Sunday, February 13, 2011

अजित दादा आणि पत्रकार या विषयवार अगदी समतोल आणि योग्य भाष्य ...

अजित दादा आणि पत्रकार या विषयवार अगदी समतोल आणि योग्य भाष्य करणारी एक छान पोस्ट "आगळ वेगळ" वर
नांदेड येथील सभेतून अजितदादा विरुद्ध पत्रकार अश्या सरू झालेल्या वादावर, पुतण्याच्या वतीने काका शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीनंतर पडदा पडला. या रंगलेल्या नाट्याला उभ्या महाराष्ट्राची जनता साक्ष आहे. हा प्रश्न दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला होता, मात्र यात सरशी दादांचीच झाली आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

आणि हे नाकबूल असणारांनी, हा वाद 'मोठ्या साहेबाविरूध्द' होता का?, पत्रकारांना माफीची अपेक्षा कुणाकडून होती? या प्रश्नाची उत्तरे शोधावीत.
सुमारे आठवडा ऊलटूनही दादांनी तर पत्रकारांना हिंग लावूनही (आजपर्यंतही) विचारले नाही. याची बोच पत्रकारांच्या मनात सलत होतीच. जी कृती पत्रकारांनी करायची होती ती केली दादांनीच, त्यांनी पत्रकारांना अनुल्लेखाने मारले.
या प्रकरणामुळे आणखी एक सिद्ध झाले की, अजित पवार यांच्यावर दबाव आणण्याबाबत काकापासून मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांच्याच मर्यादा स्पष्ट झाल्या. या प्रकरणाची कोंडी फुटण्याची चिन्हे दिसत नसतानाच, इलेक्ट्रॉनिक मिडीयाने विजय मिळाल्याच्या आविर्भावात 'शरद पवार' यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची ब्रेकिंग न्यूज द्यायला सुरुवात केली. त्यात मोठ्या साहेबांचा 'आदर' ठेवून हा वाद संपवीत असल्याचे कारण द्यायलाही ते विसरले नाहीत.
आता येथे प्रश्न हा निर्माण होतो की, जर मोठ्या साहेबांचा आदर ठेवायचा होता, आणि त्यांच्या दिलगीरीवर समाधान होणार होते तर, हा वाद झाल्याबरोबर पत्रकारांनी त्वरित शरद पवारांशी संपर्क साधून हा वाद त्वरित संपवायला हवा होता. मग त्यांनी तसे का केले नाही? ...

No comments:

Post a Comment