Friday, November 28, 2014

जबरदस्त भालचंद्र नेमाडे : जोतीबा फुले आणि इतर विषयांवर

नक्की ऐकावे. पुन्हा पुन्हा. देशीवाद. मुसलमान आणि  तिहास. ईतिहासाची सर्वसमावेशकता. तसेच इतर विषय! 

Thursday, November 27, 2014

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरं खुरं स्वतंत्र मिळवून देणारे महात्मा


आज २८ नोव्हेंबर महात्मा जोतीबा  फुले यांचा स्मृतिदिन!

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती ...
सामान्य माणसांसाठी .. दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले.

याच महात्म्याने रायगडावर शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, त्या समाधीची रीतसर पूजा करून शिव जयंतीची सुरुवात केली. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना "कुळवाडी भूषण" म्हणून संबोधिले . त्यांनी "शेतकऱ्यांचा आसूड " या पुस्तकातून आमच्या बळीराजाचा आवाज उठवला. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा हा खरोखरच जगासाठी एक प्रेरणा आहे. शिक्षणाची गंगा सामान्य अति-सामन्यांच्या पर्यंत पोचवणारा हा भगीरथ .. ज्याने केवळ आणि केवळ सत्याची कास धरून आपल्या या महाराष्ट्राचा वैचारिक, सामाजिक कायापालट केला.

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खर खुरा स्वतंत्र मिळवून देणारा हा महात्मा.

ज्यांचा वैचारिक वारसा घेउन अगदी कणखर पणे आपली वाटचाल करणार्या महाराष्ट्राचा त्यांच्या त्या अफाट कर्तुत्वास कोटी कोटी प्रणाम! आणि महाराष्ट्रातील तरुण पिढीकडून त्यांचा वसा चालवला जावा ही अपेक्षा!

त्यांच्या स्मृतीस अभिवादन!

Wednesday, November 26, 2014

ज्यांची इच्छा वेद शिकण्याची आहे त्यांनी मदरशासारख्या विशेष वेद शाळा काढाव्यात

संघ बेरकी आहे. हे राष्ट्र सेकुलर आहे. यात शंका नाही. आणि कुणी घेऊही नये. संविधानाच्या पहिल्या पानावर तसे लिहिलेय. उलटे जे सेकुलर नाहीत त्यांनी सेकुलर व्हावे! 
जातीय द्वेषातून संघाकडे बघितले जात नाही. संघाच्या इतर जातीबद्दलच्या द्वेषामुळे/दुर्लक्षामुळे/अतेरिकी विचारांमुळे संघाचा द्वेष होतो. तो योग्यच आहे. संस्कृत एक चांगली भाषा आहे. ती एक भारतीय भाषा आहे. हिंदू धर्मातील सगळे जुने ( 'जुनाट'ही म्हणता येईल. ग्रंथ याच भाषेत लिहिलेत). पण सगळ्या भारतीय भाषांचा उगम संस्कृत मधून झाला हा इतर भाषांचा अपमान असेल आणि शास्त्रीय दृष्ट्या ते चूकही असेल. उर्दू/संस्कृत दोन्हीही इथे मेनस्ट्रीम मध्ये लोप पावलेल्या भाषा आहेत. त्या दोन्हीचा बावू करू नये. संस्कृत अनेक वर्षांपासून वैकल्पिक विषय आहेच. असायलाच हवी. राहील ही. वेद वगैरे काही समाज उपयोगी असतेच तर त्यांच्या अस्तित्वा पासून आता पर्यंत काही तरी मोठे घडलेच असते! ज्यांची ज्यांची इच्छा वेद शिकण्याची आहे त्यांनी मदरशासारख्या विशेष वेद शाळा काढाव्यात. मेनस्ट्रीम मध्ये वेदांची लुडबुड नको. याच निमित्याने मदरशात शिकानारांसाठी धार्मिक शिक्षण घ्याचे असेल तर घ्या. पण मेन स्ट्रीममध्ये प्रगती पाहिजे असेल तर पोरांना मेन स्ट्रीमच्याच शाळेत घाला! बाकी नरेंद्र मोदी संख्येने जास्त म्हणजे बहुजन समाजातील आहेत तरीही ते पंतप्रधान झालेत याचे कारण लोकशाही! नसता शक्य नव्हते. आज संविधान दिवस त्याच्या तुम्हाला शुभेच्छा!

Monday, November 24, 2014

पुरोगामी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी



अवघ्या ७० वर्षांच्या आयुष्यात साहेबांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. साहेबांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रात पुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला. महाराष्ट्रातील राजकारणाला अतिशय आदर्श असे मापदंड घालून दिले. व्यक्तिगत आणि क्षेत्रीय विचारांच्या पलीकडे राष्ट्रहितासाठी राजकारण हा जो पायंडा महाराष्ट्रातील राजकीय चळवळीला लाभलाय तो म्हणजे यशवंतरावांचीच देन. 

आजच्या दिनी त्यांचे विचार पुन्हा मरगळ आलेल्या मनांना राष्ट्र उभारणीची प्रेरणा देवो ही प्रार्थना!

साहेबांबद्दल अधिक : http://www.mukhyamantri.com/2012/03/blog-post_11.html

Friday, November 14, 2014

मराठा समाज आरक्षण

मित्रानो मराठा समाज आरक्षण ला न्यायालयाने स्तगीति दिली हे खरोखरच दुर्दैवी आहे. आता सरकार त्याचा पाठपुरावा करेल आणि आदरणीय न्यायालय पुन्हा विच्यार करेल हीच अपेक्षा करतो .
  पण मित्रहो माला इथं खरच सांगायचं आहे की  आपला समाज मागे पडन्या मागे बऱ्याच कारणं पैकी एक  कारन म्हणजे आपला समाज हेच आहे . होय मला आसां वाटतं की मराठा समाज मागे पडण्या मागे मराठा समाज पण एक कारन आहे. मराठा समाज मोठेपना, हुज्जतपना , मीपना ह्यतच मागे पडला , मराठा समाज स्वतःचा बढेपना हयात मागे पढला. मराठा समाज एकमेकांचे पाय खेचन्या मधे मागे पडला  आणि  एक मेकांना कमी लेखण्या मधे मागे पडला. आपल्या  समाजाच्ं झालं आसं की समाजाला वर नेने समाजाला सुधारने तर सोढाच आपल्या समाजाचा सगळ्यात पक्का वैरी कोण तर आपलिच भावकी
      आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात तर ह्याची प्रचिती ज्यास्तच दिसून येईल. तुम्ही बरकायिने विच्यार करा , आपल्या तालुख्या मधे आणि जिल्ह्या मधे मराठा समाज एक मेकांचे लांग्या (खेकदयाच्या) खेचन्या मधे मग्न आहे.  त्यामुळे झालं आसं की एकमेकांच्या लांग्या खेचन्या मधे आज काही अपवाद वगळता सगळेच अपंग बिना लांघी बिना पयाचे लंगड़े झाले आहेत. एकूणच मराठा समाजाच्या ह्या सगळ्या गोष्टी मुळे आज समाजाची परिस्तिथि खीळ्खीळ झाली आणि आपल्या समाजाच्या ह्या पाय खेचने खेलामुळे दूसरे कधी दूर पुढे निघुन गेले काही कललेच नाही.
    मित्रांनो ह्या गोष्टी चा विच्यार करने गरजेचे आहे . राजकारण असो(मुख्य तर आपल्या समाजाला तेच आहे ) , शिक्षण असो , व्यवसाय असो की शेती सगळी कड़े आपल्या समाजाला कशी मदत करता येईल ते पहावे लागेल. एखादा कुणी व्यवसाय सुरु करत असेल तर ते कधी बंद पडेल आसा विच्यार करण्यापेक्षा त्याला कशी मदत करता येईल , एखादा शिक्षण घेत असेल तर नोकरी साठी कोंडी निर्माण करण्या पेक्षा त्याला कशी मदत करता येईल , आज आपल्या समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती ,शेतीला कशे पुढे नेता येईल शेती करणार्याला कसं प्रोत्सान देता येईल ह्याचा सगल्यांनी विच्यार करायला पाहिजे.
    मित्रहो आता आपल्यालाच ठरवायच आहे की आपल्या पूर्वजां च्या महान कार्या मुळे मीळालेली शुर मराठा मर्द मराठा पदव्या ....आपण शुर मराठे , मर्द मराठे  नुस्तं भाषाणां पुरते, मेसेज पुरते, लेख पुरते सिमित ठेवायचे आहे की कृतितुन दखवायचं आहे
    आरक्षण मिळणार की नाही हे मी नाही नाही सांगू शकत पण एवढं नक्की सांगेन की मराठ्यांच्या मनात जर आलं तर नक्कीच आशी परिस्तिथि बनवतील समाजाची की पुढच्या सात पिढ्या आरक्षणा ची गरज वाटनार नाही आणि खरच आरक्ष मीळाल्यावर मी जेवढा आनंदी होईल त्या पेक्षा मी त्या दिवशी आनंदी होईल ज्या दिवशी आपला समाज आरक्षण ची गरज नाही आशी परिस्तिथि निर्माण करेल.
जय भवानी जय जिजाऊ जय शिवजी
सुधाकर पाटिल
15 नवेम्बर 2014

Wednesday, November 12, 2014

ह्यलाच म्हणतात राजकारण

वाह ...ह्यलाच म्हणतात राजकारण , आज खरी जीत नेमकी कुणाची झाली हे खऱ्या खर्यांना नाही कळले. सिंगल लार्जेस्ट पार्टी असून सुधा अल्प मत्तांच सरकार ते पण आवाजावरनं स्थापन केलेली भाजपा , की स्वाभिमान दखवानारी शिवसेना की फक्त 41 आमदार घेऊन चौथ्या क्रमांकावर जावून सुधा एकदम महत्व प्राप्त करुण घेतलेली राष्ट्रवादी ...खरच नेमका विजय झाला कुणाचा .
   आसं पण म्हणतायत की आज जर गुपित मतदान झलं आसतं तर कदाचित सरकार पडलं पण असतं पण काही केल्या राष्ट्रवादी ला सरकार पाडायचं (आत्ता)नहिये . कारन आत्ता सरकार पडलं आणि फेर निवडणूक झाल्या तर भाजपा निवडून येईल मग 6 12 महीने भाजपा सरकारला खेळ खेळु द्यायचा , सरकारच्या प्रत्येक घडामोडी वर शिवसेना नजर ठेऊन राहील आणि शिवसेना आक्रामक होईल आणि सरकार ला धरेवर घरेल. मग जनता महाराष्ट्र भाजपा वर नक्कीच नाराज होईल लोकांना महाराष्ट्र भाजपा चा राग एययला लागेल (जसा आता माला राग येत आहे ) मग जनतरचा कौल पाहून सरकार ला पड़ायाचं .
   मित्रानो मला जर विच्यारलात तर, सगळे नाट्यमय घडामोडी पाहून माला तरी आसं दिसून आलं की एवढा महान नेता लभलेला असताना सुधा आणि त्या नेत्यांच्या मुख्या नारा "सबका साथ सबका विकास " "सबको साथ लेके चलना है" असतांना सुधा महाराष्ट भाजपा ला शिवसेनेला शेवट पर्यन्त सोबत घेता आलं नहिये हयात महाराष्ट्र भाजपा मधे अनुभव ची उणीव नक्कीच दिसून आली . सत्ते मधे न जावून शिवसेना आपला महत्व वाढून घेतली तर सत्तेचे दोर आपल्या हाती ठेऊन राष्ट्रवादी जिंकली . तर मला तरी वाटते जिंकून सुधा आज महाराष्ट्र भाजपा नाही जिंकली तर राष्ट्रवादी आणि शिवसेने चा आज नक्कीच विजय झाला.
सुधाकर पाटिल
12 नव्हेम्बर 2014

दिवस गेले.....

हे असे असतात. ते तसे असतात. असे विश्लेषण करण्याचे दिवस गेले.... कोण कसे वागेल काही अंदाजा नाही!