Thursday, January 23, 2014

घराण्यांच्या वळचणीला बसलेल्या देशात पर्याय कोण?

युपीए च्या कार्यकाळात झालेले भ्रष्टाचार, वाढलेली महागाई आणि एकंदरच त्याच त्याच नेतृत्वाला कंटाळलेली जनता. तसेच भारतीय राजकारणात फक्त आणि फक्त कौटुंबिक पार्श्वभूमी असेल तरच काही स्थान आहे हा कळून चुकलेला मुद्दा यांनी सामान्य माणसाला सद्य परिस्थितीबद्दल अतिशय निराश केलेले आहे.

१० वर्षां पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यात नक्कीच फरक आहे, सामन्यांच्या जीवनमानात बराच फरक आलेला आहे, पण या पेक्षा ही चांगली स्थिती राहू शकली असती हे मात्र सत्य. या चांगल्या स्तिथीनिर्माणाच्या प्रक्रियेत अपयशाला कॉंग्रेस नक्कीच जबाबदार आहे. तसेच तितकीच जबाबदार भाजपही आहे.

आत्मविश्वास हरवलेली भाजप आणि आपल्याला सत्तेतून हलवण्यास आता कुणी उरलेले नाही या मस्तीत जगणारी युपीए २ किंवा मुख्यतः कॉंग्रेस यांनी सामान्य माणसांचा अगदी भ्रमनिरास केला होता. झालेले चांगले बदल बहुतअंशी १९९१ ची देन होते. शासन व्यवस्थेने बऱ्यापैकी मेंटेनन्सचेच काम केले असे म्हणवे लागेल. तरी त्यालाही थोडे फार महत्व असून त्याचे क्रेडीट युपीएला द्यावेच लागेल; फक्त कॉंग्रेसला नव्हे.

पण गांधी घराण्याच्या वळचणीला बसलेली कॉंग्रेस म्हणजे खर पहिले तर आपल्या देशाचे एक प्रूपच आहे. आपल्याला आजकाल सदैव फक्त हाकनाराची गरज भासते. कधी ते काम बाबा, बुवा, गुरु करतात तर कधी राजकीय नेतृत्व. कधी कधी तर संशय येतो की मुघल, इंग्रज हे परकीय इथल्या मातीवर इतकी वर्षे राज्य करू शकले याच कारण आपली राज्य करण्याची अक्षमता तर नाही ना! शिवाजी, राणाप्रताप आणि अशी काही तुरळक उदाहरणे सोडली तर ऑन यान अव्ह्रेज आपण परकियांच्या सत्तेखालीच जास्त नान्दलो आहोत. कुठे-कुठे स्वाभिमानाचे बीज आलेच तर, गवत होताच ते ही कुणाच्या दावणीत चारा म्हणून टाकले जातेय; इतकी दयनीय अवस्था.

प्रश्न फक्त विकासाचा नाही, जीडीपीच्या नाम्बरांचाही नाही. तो आहे तो प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याच्या अधिकाराचा, राष्ट्राची एक नैतिक ओळख असण्याचा आणि मानवी मूल्यांच्या संरक्षणाचा. जातीपातीच्या, धर्माच्या, दिखावू विकासाच्या आणि सामान्यातल्या सामान्या प्रती असलेल्या बेगडी सदभावनेच्या राजकारणाला - कॉंग्रेसच्या - आळा घालायची कदाचित हीच निवडणूक आहे. एकीकडे जातीयवाद, भाजप आणि सपाचाही आणि दुसरीकडे घराणेशाही, कॉंग्रेस, मित्र पक्ष आणि इतरांची, या सगळ्यांना घरी बसवण्याची कदाचित हीच वेळ आहे.

भाजप व्यक्ती आधारित पार्टी नाही असे म्हणारे आज 'एकाच' व्यक्तीच्या जीवावर लढत आहेत. साधे सुधे आमदार आणि खासदारही आपण निष्क्रिय असलो तरी "मोदी कडे बघून लोक मला मतदान करतील" अशी वाक्य सहज म्हणून जात आहेत. कॉंग्रेसच्या सरंजामी व्यवस्थेला भाजपा हा एक 'बरा' पर्याय आहे, पण मोदी सारखा माणूस अख्खी भाजप स्वतःच्या वळचणीला बांधून बसल्याचे दुःख होते. काहीही म्हंटले तरी गुजरातेतील दंगली या वास्तव आहेत. त्यांना मोदीने खत-पाणी दिले हा एक संशय आहे, तो न्याय व्यवस्थेसमोर खरा आहे की खोटा, हे वेळ सांगेलच; पण नैतिकतेच्या दरबारात मोदी हा विषय निघाल्यास मोदी डोळ्यात डोळे घालून बघू शकणार नाहीत हे निश्चित. हा एक मुद्दा. पण समजा त्यांनी या दंगलींना खत-पाणी दिलेले नसले तरी, त्या रोकण्यात मात्र ते अयशस्वी झालेले आहेत हे मान्यच करावे लागेल.

खालील प्रधानमंत्रीचा एपिसोड, "एबीपी काँग्रेसी आहे!" हा आरोप न करता, डोळ्यांनी बघितल्यास आणि कानांनी ऐकल्यास मोदी या समीकरणाच्या हातात देश, तुम्ही मुस्लिम द्वेषी नसाल तर, देण्याबद्दल भीतीच वाटेल!

  


मोदी बाजूला काढल्यास या सगळ्या परिस्थितीत भाजप हा एक 'त्यातली त्यात' बरा पर्याय वाटतो. पण मोदी बाहेर काढल्यास सध्याची भाजप कुठेच दिसतच नाही!


पर्यायांबद्दल बोलतांना 'पर्याय म्हणूनच' उदयाला आलेली 'आप' पार्टी दुर्लक्षित करून चालणार नाही. ती नक्कीच पुढील लोकसभेत असेल, पण सत्तास्थानी असण्याची शक्यता फारच कमी. आप ज्या प्रकारे दिल्लीत राज्य करतेय त्याकडे पाहिल्यास 'अजून अनुभवाची गरज' असलेला पक्ष असेच त्यांच्याबद्दल म्हणावे लागेल. "कश्मिरात लोकांना विचारा" आणि "आयेतो पुरा संविधानही बदलेंगे" अशा कॉमेंट करणारे या पक्षाचे नेतृत्व अजून 'अव्यवस्थेचे समर्थक' या भूमिकेतून बाहेर पडलेले नाहीत. पण त्यांच्या सोबत आलेले इतर चांगले लोक ही त्यांची भक्कम जमेची बाजू. या नवीन आलेल्या लोकात अतिशय विविधता आहे आणि भारतासारखे राष्ट्र चालवायला ती अतिशय आवशकही आहे. त्यांना समोर करणे आपला आणि देशाला हिताचे राहील. पण त्याची सध्या तरी शक्यता कमीच दिसतेय. पण असो. त्यांचा जास्त भूतकाळ नसल्याने प्रेडीक्ट करणे अयोग्य ठरेल.

शेवटी लोक ठरवतील आणि त्यांनी या वेळी तरी 'प्रत्येक वेळी पेक्षा जास्त विचार' करून ठरवावे!

जय हिंद!

Sunday, January 12, 2014

"जिजाऊ जयंती विशेष - नक्की वाचा"


असं म्हणतात कि इतिहासाच्या पानांमध्ये हरखून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी, परंतु याच इतिहासात अशी काही सोनेरी पानं असतात जी न कि केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जानिव करून देतात, येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्याच्या दिव्यत्वाने उजाळून टाकतात.

आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकरं या बाबतीत नशीबवानच ! कारण तसा वारसाच आम्हाला लाभला आहे, इतिहासातील प्रत्येल पण म्हणजे हिऱ्या - मानकांच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पानं !

या मातीत थोर संत झाले , विचारवंत हि झाले ! इथेच वीर जन्माला आले, आणि इथेच आम्हाला हजारो वर्षांच्या निद्रेतून जागे केले ते समाजसुधारकांनी !

आज या इतिहासाची उजळणी करावी वाटली कारण आज १२ जानेवारी !

याच महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणाऱ्या माउलींची जयंती ! हरवलेल्या स्वाभिमान आणि अस्तित्वाला पुनरजन्म देणारी माता !
आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करून या मातीला आपला पहिला छत्रपती राजा देणारी माता म्हणजेच राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांची जयंती.

अगदी कालपरवाच अखंड क्रांतीज्योती सावित्रीबाईंची हि जयंती पार पडली, कुठे कुठे या जयंत्या मोठ्या प्रमाणावर साजऱ्या हि होत असतील.

आजच्या या दिनी आम्हाला एक प्रश्न पडलाय कि ज्या इतिहासाचे दाखले देऊन आम्ही नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो निदान त्या इतिहासाने तरी
आमच्या या प्रेरणामुर्तींसोबत न्याय केलाय का?

जिजाऊ शिवाय शिवबा छत्रपती झाला असता ?ज्योतीराव कुणाच्या खांद्याला खांदा लाऊन स्त्री शिक्षणासाठी झगडले असते ? या थोर स्त्रीयान्शिवाय इतिहास हा इतिहास तरी झाला असता का ? शेवटी इतिहासाला जन्म द्यायला हि एक माउली च लागते हे हि आम्ही विसरलो ?

ज्या समाजात हजारो वर्षे स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, दुर्गा - शक्ती अशी उपमा तर देतात पण सर्वात जास्त अत्याचारहि तिच्यावरच होत असतात, मग अश्या समाजाला जिजाऊ - सावित्रीबाई सारख्या असामान्य महिलांची ओळख करून देण्यात हा इतिहास का कमी पडला ?

आज हि स्त्री हि दुय्यमच, मग ती दलिताची असो वा सवर्णा ची ! हिंदूंची असो व मुस्लिमांची ! तीच गुलामगिरी तोच अन्याय ! अगदी आमच्या घरा -घरापर्यत हि असमानता ! आज हि गर्भातच तिची हत्या !

मग हे धड धडीत सत्य समोर असतांना का इतिहासकार का कमी पडले ह्या असामान्य स्त्रियांचे संस्कार रुजवण्यात ! बर ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या पाठीशी समाज तरी उभा राहिला का ?

आजचा दिवस म्हणजे एक नवा इतिहास जन्माला घालणाऱ्या माउली चा जन्म दिवस !

इतिहास निर्माण करणे म्हणजे झालेल्या चुकांना सुधारून पुन्हा नवा इतिहास घडवणे … मग आजच्या या दिवशी करूया एक संकल्प….

स्त्रियांचे हिरावलेले हक्काचे स्थान त्यांना प्राप्त करून देण्याचा ! आमच्या माता - भगिनी आणि मुला-मुलींमध्ये जिजाऊ आणि सावित्री चे संस्कार रुजवण्याचा ! येणाऱ्या पिढीला जिजाऊ - सावित्री सारख्या स्त्रियांची खरी ओळख करून देण्याचा !

इतिहासातील हरवलेले हे सोनेरी पान समाजासमोर उघडे करण्याची आज खरी गरज आहे, खात्री आहे येणारा काळ त्यांच्या विचारांनी - संस्कारांनी उजाळून जाईल !

याची सुरुवात आपल्या घरापासून करा ! तुमच्या मुलीमध्ये जिजाऊ आणि सावित्री बघायला सुरुवात करा ! फ़क़्त तिलाच नवनिर्माणाचे सामर्थ्य आहे, त्यांच्या हातूनच या राष्ट्राचे नव - निर्माण घडू दे !!

पुन्हा एकदा राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन !

जय जिजाऊ - जय शिवराय


आपलेच कार्यकर्ते,
जिजाऊ.कॉम
www.jijau.com

Saturday, January 11, 2014

जिजाऊ जयंती २०१४


महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज  हे एक म्हत्वाचे सुवर्ण पान. पण ते पण घडण्यासाठी त्या आधी परिश्रम घेणारे व्यक्तित्व म्हणजे राजमाता जिजाऊ. तसेच महात्मा फुले आणि सावित्री माई बद्दल ही म्हणता येईल. 

भारतीय संस्कृतीत स्त्रियांचे महत्व आणि कार्य सदैव दुय्यमच ठेवले गेलेले आहे. स्त्री मग ती दलित असो कि सवर्ण सदैव दुय्यमच जगत  आलीये किंवा  तिला तसे जगायला भाग पाडले गेलेले आहे. पण सुदैवाने का  होईना जिजाऊ साहेब आणि सावित्री माई यांच्या स्मृती विविध  चळवळीनी जाग्या ठेवल्या. 

आज स्त्री चळवळ ही चार संघटीत स्त्रियांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक स्त्रीचे काम झालीये, हि चळवळ आज घराघरात पोहाचालीये. पण हि चळवळ त्यांच्या काही  शतका पूर्वीच्या या प्रेरणांना विसरलीये किंवा त्या पासून अनभिज्ञ तरी आहे. आज जिजाऊ आणि सावित्री जयंती विविध स्थरातून साजरी केलीये जातेय. पण स्त्रियांचा सहभाग काही अंशी कमीच आहे. 

या प्रेरणेला पुन्हा समाजाच्या  मुख्य  पटलावर आणणे अतिशय महत्वाचे आहे. कारण त्यात असलेली उर्जा ही प्रचंड आहे. त्या उर्जेच्या साह्याने स्त्री चळवळ आणि स्त्रीचे समाजातील स्थान वाढवायला नक्कीच मदत होईल. 

पुन्हा एकदा  सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!    

आपलेच  कार्यकर्ते,
जिजाऊ.कॉम 
www.jijau.com

Wednesday, January 8, 2014

शरद पवारांच्या कारकिर्दीचे छान चित्ररुपी वर्णन


Friday, January 3, 2014

अनेक (सगळेच नाही) फुटकळ सहित्यिक आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनासाठी

Nikhil Wagle तुम्हास आणि तुमच्या त्या साहित्य संमेलन कव्हर करणाऱ्या आदरणीय बाईस,

राजकारण्यांचा साहित्य संमेलनातील वावर हा काही नवीन शोध नाहीये. शरद पवारांबाद्दलच बोलणार असाल तर तुमच्या मीडियामधील अनेक लोकांपेक्षा त्यांचे वाचन खूप आहे. त्यांच्या ब्लॉग वरून आजकाल ते लिखाण ही तुमच्या प्रिंट मधल्या बंधू भगिनी पेक्षा खूप छान करतात. 

दुसरे. एक तर अनेक (सगळेच नाही) फुटकळ सहित्यिक आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनासाठी जो आटा पिटा करतात त्या पेक्षा इथे जमलेले 'बरेच' आहेत. त्यांना सुमार म्हणून साहित्यातील त्यांच्या योगदानाचे तुमचे सुमार ज्ञान प्रदर्शित करू नये.

आता तिसरे आणि अतिशय म्हत्वाचे. दाभोळकर यांच्या योगदानाबद्दल मेडिया पेक्षा सहित्यीकांना खरी आपुलकी आहे. विषय भेटला की त्याचा रटून-रटून कीस करायचा या शिवाय तुम्ही मराठी साहित्यावर जास्त आणि त्याच्या प्रचार, प्रसार आणि व्याप्ती बद्दल बोललात तर बरे होईल. 

तसेच साहित्य आणि नाट्य संमेलनात हिंदी कलाकार आणून फिल्मी गर्दी जमवण्य पेक्षा राजकारणी आणून राजकीय आणि सामाजिक जाणीव असणारे मंडपात आले तर तेच अधिक बरे! 

जय महाराष्ट्र !


तुमच्या साठी:

Thursday, January 2, 2014

अखंड क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांना अभिवादन

हजारो वर्षाच्या कोंडवाड्यातून स्त्रियांना मुक्ती देऊन त्यांना शिक्षणाचा पहिला मंत्र देणारी आधुनिक युगाची सरस्वती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती !!!

माझ्या तमाम आया - बहिणींना माणूस म्हणून जो सन्मान दिला त्या सावित्री बाईंना कोटी कोटी प्रणाम !!!!!

-- अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे


Wednesday, January 1, 2014

राज्ये आणि त्यांच्या विधानसभा मुदती आणि सदस्य संख्या


S.NO. HOUSE/STATE FROM TO LOKSABHA SEAT ASSEMBLY SEAT RAJYA SABHA SEAT
1 ANDHRA PRADESH 03.06.2009 02.06.2014 42 294 18
2 ARUNACHAL PD. 05.11.2009 04.11.2014 2 60 1
3 ASSAM 06.06.2011 05.06.2016 14 126 7
4 BIHAR 30.11.2010 29.11.2015 40 243 16
5 CHHATISGARH 05.01.2009 04.01.2014 11 90 5
6 GOA 19.03.2012 18.03.2017 2 40 1
7 GUJARAT 23.01.2013 22.01.2018 26 182 11
8 HARYANA 28.10.2009 27.10.2014 10 90 5
9 HIMACHAL PRADESH 08.01.2013 07.01.2018 4 68 3
10 JAMMU & KASHMIR* 20.01.2009 19.01.2015 6 87 4
11 JHARKHAND 04.01.2010 03.01.2015 14 81 6
12 KARNATAKA 29-05-2013 28-05-2018 28 224 12
13 KERALA 01.06.2011 31.05.2016 20 140 9
14 MADHYA PRADESH 13.12.2008 12.12.2013 29 230 11
15 MAHARASHTRA 08.12.2009 07.12.2014 48 288 19
16 MANIPUR 12.3.2012 11.3.2017 2 60 1
17 MEGHALAYA 07.03.2013 06.03.2018 2 60 1
18 MIZORAM 16.12.2008 15.12.2013 1 40 1
19 NAGALAND 14.03.2013 13.03.2018 1 60 1
20 NCT DELHI 18.12.2008 17.12.2013 7 70 3
21 ODISHA 08.06.2009 07.06.2014 21 147 10
22 PUDUCHERRY 03.06.2011 02.06.2016 1 30 1
23 PUNJAB 19.03.2012 18.03.2017 13 117 7
24 RAJASTHAN 01.01.2009 31.12.2013 25 200 10
25 SIKKIM 22.05.2009 21.05.2014 1 32 1
26 TAMIL NADU 23.05.2011 22.05.2016 39 234 18
27 TRIPURA 11.03.2013 10.03.2018 2 60 1
28 UTTAR PRADESH 28.05.2012 27.05.2017 80 403 31
29 UTTARAKHAND 09.03.2012 08.03.2017 5 70 3
30 WEST BENGAL 30.05.2011 29.05.2016 42 294 16
  One seat each for UTs of ANI, CH, DNH, DD and LKD 5    
  Nominated Members in Rajya Sabha     12
  Nominated Members in Lok Sabha 2    
        **545 4120 245***