Monday, January 1, 2018

भीमा - कोरेगाव भ्याड हल्ला - नेमकं काय ? वेळीच कळायची अक्कल आपल्या सगळ्यांना मिळो

उज्ज्वल इतिहातून प्रेरणा घेऊन तिचा सन्मान करण्यासाठी आलेल्या अनुयायांवर दगडफेक हा नीच वृत्तीच्या जमावाचा भ्याड हल्ला आहे. पर-गावाहून आलेल्यांच्या गाड्या फोडण्याने क्षणिक दहशत माजत असेल, पण त्याने तुमच्या डोक्यातील मेंदूच्या आकाराचा अंदाज लागतो.
काल झालेली घटना ही महाराष्ट्रातील समाजव्यवस्थेची चिरफाड करणारी एक घटना आहे. ब्रिटिश असोत किंवा उशिराचे पेशवे. गुलाम समजून ज्या ज्या शाह्यांनी जनतेचा छळ केला त्या सगळ्या संपण्यात आनंदच आहे.
ब्रिटिशांच्या छळाचे नव्याने वर्णन करायची गरज नाही. या शेवट-शेवटच्या पेशव्यानीं जाती व्यस्थेच जे हीन स्वरूप जाचक नियम आणि अटी लादून दाखवून दिलं त्याला माफी नाही. पण तो इतिहास आहे. त्या चुकांवर पांघरून घालून तो काळ कसा चांगला होता याचं पुनर्लिखाण कुणी करत असेल किंवा त्यासाठीची वातावरण निर्मिती कुणी करत असेल तर ते स्वीकार्य नाही.
शिवाजी महाराजांचा काळ असो कि त्या नंतरची राज्याची व्यवस्था. ती उभीच अन्याया विरुद्ध होती. राजेशाही असली तरी, न्याय आणि समानता याचा अंमल कायम राहावा म्हणून पुरेपूर प्रयत्न झाले. पण तो ही इतिहासच. त्याचीही गनगुळी रोज उगाळण्यात अर्थ नाही.
त्या सगळ्याच इतिहासाला गोंजारत बसून, षंढपणे त्याचे गुणगान गाण्यात धन्यता मानणाऱ्या समाजाचं पुढे काही होणार नाही; हे सांगण्यासाठी 'आजच्या हवालदिल आणि दुष्काळी' परिस्थितीचं उदाहरणही खूप झालं.
बाबासाहेबांनी या देशाला आणि सगळ्याच समाजांना जो शिक्षण आणि प्रगतीचा रस्ता दाखवला त्याला सोडून उगाच बोंब मारत अस्मितेचे राजकारण करून भरकटत जाणारा समाज एक दिवस गलीत-गात्र होईल.
हे वेळीच कळायची अक्कल आपल्या सगळ्यांना मिळो.

1 comment:

Unknown said...

आपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.

Post a Comment