Saturday, January 19, 2013

राष्ट्राच्या भविष्याचा वेध - माजलेले नेतृत्व, घाबरट आणि स्वार्थी नागरिक - पुढे काय?

या राष्ट्रातच काय पण कुठे ही या पूर्वी जगण्याचा फार असा आमचा अनुभव नाही. विचारलच तर अभ्यास ही फार नाही. पण तरीही जितक कळलंय त्यावरून अगदीच भितीदायक अशा भविष्याकडे वाटचाल होतीये असे वाटते. अनेकदा 'आशा' लागते हे सगळे सुधारेल म्हणून. पण बऱ्याच वेळेस नुसता भ्रमनिरस होतो.

मानवाच्या सुसंकृत होण्याकडचा प्रवासच वेगळ्या वाटेला लागलाय अस वाटायला लागत. कदाचित देव ही संकल्पना याच प्रवासात माणसाला आधार म्हणून सोबत करण्यासाठी पूर्वजांनी शोधली असावी. आणि आपण बावळटांनी सगळा प्रवासच तिच्या नावे  लिहून आजचा दिवस कसा 'मजेत' जाईल यावर फक्त लक्ष केंद्रित केलेय.
अगदी गेल्या ५ वर्षातल्याच भारतात घडलेल्या घटना नीट बघितल्यास आपला प्रवास अंधाकाराकडे आहे हे निश्चित होते. राजकारण्यांनी केलेला भ्रष्टाचार लोक जसे जसे जास्त शिकतील तसा तसा खरेतर कमीच व्हायला हवा. पण घडतंय काय तर उलटे. दिवसेन दिवस भ्रष्टाचाराचे आकडे वाढतेच. करातला तितका पैसा खाल्ला म्हणून तर राग आहेच पण, त्याही उपर लोकांबद्दलची आस्था आणि त्यांच्या प्रश्नाबद्दलची संवेदनशीलता नष्ट होण्याच्या मार्गाला लागलीये याचा फार राग येतो. करोडोंच्या देशात मोजकेच शहाणे उरलेत की  काय? शेंबूड पुसणारे पोरही आम्हाला आमचे नेतृत्व वाटायला लागते तेंव्हा सक्रिय राजकारणात तळमळीने प्रामाणिकपणे ज्यांनी XX घासलीये त्यांच्या उदेश्यावर ही संशय घ्यावासा वाटतोय. मोजके सोडले तर दादा, भाऊ, बंटी असल्या चिरकुटा शिवाय कुणाचे राजकारण नाही. इतके सारे सुशिक्षित आपल्याकडे आहेत, तेथे ही जर असलेच शेंबडे निवडून येणार असतील तर तुमच्या शाळेच्या सरर्टिफिकेटवर नक्कीच संशय  येईल. पण सगळ्यांच्याच सरर्टिफिकेटवर कसा संशय घ्यावा ? म्हणजे शिक्षण पद्धतीतच असे नागरिक तयार करण्याचे शिक्षण दिले जात असावे. गुलामांच्या फ्याकट्रयाच.

मागे एका शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी या सगळ्या परिस्थितीवर हताश होवून बोलत असतांना एक अनुभव सांगितला. अतिशय लागणारा आणि मार्मिक असाच -
तर हे नेते असेच एक मोठ्या शहरातून गावाकडे ट्रेन ने निघाले होते. गाडी स्टेशनवर आल्यावर यांनी खिडकीतून एका गृहस्थाला जागा ठेवायला सांगितली. यांच्या खिशाला शेतकरी संघटनेचा बिल्ला बघून खिडकीतूनच गृहस्त म्हणाले 'अहो आजकाल तुमची शेतकरी संघटना फारच थंड झाली आहे.' आधी आत तर येवू द्या अस म्हणून शेतकरी नेते आत गेले आणि त्यांच्या समोर बसले आणि त्या गृहस्ताला त्यांचा परिचय विचारला. तर गृहस्तांनी आपण निवृत्त प्राध्यापक असून काहीतरी कामानिमित्य इकडे आलो होतो असा परिचय करून दिला. तेंव्हा आमचे हे नेते म्हंटले, तर आता सांगा तुम्हाला आमच्या शेतकरी संघटनेची थंड हवा कधी आणि कोठे लागली ते. गृहस्त शांत. पुढे नेते बोलते झाले, तर तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही सगळे शिकले लोक 'खोजे' झालेले आहात. तेंव्हा गृहस्तांनी 'खोजे' म्हणजे काय असे विचारताच नेते हसून म्हंटले, आता निवृत्त प्राध्यापक तुम्ही, तुम्हाला त्याचा अर्थ चांगला माहीत असावा. थोडेशे ओशाळले निवृत्त प्राध्यापक शांत बसलेले पाहून यांनीच त्याचा अर्थ स्पष्ट केला. तर तो असा की इस्लामी राजवटीत बादशाह लोक त्यांच्या संख्येने खूप असलेल्या बायकांच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी काही पुरुष नेमत. पण ते पुरुष नपुंसक केलेले असत. तर अशे हे 'नपुंसक केलेले संरक्षक, सेवक किंवा रखवालदार म्हणजे खोजे' अशी व्याख्या सांगताच प्राध्यापक साहेब ते आम्ही कसे? असा प्रश्नकरते झाले. नेत्यांनी अगदीच स्पष्ट करतांना म्हंटले, राजकारण्यांपेक्षा शिकलेले? तुम्ही! हुशार? तुम्ही! संखेने जास्त? तुम्ही! तरीही व्यवस्थेला तुम्ही म्हणजे फक्त राखणदार! ती आहे तशीच ठेवणे हे आपले परम कर्तव्य समजून तुम्ही तिला फक्त आणि फक्त राजकारण्यांची बनवून ठेवली. पुढे नक्कीच काहीच चर्चा झाली नसणार.

तर या नेत्यांनी आमचेही डोळे चांगलेच उघडले. सगळे अव्यवस्थेचे खापर इथच्या मजूर, गरीब आणि शेतकरी वर्गावर फोडून फक्त लिखित आणि तोंडी हिरोगिरी करणारे आमच्यासारखे शिकलेले या पापाशी आपले देणे घेणे नाही अस म्हणून बसलेत. अशात  कधी कधी मेणबत्त्या घेवून आणि काळ्या रिबिनी लावून निषेध व्यक्त करतात. बर त्याचा खरच काही उपयोग झाला असता तर नक्कीच स्तुती केली असती. पण ज्यांना कोर्टाच्या निर्णयाचाही फरक पडत नाही त्यांना तुमच्या निषेध-निषेध-निषेध चा काय फरक पडणार? आंदोलने आणि चाळवळीही जागृतीच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत इतक्या नपुंसक झाल्यात. कमीत कमी अशातल्या या काही अनुभवावरून तरी. झालेली जागृती पुढे क्षणात मिटवून टाकायला क्रिकेट, करीना किंवा मग जालीम अशे उपाय म्हणजे  तुमचे 'शायनिंग इंडिया' किंवा मग 'डायरेक्ट टू अक्काउंट' आहेच. रोज रोज होणाऱ्या बेगडी आणि चमकू चळवळीनी पोटापासून ओरडनार्यांचे आवाज ऐकूच येत नाहीत. मग खरा प्रश्न्न बाजूला राहून 'पंतप्रधान बाहेर येवून का नाही बोलला' हाच मुख्य मुद्दा होतो. मग पंतप्रधानही  फक्त  'मुख्यच' मुद्याचे उत्तर देतात. सगळे समाधानी. चार दिवस जागृतीचे. बाकीचे सगळे स्त्री भ्रूणहत्येचे, विनयभंगाचे, बलात्काराचे, समाज सेवकांच्या बदडण्याचे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे, घसरणाऱ्या रुपयाचे आणि हे सगळ तितकेही गंभीर वाटू नये म्हणून सतत टी. व्ही. वर येणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे, जिंकलेल्या क्रिकेटचे, दिलेल्या प्याकेजचे किंवा नागरिक साला भाकरीत गुंतून पडवा म्हणूनच कदाचित वाढलेल्या महागाईचे आणि व्याज दाराचे.

आपले प्रतिनिधी कसे आहेत यावरून आपण किती चांगले आणि आपण कुठे जातोय याचाच अंदाज येत असतो. देश काही मोजक्यांनाच चालवण्यासाठी आउट-सोर्स केलाय अस वागून या वेळी तरी चालणार नाही. येणाऱ्या इलेक्शनला सोमे-गोमे पुन्हा निवडून आले तर आपल्या मुली घराबाहेर पडू देवू नका, आपल्या पोरांना गुलाम म्हणून जगण्याची शिकवण द्या, घर बीर न घेता कुण्या तरी नेत्याने आणि उद्योजकाने  बांधलेल्या सदनिकांमध्ये आयुष्यभरासाठी किरायाने राहण्यासाठी समान बांधून ठेवा, मानेला ताठ ठेवण्यासाठी जसे बेल्ट मिळतात तसेच मान कायम खाली ठेवण्यासाठी बेल्ट आताच स्वस्तात मिळाले तर ते ही  घेवून ठेवा कारण येणाऱ्या काही वर्षात त्याचीही गरज भासेल. आणि नकोय अस भविष्य तर डोक्याने मतदान कुण्याही पक्षाला करा पण प्रामाणिक आणि स्वाभिमानी माणसांनाच करा.

पण फक्त त्याने चालणार नाही तर निवडणुकी पूर्वीच तुमचा कल दाखवून द्या. म्हणजे तिकिटे सुद्धा अशाच लोकांना मिळतील. इतका मोठा बदल सोप्पा नसतोच, पण तरी करायचा निश्चय आम्ही तरुणांनी मुख्यमंत्री.कॉम वर केलाय. आमच्या या प्रवासाचा भाग व्हा, सामील व्हा. आपण सगळ्यांनी सोबत प्रयत्न केले तर किती नक्कीच बदल होईल. येथे  (https://www.facebook.com/mukhyamantridotcom)  मुख्यमंत्री.कॉम ला काननेक्ट व्हा म्हणजे संपर्कात राहता येईल. डोक्यातल्या विचारांना फक्त डोक्यात ठेवले तर पश्चातापाशिवाय दुसरे काहीच करता येणार नाही. 

जय हिंद. जय महाराष्ट्र.          

Friday, January 11, 2013

आता तूच हो सावित्री अन तूच हो जिजाऊ - १२ जानेवारी "जिजाऊ जन्मदिन विशेष" !!



स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची साक्षात भवानी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब  आणि स्त्री शिक्षणाची एक मूळ धुरा आणि आधुनिक युगाची सरस्वती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मातीच्या या दोन महान लेकींना, मातांना शत - शत प्रणाम !  महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या  मनात आणि आचरणात ज्यांनी  स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं  त्या  राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ साहेब  यांना त्यांच्या जयंती दिनी कोटी कोटी नमन आणि तुम्हा सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


ज्या मातीमध्ये जिजाऊ जन्माला आल्या, ज्या मातीमध्ये सावित्री बाई अखेरपर्यंत  झुंजल्या, जिथे राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, ताराराणी लढल्या  त्याच माती मध्ये आजहि  स्त्रीची रोज रोज विटंबना होतांना दिसते आहे. दिल्ली मध्ये घडलेली पाशवी घटना असो कि कुठे लहान चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार असो किंवा आज हि गावामध्ये उघडी नागडी  करून फिरवली जाणारी आमची दलित भगिनी असो, वर्षानुवर्षे या स्त्रीची घोर विटंबनाच चालली आहे. काळ बदलला, राहणीमान बदलले, सभोवतालची परिस्थती बदलली पण स्त्रियांच्या बद्दल असलेली भोगवस्तू किंवा मालकी मानणारी हीन मानसिकता अजूनही कुठे तरी कायम आहे आणि याचाच प्रत्यय रोज येतांना दिसतो आहे . खर तर या विश्वात ईश्वरानंतर निर्माणाचा अधिकार 
कुणाला प्राप्त  आहे तर तो या स्त्री ला ! स्त्री म्हणजे निर्माती ! स्वराज्य निर्माणकरते युगपुरुष शिवछत्रपती यांना  निर्माण करणारी, घडवणारी माता म्हणजे जिजाऊ. महात्मा  फुल्यांना पावलो - पावली साथ देणारी आणि स्त्री शिक्षणाचे बीज ज्यांनी रोवले ती स्त्री म्हणजे सावित्री बाई .

या सावित्री आणि जिजाऊ च्या लेकी आजही बाटवल्या जात आहेत ! काळ बदलला आधी रस्त्यावर अत्याचार व्हायचे आता बंद दारामागे रोज रोज स्त्री वर अन्याय, तो हि स्वकियांकडून ! का आणि किती दिवस ?

हा ढोंगी समाज एकीकडे स्त्री ला शक्तीचे स्वरूप मानतो आणि दुसरीकडे तिच्यावरच बळाचा  बापर करतो ! तिच्यावरच वैचारिक, सामाजिक  आणि धार्मिक गुलामगिरी लादतो ! खर तर या देशातील जाती - धर्म  भेद निर्मूलनाचे कार्य याच  महिलांनी आपल्या हातामध्ये घेतले पाहिजे, कारण स्त्री हि कुठल्याही जाती धर्माची असो तिची अवस्था फार काही वेगळी नसते. समानता, आदर आणि अस्तित्वाच्या बाबतीत प्रत्येक जाती-धर्माची  स्त्री हि कमनशिबीच.

पण नशिबावर मात करून एक नवनिर्माण करणाऱ्या जिजाऊ सारख्या  महान आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्वाचा वारसा असणाऱ्या या मातीतील स्त्रियांनी आता स्वतः जागे होण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या आणि एकूणच समाजाच्या रक्षणासाठी परत एकदा उभे राहण्याची आज खरी गरज आहे.

नवनिर्माण म्हंटले कि ते एका स्त्रीच्या हातून होणे हे ओघाने आलेच. विस्कटलेल्या सामाजिक परिस्थतीतून स्वतःच्या आणि पर्यायाने संपूर्ण समाजाच्या  उत्थानाकरिता आता तुलाच हाती तलवार, लेखणी घ्यावी लागणार आहे.

समाजनिर्मिती मध्ये, निर्णय प्रक्रिये मध्ये , राजकीय व्यवस्थेमध्ये आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीला सन्मानाचे स्थान मिळवण्यासाठी  आता स्त्री नेच उभे राहिले पाहिजे आणि यासाठी याकामी तिला बळकटी देण्याचे कामही प्रत्येक स्त्रीनेच केले . समाजाच्या दूष  प्रवृत्ती विरुद्ध लढणाऱ्या स्त्रियांना बळ देण्याचे कार्य तुमच्या हातून घडले पाहिजे.

राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे गुलामगिरी आणि अन्यायावर  वर घणाघाती घाव करणारी पहिली ऐतिहासिक स्त्री.

या राष्ट्रामातेच्या जन्मदिनी -  स्वतंत्र आणि स्वाभिमानी समाज व्यवस्था निर्माण होवो आणि हे घडवण्यासाठी कधी हि न 
 न ढळणारी दृढ इच्छाशक्ती सर्वांना मिळो हीच प्रार्थना करू. 

याच जिजाऊ साहेबांच्या तमाम लेकींना सर्वोपातरी सन्मान मिळवून देण्याचे आणि आणि खंबीर पणे  त्यांच्या  पाठीशी उभे राहण्याचे  कार्य प्रत्येक शिव - शंभू प्रेमींकडून व्हावे,
जिजाऊ जयंतीच्या जिजाऊ.कॉम कडून पुन्हा  हार्दिक शुभेच्छा!



राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की......... जय!

जय जिजाऊ ! जय शिवराय !
जय हिंद! जय महाराष्ट्र!
धन्यवाद!

--कार्यकर्ते
जिजाऊ.कॉम www.jijau.com

Thursday, December 13, 2012

यशवंतराव चव्हाण विचार मंच



फेसबुक वर यशवंतरावांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्य सुरु झालेल्या या उपक्रमाला आपली साथ लाभावी. त्यातून आणि या सह्याद्रीच्या मातीने बनलेल्या महापुरुषाच्या विचारातून तुम्हाला ही नक्कीच खूप काही सकारात्मक भेटेल. 

त्या पानावरील काही नोन्दी :

यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणी नव्हते तर ते खरे समाजकारणी होते. राज्याचा व देशाचा डोलारा सांभाळताना धावपळीच्या काळातही त्यांनी साहित्यातील व्यासंग कायम ठेवला. म्हणूनच यशवंतराव देशाच्या राजकारणात पट्टीचे व्याख्याते बनले. अखेरपर्यंत त्यांनी साहित्यसेवा केली. त्यांच्या साहित्य प्रेमाचे अनुकरण आजच्या विद्यार्थ्यांनी करावे. यशवंतराव चव्हाण हे आजच्या पिढीसाठी व सत्ताधाऱ्यासाठी समाजसेवेचा खरा आदर्श आहेत. त्यांचे विचार देशाला तारणारे व प्रेरक होते. संरक्षणमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली म्हणून देश मोठ्ठ्या अडचणीतून सहीसलामत बाहेर आला. महाराष्ट्राची नवनिर्मिती करणारा स्वच्छ चारित्र्याचा हा नेता राज्य व देश विकासासाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे....”
-
मा.श्री. विनायकराव अभ्यंकर, निवृत्त नौसेना अधिकारी
-- 
"यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असतानाच्या काळात समाज परिवर्तन घडविणारे अनेक चांगले निर्णय घेतले. आपण राज्य करायला सत्तेत कुणासाठी बसलोय याचे भान त्यांना होते. यशवंतराव चव्हाण हे समाजाच्या दु:खाचे भान असलेले नेते होते. त्यांच्या आई, विठाई या न शिकलेल्या. घरात आर्थिक चणचण, कोणताही आधार नाही, अशा परिस्थितीत यशवंतराव मोठे झाले. त्यांच्या आईने त्यांना काबाडकष्ट करून शिकविले. याचे भान ठेऊन यशवंतरावांनी पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय घेतला तो गरीब मुलांसाठी. या मुलांना शिक्षण घेताना कुठल्याही अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी 900 रुपये आर्थिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना शिक्षण शुल्कात सवलती देण्याचा निर्णय घेतला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्यावर विरोधकांनी खूप टीका केली. यात तीव्रता होती, मात्र कटूता कुठेही नव्हती. संरक्षणमंत्री झाल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा व निरोपाचा ठराव विरोधी पक्षाने मांडला होता. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. हीच याश्वान्त्रावांची खरी कमाई होती..."
-
मा. श्री. मधुकर भावे, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार
--
"यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे असामान्य सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. म्हणूनच त्यांच्या नावाचे प्रभुत्व मराठी मनांवर आजही आहे. या नावाला अन्य विशेषणांची गरज नाही. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, निर्णय त्यांची संवेदनशीलता, सुसंस्कृतता यांचा प्रभाव नव्या पिढीवर पडणे गरजेचे आहे. शिक्षणाला साधन मानणाऱ्या यशवंतरावांनी गरीब घरातील मुलांसाठी आर्थिक निकष लावून मोफत शिक्षणाची सोय करताना आपले मुख्यमंत्रीपद पणाला लावले होते...."-मा. डॉ. एस. के. कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, पुणे.
--
युरोप अमेरिकेत शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे त्यांचे औद्योगिक धोरण भारतात आणणे चुकीचे आहे. कृषीकडे दुर्लक्ष केल्याने देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. सहकार व कृषी औद्योगिक विकास आणि ग्रामीण विकासाची यशवंतराव चव्हाण यांची मांडणी आज हवी तशी स्वीकारली जात नाही. सद्द्यस्थितीत महाराष्ट्राला त्याचीच आवश्यकता आहे...”
-
मा. श्री. भाई वैद्य, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत 
--
यशवंतरावांनंतर राज्याचे विघटन सुरु झाले. यशवंतरावांनी महाराष्ट्राला जातीविरहित शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्यानंतर अनेक सहकारी संस्था डबघाईला आल्या. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा, यासाठी यशवंतरावांनी प्रयत्न केले. मात्र आजही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकले नाहीत. यशवंतरावानंतर महाराष्ट्र पोरका झाला. त्यांच्यासारखे समर्थ नेतृत्व आज देशात व महाराष्ट्रात राहिले नाही...”
-
मा. श्री. श्रीनिवास पाटील, माजी खासदार, कराड 
-- 
यशवंतरावांनंतर त्यांच्या विचारला गवसणी घालून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे एकही नेतृत्व आज राहिले नाही. महाराष्ट्र कृषी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांत मागे राहिला आहे. यशवंतरावानंतर जातिवादावर अस्मिता जपणारे संघटन वाढू लागले आहे...”
-
मा.श्री. किशोर बेडकिहाळ, ज्येष्ठ विचारवंत

अधिक जाणण्यासाठी आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया येथे भेट द्या : https://www.facebook.com/pages/Yashwant-Vichar-Manch/280568318692687

Wednesday, December 12, 2012

वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - प्रकाशराव

आमचे लाडके मुख्यमंत्री.. म्हणजेच मुख्यमंत्री.कॉम  चे आणि  जिजाऊ.कॉम चे  संस्थापक, परम मित्र श्री. प्रकाश पिंपळे (उक्कलगावकर) यांना त्यांच्या वाढ दिवसानिमित्य हार्दिक शुभेच्छा !
आई भवानी त्यांच्या आयुष्याला सुखा - समृद्धीने भरभरून आशीर्वाद देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना ! जगदंब .

जय जिजाऊ -जय शिवराय .

अमोल सुरोशे आणि समस्त मित्र परिवार
जिजाऊ.कॉम  / मुख्यमंत्री.कॉम

Tuesday, December 11, 2012

१२-१२-१२ : लोकनेते - शरद पवार आणि गोपीनाथराव मुंडे


आजच्या आगळ्या वेगळ्या आणि शतकातून एकदाच येणाऱ्या या दिनी महाराष्ट्रातील राजकारणामधील दोन रत्नांचा आज वाढदिवस. हे दोन्ही नेते खर्या अर्थाने लोकनेते आहेत. आयत्या पिठावर रेघोट्या मारून नेतृत्व झालेल्यांची संख्या आज भारतीय राजकारणात कमी नाही. अशा सगळ्या परीस्थित शरद पवार आणि गोपीनाथ मुंढे यांसारखी राजकारणी म्हणजे खाणीतील हिरेच. दोघांनाही मुख्यमंत्री.कॉम  कडून जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पांडुरंगाचरणी दोघांना ही दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना.

पवार साहेब आणि गोपीनाथराव हे दोन्हीही नेतृत्व फक्त खादी घालून मिरवणारे राजकारणी नाहीत. तळा गळतील सामन्यांचे दुख समजून त्यावर शक्य ते राजकीय उपाय करणे यात या दोघांनचा हाथ खंडा.

शरद पवारांच्या दूरदृष्टीने राज्याला आणि राष्ट्राला सुखाचा मार्ग दिसेल यात शंकाच नाही. दोघांना ही जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

Wednesday, December 5, 2012

खऱ्या स्वातंत्र्याची ओळख करून देणारा महामानव.



भारतीय संविधानाचे निर्माते, बहुजन नायक भारतरत्न डॉ . बाबासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्य त्यांना विनम्र अभिवादन !
त्यांचे उपकार केवळ दलित समाजावर नसून सबंध जगाला अचंबित करणारी सामाजिक क्रांती या महामानवाने प्रत्यक्षात घडवून दाखवली आणि हजारो वर्षे जाती - पातीच्या चिखलात रुतलेले भारतीय समाजाचे चाक खऱ्या अर्थाने फिरायला लागले.
सबंध जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या प्रतिकूल परीस्थ्तीमध्ये सामाजिक क्रांती होण्याची हि अद्वितीय अशीच घटना !

या महापुरुषाला केवळ एका जातीमध्ये अडकवून ठेवण्यचा कोतेपणा / संकुचितपणा गेली अनेक वर्षे अव्याहतपणे चालूच आहे, आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्य जाती धर्माच्याही पलीकडे जाऊन या महामानवाच्या विचारांना खरच मनापासून अबिवादन करूया!


जय भीम. जय महाराष्ट्र.

- अमोल सुरोशे (नांदापूरकर)

---

बाबासाहेबांना त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन. आज असलेली सुबत्ता आणि समानता या भूमीवर तुमच्या शिवाय येणेच अशक्य होती. राष्ट्राला धर्माच्या पुढे नेवून आम्हाला मानवतेची शिकवण दिलीत आणि हात धरून त्या रस्त्यावर आणून सोडले. त्याची परतफेड फक्त आणि फक्त तुम्ही सुरु केलेला प्रवास संपवूनच केली जाऊ शकते.

जय भीम. जय महाराष्ट्र.

- प्रकाश बा. पिंपळे (उक्कलगावकर)

Sunday, November 18, 2012

एका वादळास अखेरचा सलाम ... !!!!


गेल्या ४५ वर्षांचा धगधगता झंजावात, एक राजकीय वादळ ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण आणि सत्ताकारणाची उलथापालथ  करून टाकली. वर्षानुवर्षे सरंजामशाही वृत्तीने निवडून येणाऱ्या पुढार्यांच्या ऐवजी अति सामान्य आणि ज्वलंत तरुणाला या राजकारणात आणि सत्ताकारणात महत्वाचे स्थान दिले. जाती-धर्माच्याही पलीकडे जाऊन या महामानवाने दगडालाही शेंदूर फासून देव बनविले, असंख्य शिव सैनिक, नेते, मंत्री आणि मुख्यमंत्री घडवतांना स्वतः कुठल्याही पदाला - स्थानाला स्पर्श केला नाही जणू हे सर्व त्यांच्या पायाशी लोळण घालत होते.

राजकारणात राहून देखील सत्तेसाठी कधी हि तडजोड नाही किंवा एकदा टाकलेला शब्द पुन्हा माघारी नाही, एवढ्या सरळ आणि स्पष्ट वृत्तीचा बेधडक माणूस म्हणजे बाळ केशव ठाकरे. आपले बाळासाहेब ...

मरगळलेल्या समाजात अस्मितेची फुंकर घालून त्यांना ताठ मानेने जगायला शिकवणारे, प्रस्थापित - सरंजामशाही राजकीय व्यवस्थेला चांगल फोडून आणि झोडून काढणारे बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय - सामाजिक जीवनातील सदा लख - लखता  ध्रुव तारा.

वयाच्या ८६ व्या वर्षी हे वादळ शिवातीर्था वर काल शांत झाले. याच शिवतीर्थावर साहेब घडले, त्यांनी शिवसेना घडवली अनेक ऐतिहासिक सभा - आंदोलने याच मैदाने पहिली आणि शेवटी याच मैदानावर शिवसेनेचा हा ढाण्या वाघ एका चीर निद्रेत गेला.

लाखो - लाखो लोकांनी या महाराष्ट्राच्या महानेत्यास शाश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या घरातलाच एक व्यक्ती गेल्याचे दुखः सर्वांना झाले आणि संपूर्ण महाराष्ट्राने स्तब्ध राहून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.

लाखो लोकांचे जीवन घडवणाऱ्या, शिवरायांच्या स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी आम्हाला दाखवले अशा या महान - महान नेत्यास कोटी कोटी नमन .. आणि मनपूर्वक श्रद्धांजली.

बाळासाहेब .. अमर रहे  !

- अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे

Wednesday, October 31, 2012

Shivaji Underground in Bhim Nagar Mohalla : An ode to the real Shivaji Maharaj - DNA


"This play is a landmark in the history of Marathi theatre. The tightly-written play is attracting a new audience and rejuvenating the decaying Marathi theatre industry. It has also provoked people to think, discuss and debate and not to simply accept anything blindly." - DNA


--
The barren region of Marathwada, particularly Beed and Nanded districts, may be on the national radar for all the wrong reasons (26/11 co-conspirator Abu Jundal hails from Beed) but 13 farmers are trying to change that.
These farmers have turned theatre artists and are creating ripples with their revolutionary play — Shivaji Underground in Bhimnagar Mohalla. The play attempts to change popular history by highlighting lesser known but crucial historical facts about Chhatrapati Shivaji Maharaj.
Here’s how the play goes. Indra, the king of the Gods, and ruler of heaven orders Yamraj, the God of death, to bring Shivaji to heaven along with his reforming ‘thoughts and ideas’. Shivaji deceives Yamraj saying he forgot to bring along his ideas and returns to earth to complete his unfinished work.
Yamraj returns to earth too in search of Shivaji. He suspects Shivaji and his revolutionary thoughts are hiding at Shiv Shahir Milind Kamble’s (Kailas Waghmare) home at Bhimnagar Mohalla. Kamble is the one who challenges the traditional Shahir Dharma (Sambhaji Tangde) and presents the authentic history of Shivaji through ballads.
The play says the history of Shivaji that is dominant now is biased and fashioned by a section of society for its own benefit. Instead of bridging the gap between Hindus and Muslims, dalits and other castes, this ‘manufactured’ history poisons the mind of people. It emphasises that in reality, Shivaji was a secular king. In fact, 35% of his army were Muslim and most of his prominent fort protectors were also from the minority community. Even the names of Shivaji’s father, Shahaji, and that of his uncle, Sharifji, were Muslim.
Over the centuries, these facts were replaced by a sensational and fictional history that have diminished Shivaji’s universal appeal.
It also satirises the present corrupt and myopic political system. It notes how political outfits misuse Shivaji’s name to polarise society into rigid Hindu and Muslim sections in order to build vote banks that help them stay in power.
It even lampoons present folk storytellers Shahir (Baba Purandhare and Shahir Deshmukh) over their sensational style of narrating the history of King Shivaji. They feel, it is this style that is responsible for spreading hatred.
The jugalbandi is one of the play’s most entertaining parts. It takes place between Shahir Dharma, the fiction teller, versus Shahir Kamble, the fact teller. Initially, spectators are drawn to the dramatized and masala version of Shivaji’s history. But Shahir Kamble in the end wins over the audience by presenting the lesser known side of Shivaji.
Though sometimes, the play’s tone can sound anti-Brahmin, it doesn’t detract from the fact that this play is a landmark in the history of Marathi theatre. The tightly-written play is attracting a new audience and rejuvenating the decaying Marathi theatre industry. It has also provoked people to think, discuss and debate and not to simply accept anything blindly.

Monday, October 1, 2012

बंदे मे था दम !



राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्य सबंध विश्वात वंदनीय असणाऱ्या या महान व्यक्तिमत्वास अभिवादन.

जय जवान - जय किसान चा नारा देणारे दिवंगत पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचे हि आज स्मरण आणि कोटी कोटी अभिवादन.

स्वच्छ राजकारणा साठी दोन फार मोठे आदर्श!

गांधी आणि लालबहादूर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!