ब्रेकिंग न्यूजनाशिक जिल्हा मच्छिमार व कृषी सहकारी संघ मर्यादित, नाशिक यांच्यावरील अंतरिम अवसायनास तात्काळ स्थगिती देऊन जिल्ह्यातील सुमारे दोन हजार मच्छिमार कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

राज्यातील पेसा (PESA) क्षेत्रातील १३ जिल्ह्यांमधील रिक्त पदे विशेष मोहिमेद्वारे भरण्यासाठी तात्काळ आवश्यक पावले उचलावीत. पात्र अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही पदभरती प्रक्रिया नियमानुसार, पूर्णतः पारदर्शक आणि निश्चित वेळेत पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले आहेत.
ब्रेकिंग न्यूज'समग्र'च्या सहकार्याने महापालिकेच्या सेवा अधिक गतिमान होणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'पार्टिसिपेट मुंबई'चे उद्घाटन