस्कार हा ओघाने आलाच. खर तर कुठल्याही महापुरुषाला जाती - धर्मामध्ये बांधणे हे अयोग्यच ! माझ्या मते दादोजी कोंडदेव हे जरी शिवरायांचे गुरु नसले तरी हि ते इतिहासातील एक महापुरुषच ,
होय मी महापुरुष म्हणालो कारण त्या सामान्य माणसाच्या आयुष्यात एका असामान्य अशा शिवबाच्या सहवासाचा पावन स्पर्श झाला, काही काळ त्यांना शिवबा सारख्या युगपुरुषाचा सहवास लाभला हे हि नसे थोडके, आणि त्या एका सामान्य माणसाचे जीवन देखील असामान्य बनले.

पण आज काही लोक जर शिवबाचे असाधारण व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये कुण्या एका साधारण पुरुषाचे नाव जोडत असतील तर ते हि अयोग्यच, आणि त्या साधारण पण शिवरायांचे सानिध्या लाभून असाधारण बनलेल्याचे अस्तित्वच जर कोणी नाकारणार असेल तर ती पण खूप मोठी चूकच.

पण आज एक समाज असा म्हणतो कि ते "गुरुच" होते आणि एक समाज म्हणतो त्यांचे अस्तित्वच आम्ही मान्य "करीतच" नाहीत .. दोघांचे हि मतप्रवाह खपले जातात.. दोघांच्या हि मागे आपला आंधळा समाज उभा राहतो ह्याला कारण म्हणजे इतिहासाच्या बाबतीत आपली असणारी उदासीनता. कोणी हि यावे आणि काही पण सांगावे आणि आम्ही लगेच त्यावर विश्वास ठेवणार.. कारण काय तर आम्हाला इतिहासाचे ज्ञान तर नाहीच पण त्याची जान देखील राहिली नाही, म्हणूनच शिवरायांच्या, संभाजी राजांच्या इतिहासाची वेळोवेळी केलेली मोड-तोडही आमच्या लक्षात कधी आली नाही.

आपल्यातला हाच थंडपणा काही ठराविक लोकांचे हत्यार बनतो आहे, खुल्या दिलाने इतिहासावर चर्चा हि झालीच पाहिजे आणि आपण हि आपले कान आणि डोळे उघडे ठेवून ह्यावर लक्ष दिले पाहिजे, कारण एकदा लिहिलेला इतिहास हा पुढच्या पिढीसाठी संस्कार म्हणून काम करीत असतो तेव्हा अशावेळी आपण गाफील राहता कामा नये, कारण अशाच प्रकारच्या मागच्या पिढीच्या काही गफलती आज आम्हाला अश्या जातीय संघर्षापर्यंत घेऊन आल्या आहे.

कोणी हि यावे आणि आमच्या भावनांचा खेळ करून त्याचा बाजार मांडावा एवढे काही आम्ही कमजोर असता कामा नये, अन्यथा असले वाद हे केवळ आपल्यामध्ये दुही निर्माण करतील बाकी काही नाही. एवढीच आपणा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.

जय महाराष्ट्र

अमोल सुरोशे

Tuesday, December 28, 2010

मला ही एक बंद हवाय शिवाजी महाराजांच्या नावाने चालणाऱ्या प्रत्येक दुकानाचा!

 तुम्हाला काय वाटते ?