BREAKINGआगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची पताका फडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कुशल संघटनात्मक नेतृत्वाखाली आज पुणे शहर भाजपची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.
BREAKINGपिंपरी-चिंचवड, पुणे येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 'स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण' या पुतळ्याला ४ हजार ११२ ढोल-ताशा वादकांनी सलग साडेपाच मिनिटे ढोल वाजवून मानवंदना दिली. या ऐतिहासिक कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा राजकीय वापर करणाऱ्यांना चित्राताई वाघ यांचा चांगलाच दणका
BREAKINGमहाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.