BREAKING
आयुष्यात सगळं काही सुरळीत चाललेलं असताना अचानक पायाखालची जमीन सरकावी आणि आभाळच डोक्यावर कोसळावं, असा प्रसंग प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी येतो. फरक एवढाच असतो की, काही लोक त्या परिस्थितीसमोर हात टेकतात, तर काही जिद्दी माणसं संकटांच्या छाताडावर पाय रोवून स्वतःचं नवं नशीब घडवतात. ठाण्यातील रामचंद्र नगर (वैतीवाडी) येथे राहणाऱ्या प्रविण ऊर्फ प्रदीप माणिक काटकर यांची ही गोष्ट अशाच एका पराक्रमी संघर्षाची आणि अथांग जिद्दीची आहे.

साताऱ्याच्या मातीतून मुंबईत येऊन क्रॉफर्ड मार्केटमध्ये 'MK Dry Fruits' ब्रँड उभा करणाऱ्या मनीष कदम यांची प्रेरणादायी यशोगाथा.