Friday, October 17, 2014

धर्म आणि जात संघाच्या रक्तात भिनलिये

नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि येणारे अंदाज बघता निकालाची दिशा कळतिये. तसेही, निवडणुकांपूर्वीच आघाडीची सत्ता येणार नाही हे सांगायला फार कुणा महान व्यक्तीची गरज नव्हती. फक्त आघाडी नाही तर कोण? पुढे, लोकसभेतील निकालाने त्याची झलक दिसल्याने अंदाज बंधने अधिकच सोपे झाले. शिवसेनेसोबतची तोडलेली युती हा कुणालाही समजणारा "कमीत कमी पक्ष तरी बांधून घेऊ" चा भाजपचा उदेश्या काहीका होईना सफल झाला.

प्रचाराच्या धुळीत सेनेने भाजपचा पार "कमळाबाई पासून दिल्लीहून आलेल्या फौजा" इथवर उल्लेख केला. आरोप झाले. फेका फेकी झाली. भाजप ने नरेंद्र मोदी या 'प्रचार प्रमुखाच्या' (पंतप्रधानाच्या नाही) जीवावर इथली सतत हातात घेण्याचा जो व्यावहारिक प्रयत्न केलाय त्याला वाखानावे लागेल. ज्या प्रकारे भाजपने महाराष्ट्रातील सरकार कसे अतिशय नाकर्ते होते आणि विकासाच्या नावाने इथे काहीच नाही ही भावना गोबेल्सच्या नीतीने, जाहिरातबाजीच्या साह्याने जनमाणसावर बिंबवली ते भाजपच्या व्यापारीकातेचे उदाहरण.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस ने केलेला कारभार अप टू द मार्क नसला तर महराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय ? असे विचारण्यासारखा तरी नाही. हे समजून घ्यायला पाहिजे. ते का? तर लबाडीच्या जोरावर कुणी महाराष्ट्र काबीज करू इच्छित असेल तर ते चूक. भाजपला वेगळ्या प्रकारची जाहिरात करता आली असती. चांगला जाहीरनामा देता आला असता. पण विकासाच्या नावावर मते मागण्या ऐवजी, त्यांनी दादा काय म्हणाला आणि आबा काय म्हंटला, अमेरिकेत आजपर्यंत डंका वाजला होता का? वाजला होता का? असले प्रश्न विचारले.

माझ्या आजच्या लिखाणाचा उदेश्या तसा कुणाची सत्ता येणार आणि काय होईल हा नाही. भाजपच्या दुटप्पी आणि बेगडी भूमिकेचा चेहरा फक्त चित्रित करायाचाय. तशी या चित्राची सुरवात आणि अंत "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" नावाच्या रेषेनेच करावी लागेल. भाजपची जादू ओसरायला लागलीकी संघातून त्याला रसद पुरवली जाते. आता संघ ही काही अतेरिकी संघटना नाही. देशभरात अनेक ठिकाणी समाज उपयोगी कामे ही संघाच्या माध्यमातून केली जातात. शाळा आणि इतर माध्यमांद्वारे संघ विचारसरणी देशात अनेक वर्षां पासून टिकून आहे.

तर संघाच्या चांगल्या स्वरुपासोबतच संघाचा "हिंदू अजेंडा" ही भारतातील धार्मिक अशांततेला कारणीभूत आणि अप्रगातीला कारणीभूत असणारी एक दुर्दैवी गोष्ट. गेल्या अनेक वर्षात संघ प्रेरित हिंदुत्ववादी संघटना उभ्या राहिल्या. धार्मिक तेढ निर्माण झाली. राजकारणातील विकास आणि भ्रष्टाचार विरोध या गोष्टी बाजूला पडल्या गेल्या. कदाचित ही धार्मिक तेढ नसती तर भारताचे स्वातंत्र्य पासूनचे राजकारण वेगळे राहिले असते आणि हा देशही कदाचित वेगळ्या उंचीवर राहिला असता.

अगदी आजचे, आज म्हणजे आज रोजी १७ ऑक्टो २०१४ चे, संघाचे विचार :

"राम मंदिर हा देशाचाच अजेंडा आहे. त्यासाठी आजवर झालेल्या आंदोलनांना संघाने कायमच पाठिंबा दिला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातही राम मंदिर उभारणीचा उल्लेख आहे. मात्र, त्यासाठी सरकारकडे २०१९पर्यंत वेळ आहे. सरकारचे स्वत:चे काही प्राधान्यक्रम आहेत. सरकारला आधी सामान्य माणसाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे आम्ही आताच सरकारकडे मंदिराबाबत काहीही मागणी करणार नाही" - (संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, )
राम मंदिर हा हिंदुत्ववाद्यांच्या 'हातचा' मुद्दा, कुठे बेरीज कमी पडली कि घेतलाच 'हातचा' ! विकासाच्या नावावर मते मागत असतांना हे असले "छुपे अजेंडे काखेत सुरीसारखे बाळगणे" ही जनतेची फसवणूक होय. तर बरं अयोध्येत राम मंदिर होणे चूक का ? तर नाही. पण विवादित जागेवरच ते व्हावे हा, प्रभूरामांपेक्षाही यांचा असलेला अस्मितेचा प्रश्न, तो चूक! काही युगापूर्वीची रामजन्मभूमी जर अस्मिता होत असेल, तर मग त्याच गणिताने काही अनेक शतकांपूर्वी पासून इथे राहत असलेला आणि इथच्या समाजाचा भाग झालेला आणि झालेले धर्म का म्हणून आपली अस्मिता विसरतील? त्याच गणिताने आजही जातिभेदाच्या जखमा सहन करणारे समाज अस्मिता म्हणून उभे राहिले तुमच्या विरोधात तर, का म्हणून त्याची ऍलर्जी ? या प्रश्नांची उत्तरे देतांना "आम्ही नाही त्यातले" असा आव संघ सदैव अनत आलाय, तोच त्याचा बेगडीपणा. मुखात राम बगलेत सुरा. किंवा मग अतिशय सोप्पा मार्ग म्हणजे स्वतः साठी एक नियम आणि इतरांसाठी दुसरा.

त्यांच्या भूतकाळापासून आजवरची संघाची विचारसरणी बघितल्यास साचेबद्ध आखणी दिसेल आणि धर्म आणि जात संघाच्या किती रक्तात भिनलिये ते समजेल. हा सगळा अट्टाहास या साठीच की शाहू फुले आंबेडकर आणि गांधी यांचा द्वेष करणारे त्यांच्या नावे मते मागून त्यांना हवे ते 'अजेंडे' समोर आणणार असेल तर त्याचा विरोध प्रत्येक नागरिकाने करावा. लोकशाहीत मते मागायला बंधन नाही. तुमच्या विचारसरणीची लोके इथे असतील तर बिलकुल तुम्ही निवडून याल. पण मते मागतांना तोंडावर एक आणि सत्ता गाजवतांना काखेत एक असे करणे म्हणजे शुद्ध फसवणूक!
  
संघाच्या वेबसाईट वरील हा मजकूर -

यह भारतीय राष्ट्रजीवन, अर्थात हिंदूराष्ट्र है | ‘हिंदू’ शब्द जातिवाचक नहीं है | अनादि काल से यहाँ का यह समाज अनेक संप्रदायों को उत्पन्न कर, परंतु एक मूल से जीवन ग्रहण करता आया है | उसके व्‍दारा यहाँ जो समाज स्वरूप निर्माण हुआ है, वह हिंदू है |-परम पूज्य श्री गुरूजी
      

संघ सुरु होत असतांना -
पुढे -

श्री गुरुजी को संघ का सरकार्यवाह घोषित किया।
हिंदी और मराठी प्रार्थना के स्थान पर संस्कृत प्रार्थना स्वीकृत।
संस्कृत में संपूर्ण आज्ञाएँ देना प्रारम्भ।

संपूर्ण व्यवस्था नव्हे तर त्यातील 'हिंदूच फक्त' 'राष्ट्रीय' नाव धारण करणाऱ्या या संघटनेचे मूळ आहे. असण्याला हरकत नाही. पण राष्ट्रीयत्वाच्या नावाने सूर आळवू नये असे वाटते -Swyamsevaks Participated in 'Bhaganagar Mukti Sangram' satyagraha, [Hydrabad freedom movement] a movement against the Nizam rule and its Hindu repressive policies.
वीर सावरकर ने पुणे प्रांतिक बैठक को संबोधित किया।
श्यामा प्रसाद मुखर्जी ने डॉक्टरजी से मिलकर बंगाल के हिंदुओं  की दुर्दशा पर चिंता व्यक्त की।


3 जून काँग्रेस ने विभाजन का प्रस्ताव स्वीकार किया। हिंदू समाज तथा स्वयंसेवकों को यह जबरदस्त आघात लगा। विभाजन की अपरिहार्यता देखकर संघ ने हिंदुओं को मुस्लिम अत्याचारों से बचाने पर लक्ष्य केंद्रित किया। 300 से भी अधिक सहायता शिबिर हिंदू शरणार्थियों के लिए चलाए।आणि १९९० ते २००० ला ते हे म्हणतात -

The decade of Ram-Janmabhoomi movement. A great Hindu upsurge of unity. 

तर हा काही नवीन शोध नाही की संघ हा हिंदुत्व वाढी आहे. तो आहेच हिंदुत्ववादी आणि ज्याला सत्ता स्थापनायासाठी संघाने मदत केलीये तो पक्षही हिंदुत्वादी आहे, इतकेच काय ते पुन्हा सांगायचे. तुम्ही म्हणाल आहे हिंदुत्ववादी, त्याने काय फरक पडतो? तर, भूतकाळात पुन्हा एकदा डोकावून बघा. यांना अपेक्षित असणारा हिंदुत्ववाद हा संघाला पुळका असलेले लोक म्हणतील त्या दिशेला इतरांनी पूर्व म्हणावे असा आहे. मानसिक गुलामगिरी सहन करून जगल्याने देशाचे इतके वाटोळे झालेय कि पुन्हा ते दिवस नकोत. इतकेच.

अजूनच संघाच्या इतर साचेबद्ध गोष्टींकडे आजच लोकसत्तेतून  कोरडेंनी प्रकाश टाकलाय. http://www.loksatta.com/vishesh-news/rss-and-other-fundamental-hindu-organisation-ever-ridicule-mahatma-gandhi-1032194/?nopagi=1.

असो. इथे तरी आम्हाला पुन्हा धर्माच्या नावाने दंगली नकोयेत!

No comments:

Post a Comment