Tuesday, April 8, 2014

मत कुणाला द्यावे ?

राजकारण आणि क्रिकेट हा भारतीय जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. पण क्रिकेट ज्या प्रमाणात गांभीर्याने घेतले जाते त्या प्रमाणात राजकारण सामान्य माणसांकडून गांभीर्याने घेतले जात नाही, ही जगातल्या या सगळ्यात मोठ्या लोकशाहीची शोकांतिका आहे.
म्हणून आपल्या सगळ्यांनाच निवडणूक आल्या कि कुणाला मतदान करावे हा प्रश्न पडतो. याचे एक कारण हे ही असावे कि बऱ्याच अंशी आपण शासन व्यास्थेच्याशिवाय जगायला शिकालोयेत किंवा जगू शकतोयेत. पण कुठे तरी या ‘शकतोय’ च्या मागेही राजकीय नेतृत्वाने एकेकाळी आखलेली धोरणेच आहेत. तर एकंदर आपण शासन व्यवस्थेच्या अभावाने फार काळ सुखी वगैरे राहू शकत नाहीत. आपल्या घरात एसी येईल, वाशिंग मशीन येईल, हवे तर जगातील सगळेच्या सगळे च्यानेल्स येतील, पण घराच्या बाहेर पडल्यास शासनाने बनवलेल्या रस्त्यांशिवाय पर्याय नसेल, शाळे शिवाय पर्याय नसेल किंवा त्यांच्या धोरणामुळे स्वस्त आणि महाग होणाऱ्या भाज्यांशिवाय पर्याय नसेल.
म्हणून मतदानाचा हक्क बजावतांना तो गंभीरपणे बाजवणे अतिशय म्हत्वाचे राहील. वर्तमान आणि भविष्यासाठीही!
तर कुणाला मत द्यावे या प्रश्नात या अतिशय महत्वाच्या निवडणुकीत तुम्ही हि आमच्या सारखेच पडले असाल तर आपल्या सगळ्यांचा मदतीसाठी खाली काही ज्ञानामृत देत आहोत :             
 • ·         या प्रश्नावर विचार करत असतांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सारख्या संसदीय लोकशाहीत आपण पंतप्रधान किंवा राष्ट्रपती निवडत नसतो, आपण निवडतो ते आपले प्रतिनिधी. म्हणून कुणाला मतदान करावे याचा पंतप्रधान कोण व्हावा किंवा न व्हावा याच्याशी कदापीही संबंध लावू नये. लावल्यास येणाऱ्या पिढ्यांना सक्षम लोकशाही देण्यासाठी आपण अक्षम राहू.
 • ·         आपल्या पसंतींचा उमेदवार निवडतांना तो ‘माझ्या’ हिताचे किंवा माझ्या ‘कुटुंबाच्या’ हिताचे दूरगामी परिणाम करणारे चांगले काय करतो किंवा करेल, याचा विचार करावा.
 • ·         यात तुमच्या व्यवसायाला त्याला(तिला) निवडून दिल्यास काय फायदा होईल इथपासून ते माझ्या कुटुंबातील लेकी-बाळी रस्त्यावर बिनधास्त फिरू शकतील का हे बघावे.
 • ·         शेवटी तुमच्या हितातच देश हित आहे.
 • ·         तुमच्या पसंतीच्या उमेदाराला तुमचे प्रश्न माहित हवेत आणि त्यांच्या गांभीर्याची जाणीवही त्याला हवी. त्या सोबतच ते लोकसभेत मांडण्याची क्षमता किंवा सोप्या भाषेत ‘अक्कल’ ही असावी.
 • ·         सगळ्यात म्हत्वाचे उमेदवार मेहनती असावा. भले त्याच्या पक्षाची सत्ता नसेल ही केंद्रात तरी आहेत ते निर्णय आणि धोरणे शासन व्यवस्थेकडून व्यास्थित राबवून घेण्यासाठी पाठपुरावा करणारा असावा.
 • ·         तुमच्याकडील उम्मेद्वार (किंवा त्याचा बाप, भाऊ, आई, बहिण, बायको इतकेच काय तर सासू सासरा (रे?) ही) वर्षानुवर्षे सत्तेत (लोकसभा/विधानसभा/झेडपी ई.) असून ही, या वेळस परत विकासासाठी मी हे करेल आणि ते कारेल अशी आश्वासने देत असेल, तर समजून घ्या नवीन उम्मेद्वार निवडण्याची वेळ आलीये. कारण अनेक वर्षे सत्तेत असलेल्यांनी ‘काय करेल या पेक्षा मागील संधीत काय केले’ याचा कित्ता गिरवायला हवा. म्हणजे ‘वन रिपीट प्रॉमिस आणि उमेदवार तुमच्या यादीतून बाहेर’ हा नियम लावल्यास विचार करण्यासाठी यादी खरेच खूप छोटी होते.
 • ·         एक अतिशय महत्वाचा मुद्दा उम्मेद्वार जितका जुना म्हणजे प्रस्थापित राजकारणी, तितकी त्याची जनतेला आणि व्यवस्थेला मूर्ख बनवण्याची क्षमता! तो इमानदार असेल तर या क्षमतेचा उपयोग करणार नाही आणि भ्रष्ट असेल तर रजनीकांत सुद्धा त्याचे काही करू शकत नाही!
 • ·         म्हणून या ‘निवडणुकीत तरी’ नवीन आणि प्रामाणिक चेहऱ्यांच्या मागे उभे राहणे हिताचे ठरेल
 • ·         खरे पहिले तर निवडनुका धोरणांवर लढवल्या जाव्यात – फक्त व्यक्तीवर नव्हे. म्हणून अपयशी झालेल्या धोरणांना पर्यायी, दूरगामी आणि सर्वसमावेशक अशी धोरणे देणारे नेतृत्व असावे. नसता व्यक्ती बदलतील पण धोरणे तीच राहिल्यास – तुमच्या दारातला रस्ता कला ही तसाच होता आणि उद्या ही तसाच राहील. तुमचा मुलगा कालही नोकरी शोधत होता आणि उद्या ही ‘शोधतच’ असेल. तुमची तरुण मुलगी काल ही कॉलेजला  एकटी जायला भ्यायची आणि उद्याही भीतच जाईल.
 • ·         एकंदर काय तर धोरणे आणि त्यांना राबवणारी प्रामाणिक यंत्रणा आपण निवडून देत नाही तोवर तुमचे देव, खुदा आणि सक्षात राजानिकांतच काय तर मकरंद अनासपुरे ही भले करू शकत नाही.
 • ·         जात आणि धर्म पाहून मतदान करणार असाल तर – त्या आधी अर्धा किलो पेडे घेऊन स्वजातीय उमेदवाराच्या घरी आपल्या मुला किंवा मुलीचे स्थळ घेऊन जावे. लग्न जमल्यास “पेडे घ्या पेडे...” असे म्हणत उमेदवाराचा प्रचार करत यावे; नाही जमल्यास, ‘उचित स्वजातीय वधू-वर सूचक मंडळाकडे’ जावे. निवडणुकीसाठी आता इतरांचा विचार केला तरी चालेल.                     
 • ·         शेवटी तुमच्या मतदार संघात तुम्हाला जो योग्य वाटतो असा उमेदवार निवडावा, ‘हवा - पाणी किंवा लेहर नावाची कोल्ड्रिंक’ यांच्या भानगडीत पडू नये.


२०१४ ची लोकसभा निवडणूक या देशातील लोकशाही व्यवस्थेचे एक महत्वाचे वळण आहे. लोकशाही मूल्यात विश्वास ठेवणारांसाठी ह्रिदय विकाराचा झटका आणणारीही असू शकते किंवा मग आनंद अश्रूही. पण ते ठरेल ते जनतेच्या ‘स्वहित’ बघण्याच्या कुवती वरूनच!

म्हणून, या निवडणुकीत बोटाने नको तर डोक्याने मत दया!
                                                                                                                   जय हिंद!


      

No comments:

Post a Comment