Friday, October 8, 2010

अमेरिकेचे रक्षण मुंबईकराच्या हाती

सौ : म. टा.

अमेरिकेच्या अत्यंत संवेदनशील वास्तूंच्या रक्षणासाठी विशिष्ट कम्प्युटराइज्ड प्रणाली शोधून काढणा - या मिलिंद तांबे या मुंबईकर तरुणाचा अमेरिकेत नुकताच सत्कार केला. अमेरिकेच्या संसदीय व्यवस्थेचे मुख्यालय असलेल्या कॅपिटॉल हिल्स येथे हा सोहळा झाला.

अमेरिकन सरकारचे अनुदान घेणा-या ख्रिस्तोफर कोलंबस फेलोशिप फाऊंडेशनने तांबे यांचा सत्कार केला आणि त्यांना पंचवीस हजार डॉलर्सचा पुरस्कार दिला.

अतिरेकी लक्ष्य करण्याची शक्यता असलेली ठिकाणे आणि हाती असलेले मनुष्यबळ यांची सांगड घालणारा प्रोग्रॅम तांबे यांनी कम्प्युटरच्या सहाय्याने तयार केला. या प्रणालीमुळे अतिरेक्यांना नेमके कोणत्या ठिकाणी कधी आणि केव्हा किती संरक्षण असेल याचा अंदाज करणे अशक्य बनते.

रोज ठराविक वेळी संरक्षण व्यवस्थेच्या प्रमुखाला, कम्प्युटरद्वारे आखणी केलेला प्रोग्रॅम मिळतो. त्यानुसार संरक्षण व्यवस्था आखली जाते. ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी तांबे यांनी गेम थिअरीचा देखिल उपयोग केला आहे. तांबे यांच्या प्रोग्रॅमचा वापर अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आला आहे आणि त्याचा फायदाही दिसून आला आहे.

मिलिंद तांबे या तरुणाचे प्राथमिक शिक्षण नागपूर येथे झाले. नंतर तो मुंबईच्या विल्सन हायस्कुल आणि ठाणे येथील सरस्वती हायस्कुलमध्ये शिकला. पुढे त्याने ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. बारावीला मेरिट लिस्टमध्ये आलेल्या मिलिंदने बिट्स पिलाणी येथून कम्प्युटर सायन्समधून एमएससी केल्यानंतर अमरिकेतल्या पिटसबर्ग येथील कार्नेजी मेलॉन विद्यापीठातून आटिर्फिशियल इंटिलिजक्समध्ये डॉक्टरेट मिळवली. सध्या मिलिंद तांबे साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रोफेसर आहेत. त्यांच्या हाताखाली पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तांबे यांचा आदर्श गुरू (मेंटॉर) म्हणून सत्कार केला आहे.

तांबे यांचे वडील शशीकांत तांबे हे राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव म्हणून निवृत्त झाले. रस्ते आणि पूल हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. राज्यातील रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून त्यांच्या समितीने महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या. मिलिंद यांची आई उषा तांबे या साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा आहेत.


No comments:

Post a Comment