Saturday, April 13, 2013

राष्ट्राच्या प्रगतीचे पहिल्या फळीतील शिलेदार : बाबासाहेब आंबेडकर



भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१४ एप्रिल १८९१ -- ६ डिसेंबर १९५६

समानतेच्या दीपाला, जाती आणि धर्मात विभागलेल्या राष्ट्राला 'भारत' हीच एक ओळख देणाराला आणि इथून पुढे घडणाऱ्या क्रांतीची मशाल अनेक वर्षे आधीच पेटवून जाणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. भारताच्या प्रगतीला सर्व समावेशक स्वरूप देवून गतिमान करणाऱ्या महापुरुषाची आज जयंती.   
                            भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जय भीम. जय हिंद.

Wednesday, April 10, 2013

११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती

आज ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती.     
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा 


खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती ...
सामान्य माणसांसाठी .. दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले.

याच महात्म्याने रायगडावर शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, त्या समाधीची रीतसर पूजा करून शिव जयंतीची सुरुवात केली. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना "कुळवाडी भूषण" म्हणून संबोधिले . त्यांनी "शेतकऱ्यांचा आसूड " या पुस्तकातून आमच्या बळीराजाचा आवाज उठवला. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा हा खरोखरच जगासाठी एक प्रेरणा आहे. शिक्षणाची गंगा सामान्य अति-सामन्यांच्या पर्यंत पोचवणारा हा भगीरथ .. ज्याने केवळ आणि केवळ सत्याची कास धरून आपल्या या महाराष्ट्राचा वैचारिक, सामाजिक कायापालट केला.

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खर खुरा स्वतंत्र मिळवून देणारा हा महात्मा.

ज्यांचा वैचारिक वारसा घेउन अगदी कणखर पणे आपली वाटचाल करणार्या महाराष्ट्राचा त्यांच्या त्या अफाट कर्तुत्वास कोटी कोटी प्रणाम! आणि महाराष्ट्रातील तरुण पिढीकडून त्यांचा वसा चालवला जावा ही अपेक्षा!

जय हिंद .. जय महाराष्ट्र ....!

Tuesday, April 9, 2013

शिक्षण क्षेत्रात संधी

नौकरीची संधी


अधिक माहिती : http://mkf.org.in/

Sunday, April 7, 2013

पुढच्या इलेक्शनला लोक मुतणारच आहेत ... पण तुमच्यावर

अजित पवारांनी केलेले वक्तव्य हे शरद पवारांच्या गोटात घडलेल्या व्यक्तीचे नाहीच. अतिशय असंवेदनशील आणि बेजबाबदार असे पाणी टंचाई आणि भारनियमन याबद्दल केलेले वक्तव्य आहे. तुम्हाला एक फुकटचा सल्ला. आता तुम्ही सुद्धा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक ऑर्केस्ट्रा काढा.


आजपर्यंत जनता सहन करत आहेच पण अशीच बेजजबाबदारी आणि उथळपण हे सरकार करत राहिले तर सेनेचे दिवस परत यायला वेळ लागणार नाही. असो. आता कदाचित बदल हवाच आहे. सत्ताधर्यांच्या दुसर्या टर्मचा उन्माद खरच राग आणणारा आहे. सुजान जनता यांच्या मुताचे ओघळ घरात येण्या पूर्वीच यांना सत्तेतून बाजूला करेल ही अपेक्षा.       

Tuesday, March 19, 2013

निषेध आणि कारवाई नको - तुडवा

मज चढलेल्या राजकीय वृत्तीचा फक्त पुणेरी निषेध करून थांबलोत तर शिवरायांचे मावळे म्हणून घेणे चूक आहे. उनम्मत सरदारांच्या, देशमुखांच्या आणि पाटलांच्या हातातली सत्ता लोक केंद्रित करून क्रांती करणाराच्या वारसांना हे दिवस बघावे लागणे लाजिरवाणे आहे.
आता यांना पब्लिकमधे आल्यावर तुडवा
नाही तर
निवडणुकीच्या मैदानात तरी तुडवा!

जय महाराष्ट्र!    

Tuesday, March 12, 2013

यशवंतराव चव्हाण जन्म शताब्दी वर्ष सांगता



महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दी वर्षाची आज सांगता. आज ही जन्म शताब्दी वर्षाची सांगता जरी असली तरी त्यांच्या चिरंतन विचारांचा वारसा कायमच समस्त महाराष्ट्रीय माणसांच्या मनात राहणार आहे.

शेंबड्या पोरांच्या आणि हौशी राजकारणापासून दूर नेणारे लोकभिमुख आणि प्रगल्भ राजकीय विचार या राष्ट्राच्या आणि राज्याच्या मातीत आता पुन्हा मुरोत हीच मुख्यमंत्री डॉट कॉम ची या दिनी शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना.

यशवंतरावांच्या  विचारांच्या आणि संस्कारांच्या  मशाली कायम कुठे ना कुठे पेटत राहतीलच.

जय महाराष्ट्र!

या जन्मशताब्दी वर्षा निमित्य यशवंतराव आणि विधायक राजकारण या विषयावरील काही लेख येथे वाचायला मिळतील  

http://www.mukhyamantri.com/2012/03/blog-post_11.html


Sunday, March 10, 2013

११ मार्च - संभाजी महाराज पुण्यतिथी


संभाजी महाराजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
संभाजी राजे,
तुमच्या विचारांनी लागलेली आग अजून विझलेली नाही,
पण अजूनही हवी तशी, राजे, चळवळ अजून तापलेली नाही!
---
ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलया पेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
ज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.
इतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई न हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी ३-४ दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली
शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले होते, अतिशय दूरदर्शी पणाने त्यांनी सागरी शक्तीचे महत्व ओळखून आरमारही स्थापना केली होती, पुढे याच सागरी आरमाराला चौपटीने वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. चंगेखान नावाच्या अरबी सरदार कडून नाव नवीन युद्ध नौका तयार करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले, मराठा आरमार अतिशय प्रबळ आणि प्रभावी बनवले.
टोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत. त्यांच्या साडे आठ वर्षाच्या कालावधी मध्ये एक हि बंड झाले नाही . तमाम मराठा समाज त्यांच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य चौपटीने वाढवण्याचे कार्य संभाजी राजांनी केले.
याच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव "सात-सतक" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही . भाषेचे प्रचंड प्रभुत्व असलेला हा राजा.
खुद्द औरंजेब दक्खन स्वारीवर आलेला असतांना त्या पापी औरंग्याला तब्बल ८ वर्षे सीमेवर हात चोळीत बसावयास भाग पाडीले, त्याला १ किल्ला सुध्दा जिंकता येऊ नये यातच संभाजी राजांचे राजकारणी, रणधुरंधर व्यक्तीमत्व सिध्द होते.केवळ एका जहागिरीपोटी नाराज झालेल्या गणोजी शिर्के नामक हरामजाद्याने स्वतःच्या बहिणीच्या कुंकुवाचा लिलाव मांडत मोगली सैन्याच्या तोंडात महाराजांच्या रुपाने आयता घास दिला.
स्वकीयांनीच विश्वास घात करून संभाजी महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः ला हा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.
संभाजीराजांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.
याच संभाजीचा चारित्र्य हनन करण्याचे काम आमच्याच काही हरामखोर बखरकारांनी आणि इतिहास करांनी केले आहे, खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही. पण सूर्याचा प्रकाश किती काळ लपवून ठेवणार एक दिवस तरी आमच्या तमाम मराठी लोकांच्या डोक्या मध्ये हा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी शिवाजी राजांचा राजांचा पुत्र म्हणजे सिंहाचा छावाच. आणि ज्या जिजाऊ ने शिवबा घडवला त्याच जीजौंच्या संस्कारात वाढलेला शंभू बाळ कसा काय रंगेल ठरवला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे या स्वराज्यचे संस्थापक तर याच महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती म्हणजेच संभाजी महाराज हे या स्वराज्याचे संरक्षक म्हणून होते.
उगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश जसा घर घर पर्यंत पोचतो त्याच प्रमाणे माझ्या या शूर शंभू राजांचा इतिहास आमच्या घर घर पर्यंत पोचावा असे आवाहन आपल्याला जिजाऊ.कॉम परिवार तर्फे करण्यात येत आहे.
जय जिजाऊ .. जय शिवराय .. जय संभाजी

Monday, February 18, 2013

छत्रपती शिवाजी - एक अलौकिक, असामान्य आणि अद्वितीय व्यक्तिमत्व !!!



१९ फेब्रुवारी - युगपुरुषाची ३८३ वी  जयंती.

सह्याद्रीच्या दऱ्या - खोऱ्यातून, रात्रीचा दिवस करून,  क्षणाचीही उसंत न  घेता या महाराष्ट्राच्या मातीसाठी, स्वराज्यासाठी लढणारा पराक्रमी योद्धा ! याच मराठी मातीतून ज्यांनी  एक एक मावळा जोडला आणि त्यांच्या मनामध्ये स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटविले. स्वराज्यासाठी - गुलामगिरी मिटवण्यासाठी त्यांच्यातील स्वाभिमानाला कायम पेटते ठेवले.
शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून या राजाने स्वराज्य स्थापन केले, स्वातंत्र्य म्हणजे काय याची पहिली जाणीव आमच्या रयतेला याच  राजाने करून दिली.
हा स्वराज्य निर्मितीचा संघर्ष फार मोठा; अगदी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण म्हणजे संघर्षच !! सबंध आयुष्य स्वराज्य निर्मिती च्या कार्यामध्ये स्वतः कधी हि मखमली गालिच्यावर न झोपलेला, गड किल्ल्यांवर , उन्हा - पावसात , कडाक्याच्या थंडीत केवळ आणि केवळ घोडदौड.. हि घोडदौड स्वराज्य वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि  जास्तीत जास्त माणूस  जुलमी  सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीi.
राजे आपल्या याच मावळ मातीतील आपल्या रान गड्यान सोबत त्यांच्या प्रत्येक सुख - दुखामध्ये सामील होत, त्यांच्या मध्ये एक विलक्षण असे प्रेम आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले होते. "शिवबा" या एका नावामध्ये एक अद्भुत अशी जादू होती कि तमाम मराठी माणूस एका आत्मविश्वासाने या नावामागे उभा राहू लागला. अति बलाढ्य आणि पराक्रमी शत्रू विरोधातही आपण दोन हात करू शकतो हि प्रेरणा त्यांच्या मध्ये निर्माण झाली. स्वराज्य तर निर्माण झाले पण ते प्रत्येकाला आपलेसे वाटावे म्हणून राजे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचे ! इतिहासात कधी हि न झालेली रयतेची कामे छत्रपतींच्या देखरेखीखाली पार पडली, स्वराज्य उभे राहू लागले, ते चौफेर वाढू लागले पुढे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींनी म्हणजेच संभाजी राजांनी हेच स्वराज्य चौपट वाढवण्याचे काम केले.आजच्या या प्रसंगी या महान आणि जाणत्या राजाची क्षणाक्षणाला आठवण व्हावी याचे कारण म्हणजे आज आमचा हाच महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय, पाण्यावाचून अक्ख गाव आणि गाव स्थलांतरीत होत आहे. शेकडो किलो मीटर केवळ ओसाड जमीन, जनावरांचे सांगाडे आणि कोरड्या पडलेल्या नद्या आणि नाले. हे भयंकर चित्र आहे महाराष्ट्रातील काही भागातले.
आज आपला देश बळीराजाच्या कृपेने अन्न धान्याच्या बाबतीत संपूर्ण आत्मनिर्भर आहे, कोट्यांनी धान्य  गोदामामध्ये पडून आहे परंतु स्वातंत्र्यानंतर प्रथमच हा पिण्याच्या पाण्यासाठीचा भयंकर दुष्काळ ओढवला आहे. अजून उन्हाळा सुरु व्हायचा आहे आणि थेंब भर पाण्यासाठी महाराष्ट्र तहानलेला आहे, जिथे माणसांची सोय नाही तिथे पाण्या अभावी, चाऱ्या  अभावी जनावरांचे काय हाल! 
एकीकडे एवढी गंभीर परिस्थती असतांना दुसरीकडे आमची सबंध राजकीय व्यवस्था हि या प्रसंगाचेहि  राजकारण करायला मागे पुढे पाहत नाहीये, ज्या शिवरायांच्या नावाने हे लोक राज्य चालवतात त्यांच्याकडून निदान थोडातरी आदर्श यांनी घ्यायला हवा.
काळ फार कठीण आहे,  या मातीवर आलेले संकट उलटवून लावण्यासाठी आता आपल्यालाच उभे राहावे लागेल. ज्या शिवरायांनी हे स्वराज्य स्थापन केले त्या मातीचे येणाऱ्या प्रत्येक संकटापासून सरंक्षण करणे हे प्रत्येक शिवरायांना मानणाऱ्या शिवप्रेमींचे कर्तव्यच. महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम  महाराष्ट्र आणि इतर काही भागात पडलेल्या दुष्काळा बाबतीत काही तरी ठोस करण्याची आज आपण शपथ घेऊ. थेंबभर पाणी वापरतांना देखील आपल्या दुष्काळी भावंडांचा निदान विचार तरी आपण करू शकतो. पाण्याचा अतिशय जपून वापर करून याची सुरुवात आपण आपल्या घरापासून करू शकतो.
अगदी काल  पर्वाचा एक प्रसंग ; जालना जिल्ह्यातील लाडसावंगी या एका लहानश्या खेड्यातील एका शेत मजुराचा चिमुकला "अजय" या पाण्यासाठी टेंकर मागे धावतांना चाकाखाली चिरडून मारला गेला. आज गावागावा मध्ये हे भयाण चित्र दिसत आहे, पाण्यासाठी आमच्या बाया - बापड्या, लहान लेकरं, वयोवृद्ध नागरिक धावतांना दिसत आहेत, शहरातही काही वेगळी परिस्थती नाहीये.

आज माझ्या घरात व्यवस्थित पाणी येत आहे म्हणून मला काय त्याचे,  म्हणून या दुष्काळाकडे बघू नका ! आज दुष्काळ काही भागां पुरता मर्यादित आहे पण लवकरच याची झळ सबंध महाराष्ट्राला बसल्या शिवाय राहणार नाही.
ग्रामीण - शहरी भागातील अडल्या - नडल्या साठी आप आपल्या परीने होईल ती मदत करण्याचे आवाहन जिजाऊ.कॉम  आपल्या सर्वांना करत आहे.

छत्रपती शिवराय असंख्य संकटांना सामोरे गेले, त्यातून कित्येक वेळा बचावले ते केवळ आणि केवळ त्यांच्या वर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या सोबतीने.

याच शिवरायांचे आपण सर्व मावळे ! आज महाराष्ट्रावर आलेल्या या संकटाला एकत्रित पणे सामोरे जाऊ. या प्रसंगाला निभावून नेण्यासाठी काय करता येईल या साठी तुमची बौद्धिक, आर्थिक आणि सामाजिक ताकद गरजेची आहे.

तुमच्या काही संकल्पना असतील, कुठे काही गरज असल्याचे लक्षात आले असल्यास कृपया पुढे या, संपर्क करा. आम्ही आणि आमच्यासारखे अनेक तुमच्या तुमच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी उभे राहतील हा विश्वास आहे.

मराठी मातीच्या या जाणत्या राजाचे , एका दृष्ट्या युगपुरुषाचे हेच खरे स्मरण !!!!!

शिवरायांच्या चरणी आमचा मानाचा मुजरा !!!!!!

जय जिजाऊ  - जय शिवराय 

कार्यकर्ते जिजाऊ.कॉम 
www.jijau.com 

(या संकटाचा सामना करण्यासाठी काय करता येईल या साठी हि तुम्ही तुमच्या काही संकल्पना सांगा. 

जिजाऊ.कॉम तर्फे या दुष्काळामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात  ग्रामीण भागातील कुठल्याही  मुलाच्या शिक्षणात खंड पडू नये, शिक्षणातून गळती होऊ नये  या साठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. शक्य होईल तेवढ्या गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वह्यांचे आणि इतर काही शालेय साहित्य वाटप ई . उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे. अशाच प्रकारचे किवा काही इतर कार्यक्रम आपण आपल्या पातळीवर घ्यावेत असे तुम्हाला आवाहन. प्रसंग बाका  आहे, येणारा काळ कठीण आहे.  प्रत्येकाने जपून पाऊले उचलली तर याही संकटाला आम्ही शिवरायांचे मावळे उलथवून लाऊ अशी आम्हाला आशा आहे.)


Tuesday, January 29, 2013

तुम कायको टेन्शन लेते!

ज्या देशात राजकारण्यांचे शक्ती प्रदर्शन तलवार उंचावून होत असेल तेथेच गांधी अहिंसेसाठी आणि बाबासाहेब शिक्षण व लोकशाही साठी होवून गेलेते यावरचा विश्वास उडतो. 'समोर येईल त्याला अडवा पाडू' अशी भाषा वापरून राजकारण करणारे काय घ. न. टा. लोकहिताचे निर्णय घेणार? अर्रर्र चुकल की, जिथ मराठ्यांची राजकारणातली, बामणांची शिक्षणातली आणि मारवड्यांची धंद्यातली मक्तेदारी सगळ्यांनीच गपगुमान मान्य केली तिथ अजून काय एक्सपेक्ट करणार? हो एक करणार ना - यांना सोडून सगळ्यांचे बाय डीफाल्ट पुरोगामी पण. चलने दो, सब ठीक है. आल इस वेल. तुम कायको टेन्शन लेते!

Monday, January 21, 2013

आतंकवाद भगवा की हिरवा यात बुडालेले आमचे सत्ताधारी



एकीकडे हे असे असतांना आतंकवाद भगवा की हिरवा यात बुडालेले आमचे सत्ताधारी आणि अपोजिशन. एका डोळ्यात या भागीनिसाठी पाणी आणि दुसऱ्या डोळ्यात नुसते गप्पांचे गुऱ्हाळ मांडणाऱ्या राजकारण्यान बद्दल संताप. असो. भारतीय 'काही' हिंदूंच्या, मुसलमानांच्या, ख्रिस्चानांच्या, जैनांच्या आणि अगदी बौद्धांच्याही बेगडी धर्मावादावर बोलायचय, पण थोडा वेळ आहे. तितकच काय पण स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या अनेक संघटनांच्या दुटप्पी धोरणावर आणि कर्तुत्वावर ही खूप काही बोलायचंय. बर गैरसमज होऊ नये म्हणून थोडा सांगतोच. ज्या प्रकारे सगळ्या धर्मातील लोक आपापल्या मंदिरात, मशिदीत, चर्च मध्ये किंवा मग विहारात इतर धर्माबद्दल चर्चा करतांना 'ते अशे आणि ते तशे' अशा मिटक्या मारून गप्पा मारतात, त्यावरून तर विविधतेत नटलेला आणि एकसंध भारत खरच किती एकसंध आहे यावर संशय येतो. या चर्चा जवळपास सगळीकडे होतात. अगदी पुरोगामी आणि सहिष्णू म्हणवणाऱ्या वारकरी संप्रदायात ही. पण याच मूळ कारण तो धर्म किंवा पंथ नसून त्याचा राजकारणासाठी आणि वर्चस्व कायम ठेवण्यासाठी उपयोग करणारे धूर्त सामाजिक, धार्मिक आणि राजकीय नेतृत्व आहेत. अजून खूप काही मांडायचय पण धीराने.