Sunday, January 11, 2015

जिजाऊ. कॉम कडून जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!आजचे मावळे अजूनही
'रस्ते नसणाऱ्या रस्त्यांनी' पायपीट करत असले तरीही
घाबरून कुठे तरी दडून बसले तरीही
अगडबंब नेत्यांच्या स्कोर्पिओचे काडी इतकीही किंमत नसलेले ड्रायव्हर आणि रखवालदार असले तरीही
आणि

फक्त 'नरेगा'च्या कामावरच घर धकवत असले तरीही,

मी आज प्रचंड आशावादी आहे.
कारण, मी बघितल्यात परवाच
थंडी आणि अंधाराला कापत त्याच खडकाळ रस्त्यावरून
तुमच्या चांडाळ व्यवस्थेच्या मदतीशिवाय
शाळेत जातांना छोट्या छोट्या जिजाऊ!


तुम्हा सर्वांना जिजाऊ. कॉम (www.jijau.com) कडून जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 ||जय जिजाऊ|| ||जय शिवराय||No comments:

Post a Comment