Friday, July 1, 2011

कापूस उत्पादन वर्तमान आणि भविष्य

राजेंद्र देशमुख यांची प्रहार वरील पोस्ट जिजाऊ.कॉम वर पोस्ट केली आहे तिचा काही भाग
--

खेळ... उंदीर, मांजराचा... कपाशीचा !

अखिल भारतीय जीनर्स मिट मधील निष्कर्ष... हे पूर्णपणे शासनाची कृषी विषयक धोरणे व निर्यात धोरणांवर प्रश्न चिन्ह लावणारे आहेत. आजमितीस देशातील विविध राज्यांमध्ये... गुजराथ-१५ लक्ष गाठी, महाराष्ट्र-१८ लक्ष, मध्यप्रदेश-४ लक्ष, आंध्रा-४ लक्ष, उत्तर भारत-१.५ लक्ष, कर्नाटक-२.५ लक्ष, सी.सी.आय.-५ लक्ष, विविध एक्स्पोर्टर्स-१५ लक्ष व शेतक-यांच्या घरात न विकता पडून असलेला-१५ लक्ष ... कापूस गाठी, विक्री विना देशात पडून आहेत. म्हणजेच देशात एकूण ८० लक्ष कापूस गाठी, विक्री विना तश्याच पडून आहेत.

मागील खरिपाच्या शेवटी... जेंव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत... कपाशीला मोठ्या प्रमाणात मागणी होती व कपाशीचे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव चांगलेच आकाशाला भिडले होते... तेंव्हा त्यांचा लाभ शेतक-यांना मिळू न देता... फक्त देशांतर्गत उद्योगांना संरक्षण (?) पुरविण्याच्या उद्देशाने... शासनाने कपाशी निर्यातीवर आंशिक बंदी लादून... फक्त ५० लक्ष कापूस गाठींच्या निर्यातीला परवानगी दिली. उर्वरित ८० लक्ष गाठी देशातच विक्रीविना पडून राहू दिल्यात... व प्रत्यक्ष पने उद्योगांना फायदा पोचविण्याचे षडयंत्र राबविले.

ह्या खेळात... जेंव्हा बाजारात कपाशीचे भाव ६ हजार रु. च्या वर गेलेत... तेंव्हा सुद्धा आपण राबवीत असलेले षडयंत्र व त्यानुषंगाने बाजारात निकट भविष्यात उद्भवणा-या विकट परिस्थिती बाबत... कुठल्याही शासकीय यंत्रणेने, व्यावसायिक संस्थेने किंवा सतत मिडीया मध्ये आपल्या ज्ञानाची डिंग पिटणा-या बाजार विश्लेषक व तज्ञांनी... शेतक-यांना वेळीच सावध करण्याचे टाळण्याचे कुकर्मच केले. त्याच्या फलनिष्पत्ती स्वरूप... आज पावसाळा लागून महिना लोटला असतांना सुद्धा... शेतक-यांच्या घरात १५ ते २० लक्ष गाठी बनतील, एवढा कापूस... विक्री विना पडून आहे. आज मितीस आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव गडगडल्याने... शेतक-यांच्या हातात... फक्त... २ हजार ते २२ शे रु. बाजार भाव पडत आहे. म्हणजे सरासरी ... प्रती क्विन्टल ३ हजार रु. ने शेतक-यांचे नुकसान घडवून आणण्यास शासनाने हातभारच लावला आहे.

आधीच नुकसान झेलणा-या, ह्या शेळपट शेतक-यांचे... येणा-या खरिपाच्या नियोजना करीता सुद्धा... शासनाने कुठलेही प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला नाही. फलस्वरूप यंदाही शेतक-यांनी आपल्या शेतीत कपासिचा पेरा, मागील वर्षी पेक्षा वाढविला आहे. ह्या खरीपात सुद्धा शासनातर्फे बियाणे कंपन्यांच्या
षडयन्त्रास, मदतच केल्या गेली व वाढीव दराने व काळ्या बाजारातून कपासी बियाणे विकत घेण्यास शेतक-यांना भाग पाडले. शेतकरी पूर्णपणे नागविल्या गेला... ह्याचे सोयरसुतुक कुणालाच राहिले नाही... अन... मूर्ख शेतक-याला सुद्धा त्याची जाणीवही नाही... हे त्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल.


पूर्ण येथे वाचा : http://jijau.com/?q=node/32

No comments:

Post a Comment