Showing posts with label चांगले मराठी चित्रपट. Show all posts
Showing posts with label चांगले मराठी चित्रपट. Show all posts

Monday, February 10, 2014

१४ फेब्रुवारी " 'फँड्री ".. नक्की पहा !!!!


FANDRY
ही एक कविता आहे पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी 
ही भाषा आहे शब्दांच्या डोक्यावरची 
ही हात घालते काळजाला शर्टाची कॉलर पकडल्यासारखी 
आणि विचारते, " पुरोगामी व्हय रे भडव्या "

अनुभूतीतून प्रकट झालेली खऱ्या अर्थाने जागतिक चित्रभाषा 
होय मी मराठी आहे आणि हा मराठी चित्रपट आहे असं ताठ 
मानेनं सांगावं आणि बोट दाखवावं असा चित्रपट 
मित्रांनो, कुठलाही अविर्भाव नाही अभिनिवेष नाही 
सुखाची उधळण नाहीआणि दुख्खाचा बाझार नाही 
असलाच तर अस्वस्थ करणारा दाह आहे ह्यात 
तुम्ही पहा, लोकांना पाहायला लावा. हा सिनेमा न्हवे अनुभव आहे ….


Monday, June 28, 2010

झिंग चिक झिंग आणि हापूस : नक्की बघावे असे

दोन्ही चित्रपट अगदी खूप छान आहेत. दोन्ही वेग वेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलतात. एक खूप हसवतो तर दुसरा हसवता-रडवतो-हसवता.
जास्त बोलणे नव्हे, अप्रतिम कलाकृती पहायच्या असतील तर नक्की जाऊन या!  



http://www.youtube.com/watch?v=7_PERcVlVvY&feature=related