Friday, December 27, 2013

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन : मुख्यमंत्री कार्यकर्ता : A Common Man for The Common Man!


खऱ्या लोकशाहीत जे अशक्य नाही तेच दिल्लीत झाले आहे. पण ते करण्यासाठी जी इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी लागते ती अरविंद केजरीवाल आणि टीम ने दाखवालीये. 

आज त्यांचा झालेला शपतविधी म्हणजे लोकांच्या व्यवस्थेवरील विश्वासाचे यश आहे. 

केजरीवाल आणि टीमचे अभिनंदन आणि या वाटचालीत लोकसेवेची कामे करण्यासाठी शुभेच्छा!

आम्ही मुख्यमंत्री वर सदैव म्हणतो    

मुख्यमंत्री कार्यकर्ता  : A Common Man for The Common Man!


आज एक Common Man मुख्यमंत्री  झालाय याचा मुख्यमंत्री ला नक्कीच आनंद झालाय!  

जातीभेद, आरक्षण आणि मराठा जात

जातिभेदाच्या विरोधात लढता लढता कधी माणूस 'एखाद्या जातीचा' किंवा 'एखाद्या जातीच्या विरोधातला' होवून जातो हे कळतच नाही. ते खूप चांगल्या प्रकारे सांभाळून जाती निर्मूलनाची चळवळ करायला बाबासाहेबच लागतात.

असेच काहीसे माझे झाल्यासारखे मागील काही दिवसात मला वाटले. एका, डोक्याने शांत, व्यक्तीशी चर्चा केल्यावर माझे मलाच काही दिवसात ते उमगले आणि मग 'युरेकाच'!

गेल्यानेक वर्षांपासून जातीनिर्मुलांच्या चळवळीच्या कधी मधे  आणि कधी आजूबाजूला राहून जे बघितले त्याचा बराच परिणाम विचारांवर झाला. सुरवात तर वंचितांचा विकास, ते मग तथाकथित सवर्ण असोत कि तथाकथित अवर्ण, या मुद्द्यापासून झाली. कळायला लागले की जातींच्या उतरंडीमधे वरती असणारांनी उतरंडीतील खालच्यांचे शोषण केले.  त्यांना प्रवाहापासून दूर ठेवले. वेळच पडली तर प्रवाहात येणार्यांचे प्रयतन हाणून पडले, पुढच्या पिढ्यांचे वर्चस्व टिकवण्यासाठी. बर हे ही कळाले कि हे सगळे भूतकाळात तर होतेच पण अजूनही आहेत आणि भविष्यात ही आपले अस्तित्व आणि वर्चस्व कसे टिकून राहील यासाठी यांच्या भूमिगत आणि भूमीवर कारवाया चालूच असतात. याचे फारच दुख झाले. त्याही पेक्षा जास्त राग आला. काही अंशी विचार करतांना आणि मांडतांना चुकलोही. पण शिकलोही, याचा आनंद.

आज महाराष्ट्रातील जातीय परिस्थिती ही कधी नव्हती इतकी बिकट आहे. मराठे ब्र्म्हनांच्या विरोधात उभे आहेत, इतर बहुजन मराठ्यांच्या विरोधात उभे आहेत तर दलित ब्राम्हण आणि मराठ्यांच्या विरोधात उभे आहेत; इतर बहुजनांना ते वाट चुकलेले समजून सोडून देतात. सगळीकडेच उघड उघड नसला तरी आप-आपसातील द्वेष सगळीकडेच सळसळतोय. पण यातच या सामाजिक प्रश्नाच्या मड्यावरचे 'आर्थिक' आणि 'राजकीय' लोणी खाण्याचे काम काही लोक करताहेत. मेलेल्या मड्यावरचे लोणी तसेही कुणी वापरत नाही; म्हणून एकवेळी फक्त खाल्ले असते तरी प्रश्न नव्हता. पण अगदीच या प्रश्नात जास्तीत जास्त मडे पडवीत आणि वाटी येणारे लोणी वाढावे म्हणून जे प्रयत्न चाललेत याची सुजानांनी वेळीच दखल घ्यावी.

या प्रश्नांवर खालील काही प्रश्न मला विचारले गेले, काही मी स्वतःला विचारले, उत्तरे शोधली. बरच काही सापडल. कदाचित उपयोगी पडेल म्हणून इथे देत आहे.

अजूनही जातीभेद अस्तीत्वात आहे का?
होय.

अजूनही लग्ने जातीतच होतात. जातीवरून कुणाच्या विचाराला किती मान द्यायचा ते ठरवले जाते. जातीवरून बुद्धिमत्तेचा अंदाज हि बांधला जातो. नौकरीतल्या मुलाखतीत 'हा' चांगले काम करू शकेल की नाही याचा अंदाजच बांधला जात असल्याने बऱ्याच जागेवर हा अंदाज जातीच्या कलेने जातो. तितकेच काय तर डॉक्टरकडे जात्तांनाही अजूनही विशिष्ट जातीचा असल्यास मनात नाराज भावना ठेवणाऱ्यांची कमी नाही.

याचा अनुभव तुम्ही विशिष्ट जातीतील नसाल तर तुम्हाला येईल, कारण लोक खुलके बोलतात. जातीभेद अस्तित्वात आहे यात प्रशनच नाही. 

एकदा गलत फ़ैमितुन उतरंडीत मला वरचा समजून उतरंडीत मी जीथाचा आहे त्या जातीबद्दल - 'हे असेच असतात… आपल्या सारख्याने यांच्या पासून दूर राहावे… वगैरे वगैरे' गोष्टी ऐकायला भेटल्या.   

दुसऱ्यांदा एका दुसर्या जातीच्या मित्रासोबत मुलगी पाहायला गेलेलो असतांना राजकारणात 'माझ्या जातीच्या' लोकांनी कसे इतर जातींना पिचलेय आणि आता 'यांना' इंगा दाखवायची वेळ आलीये पण आपले लोक संगठीत होत नाहीत हे दु:ख ऐकायला भेटले.

काही जातींना मंदिर बंदी आणि जेवणाच्या पंगतीतली विशिष्ट जागा हे तर जातीभेदाचे खूप विदारक सत्य आहे. समाजाचा भाग म्हणून राहतांना तुम्ही कितीही प्रगती करा पण या जाचक पद्धत्तीत तुमची गय नाही, हीच भावना कायम टाप-डाऊन  भरवली जातीये, अजूनही!  

प्रश्नांचे मूळ जातीत शोधण्यापेक्षा ते अर्थशास्त्रात सापडेल का?
नाही.             

पैशाने 'जात' जात नाही. भलेही तुम्ही आर्थिकरित्या सक्षम व्हा, जातीय उतरंडीत प्रमोशन नाही! जातीचे आणि अर्थव्यवस्थेचे फार छान गणित लावून ठेवलेय. उतरंडीत वर-वर 'जास्तीत जास्त संपती' आपोआप आणि 'कमीत कमी परिश्रम' करून कशी जमेल याची व्यवस्था आहे.

सध्या त्या व्यास्थेला चांगले तडे गेलेत पण जमा झालेल्या संपत्तीचे विकेंद्रीकरण व्हायला खूप वेळ आहे. 'आधीच पैसा असणारांकडे जास्ती पैसा येतो' या नियमाने आर्थिक उतरंडीतही सिक्वेंस जवळपास कायमच आहे.

म्हणूनच बाबासाहेब एकेजागी सांगतात मार्क्स इथे असता तर त्याने आपला लढा आर्थिक मुद्यावर नाही तर सामाजिक मुद्यावर सुरु केला असता. 

पण सगळेच तथाकथित उच्चवर्णीय जातीभेद करतात का?
सगळेच नाही. टोप-डाऊन 'बहुतांश' करतात.

उदाहरणच घ्यायचे झाले तर राजकारणात मोठा होणारा खालच्या जातीचा मराठयांना चालत नाही. त्याला पडायला जमलेच तर विरोधकांच्या पायाशी बसतील पण डोक्यावर इतर कुणी येवू देणार नाहीत.

दुसरे उदाहरण माध्यमात दिसेल. त्यातली त्यात प्रिंट मध्ये. कदाचित जुने असेल म्हणून, पण तिथे हे प्रकर्षाने जाणवते. समजा रविवारच्या मुख्य वृत्तपत्रातील लेखक आणि त्यांच्या लिखाणाचे विषय बघा. सगळेच एका जातीतले. आता ही त्यांची चूक की कदाचित सत्यच हे असेल की फक्त एक विशिष्ट जाताच लिहू शकते किंवा चांगले काम करते. ही जर चूक असेल तर ती मग लिहानारांची किंवा ते चांगले काम करणारांची का? तर नाही, ती फक्त त्यांनाच प्रसिद्धी देनारांची.  

पण काही लोक असेही आहेत की ज्यांना जात हा मुद्दाच नाही.           

मग उत्तर काय?
जात बाजूल ठेवून निर्णय घेणारी व्यवस्था. जातिभेदाला वाव असेल तेथे लक्ष ठेवणारी आणि तो होऊ नये म्हणून दक्षता घेणारी व्यवस्था. शहरीकरण. चांगले आयुष्य न गमावता, लोकांचे विस्थापन. शिक्षण आणि मानवी मूल्यांच्या शिक्षणावर भर. 

आरक्षणाने जातीभेद वाढतोय का?
नाही. या कारणाने जातीभेद कारणांच्या भीतीनेच आरक्षण ठेवावे लागतेय.

मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का?
होय. पण त्यात क्रिमी लेयर ची मर्यादा असावी.

मराठा समाज हा महाराष्ट्रातील संख्येने सगळ्यात मोठा असलेला समाज आहे. मुख्यतः शेती हा व्यवसाय असल्याने आणि वडिलोपार्जित या संकल्पनेच्या अतिशय आहारी गेल्याने नव्या प्रवाहात सामील व्हायला याला वेळ लागला. मराठ्यान सोबत तसे पाहिल्यास जातीय भेद होत नाही. पण अ-राजकीय शासन व्यवस्थेतला सहभाग संखेच्या मानाने कमी आहे.

अगदीच साध्या भाषेत म्हणायचे झाल्यास मराठ्यांना नौकार्यांना लावा म्हणजे ते राजकारण सोडतील! संखेने जास्त असल्याने नौकरी वाल्या मराठ्यांच्या पुढच्या पिढ्या ग्रामीण व्यवस्था, आणि मुख्यतः त्यातली जातीय व्यवस्था विसरतील यात शंकाच नाही. पण हे आरक्षण फक्त नौकऱ्या आणि शिक्षणात असावे नसता, अरेरावी मजल्या शिवाय राहणार नाही!

खुल्या वर्गातील आर्थिक मागासांचे काय?
शिष्यवृत्या. हा त्यावरील सगळ्यात चांगला पर्याय आहे.
   
या सगळ्या आणि अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे शोधताना जाती निर्मुलन येत्या काही दशकात शक्य आहे असे वाटते. पण जातीय चळवळी जातीनिर्मुलानाचा रस्ता भटकून जाती द्वेषाच्या रस्त्याने गेल्या नाही तरच!

-
प्रकाश बा. पिंपळे


       

'आप' चे अभिनंदन आणि शुभेच्छा - तुम्हाला लोकसभेचे तिकीट हवे आहे काय?

'आप' ने लोकशाही मार्गाने भ्रष्टाचार आणि इतर प्रश्नांच्या विरोधात लढायचे ठरून जे पाऊल उचलले आहे, ते अतिशय अभिनंदनिय आहे.

पूर्ण वेळ जर तुम्ही आंदोलनच करत असाल तर व्यवस्थेत येवून त्याला चांगले स्वरूप देणे व्यवस्था पालनाचे आणि व्यवहारीकतेचे उदाहरण होईल. जनतेचे प्रश्न सोडत असतांना घरच्या भाकरी खावून ते करण्याची आज गरज नाहीये. शासन
ही व्यवस्थाच त्या साठी आहे. तिचा 'योग्य' उपयोग, दुरुपयोग नव्हे, करूनच लोकांचे प्रश्न सोडवले जावेत.

आता आप ने दिलेली आश्वासने ते पूर्ण करतात कि नाही तो वेगळा प्रश्न. पण असेही कॉंग्रेस किंवा भाजपा तरी कुठे तीर मारत होते. ज्या प्रकारे डाव्यांनी राजकारण प्रामाणिकपणाचा स्थंभ सांभाळून ठेवला तसेच आप ने एखादा भ्रष्टाचार निर्मुलनाचा स्थंभ ही सांभाळा तरी खूप झाले.

त्यांच्या सध्याच्या बर्याच संकल्पना बालिश आहेत, त्या वेळेनुसार परिपक्व होत जाव्यात ही सदिच्छा!

जनतेला एक विशावासार्ह पर्याय मिळतोय असा आता कुठे कुठे दिसतेय.  त्यांनी घालवून दिलेल्या या पद्धतीचे स्वागत.

प्रामाणिक काम करणारांसाठी 'आप' ही  एक 'व्यावहारिक' चौईस आहे हे मात्र मानावे लागेल.

आप चे लोकसभेचे उमेदवार म्हणून २०१४ ची निवडणूक लढवायची इच्छा असेल तर हा फॉर्म  भरा .

फॉर्म भरल्यानंतर तो खालील पत्यावर फोटो सहित पोस्टाने पाठवा किंवा स्कॅन करून या मेल आयडी वर पाठवा: aapls2014@gmail.com

पत्ता :

पंकज गुप्ता,
आम आदमी पार्टी,
ए - ११९, कौसंबी,
गाझियाबाद - २०१००२,
उत्तर प्रदेश.

अजून मदत हवी असल्यास आम्हाला संपर्क करा!

    

Thursday, December 19, 2013

Loksatta and 'Khobragade'

Yesterday's article in Loksatta doesn't show a neutral view at all. You can make it up from sentence like this "प्रस्थापितांच्या शोषणाविरोधात ते नेहमीच आवाज उठवत आले आहेत. अशा या कर्तव्यतत्पर उत्तमरावांना आपल्या पोटच्या पोरीच्या घरी होणारे मोलकरणीचे शोषण कसे टोचले नाही? आपल्या कन्येकडून नियमभंग होत आहे, याची जाणीव या जागरूक तीर्थरूपांना होऊ नये? ". There is a caste at the back of editors mind. The current issue is that of the violations of the human rights and violation of the rights of a representative of a nation. Which given attention to details can be found valid and editors from news paper like Loksatta can rightly guess it. But it seems they don't want to. Today they have come up with an explanation of the act by the Preet Bharara. I think somehow they want to show the only one side of issue as they have not talked about the supreme court judgment, strip and cavity search of the Indian Diplomat, etc. Or may be they don't believe in the Indian system and have bowed with soul and heart to the Amarika and Amarikan society with hope that one day they all will get green cards and then they can leave this country full of corruption, with 50% reservation and ruling class coming from the non-elite class!

लोकसत्तेत मुंजे पुन्हा पिंपळावरून उतरले

जातीय द्वेषातून लिहिलेले हे  लोकसत्तेतील संपादकीय 'लोकसत्तेत मुंजे पुन्हा  पिंपळावरून उतरले' याचेच उदाहरण आहे. हे जातीय मुंजे चान्स भेटला कि उतरून डान्स करतात.

इथाची जातीय व्यवस्था टिकावी म्हणून बाहेरच्यांचे तळवे चाटायला ही कमी करणार नाहीत याचे हे नमुनेदार उदाहरण आहे. वैचारिक भिकारी!
(आदर्श असो किंवा इतर घोटाळे त्यांची न्यायिक चौकशी व्हावीच. पण ते मुद्दे वेगळेच!)

"मीरा शंकर, हरदीप सिंग हे ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी असोत वा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, यांनाही अमेरिकेने अपमानास्पद वागणूक दिली होती. त्यावेळी आपला राष्ट्रवाद कधी इतका उफाळून आल्याचे दिसले नाही. खोब्रागडेबाईंनी केलेले काम कोणते 'आदर्श' की, आपण त्यांच्या अटकेचा एवढा गहजब करावा?"

पूर्ण : http://www.loksatta.com/sampadkiya-news/us-shameful-behaviour-towards-indian-deputy-consul-general-devyani-khobragade-310542/2/


अजूनही रक्त गरम होत नसेल तर ऐका :

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो:

Sunday, December 8, 2013

लोकशाहीचा विजय असो.....

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा सेमी फायनल म्हणून झालेल्या ४ राज्यांच्या निवडणुकांचा निकाल अखेर लागला. चार हि राज्यात कॉंग्रेस नावाच्या मस्तवाल हत्तीला देशाच्या सामान्य मतदारांनी अक्षरशः  चारी मुंड्या चित केले. कुणी म्हणतय हा कॉंग्रेस चा अस्त तर कुणी म्हणतंय मोदी युगाचा प्रारंभ !! माझ्या हा केवळ आणि केवळ लोकांचा आणि लोकशाहीचा विजय आहे.

यंदा मतदानामध्ये झालेली प्रचंड वाढ, युवकांचा, आदिवासींचा, मागासलेल्या राज्यांचा या संपूर्ण निवडणुकीमध्ये गांभीर्याने असलेला सहभाग यामुळे हि निवडणूक सामान्य माणसाच्या मुद्यांवर लढली गेली, जात, धर्म - भाषा यांना झुगारून निकोप लोकशाहीला अभिप्रेत असणारी निवडणूक अतिशय उत्साहाने पार पडली आणि म्हणूनच ज्यांचा २ वर्षापूर्वी राजकीय जन्म देखील झाला नव्हता अश्या आम आदमी पार्टी ला दिल्ली करांनी सत्तेच्या दाराजवळ नेउन सोडले.

खर तर निवडणूक हि तुमच्या आमच्या प्रश्नांची खोलवर चर्चा करून ती सोडवण्यासाठी राजकीय पक्षांनी  आक्रमकपणे पुढे येण्याची प्रक्रिया, पण गेली काही वर्षे सामन्यांच्या प्रश्नांना बगल देऊन केवळ साम - दाम - दंड - भेद यांच्या बळावर पुरती चिखलफेक करण्याचा महोत्सव बनला होता. आम आदमी पक्षाने दाखवून दिलेली बदलाची चाहूल खरोखरच नव्या आशेचा किरण म्हणून बघता येईल.

संपूर्ण देशात सामान्य माणसापासून तुटलेल्या कॉंग्रेसच्या विरोधात एक सुप्त लाट आहे हे कुणी हि अमान्य करू शकणार नाही, पण या लाटेवर आयते स्वार होणाऱ्यांना हि सामान्य जनतेने एक सूचक संदेश दिला आहे कि येणारी निवडणूक हि सामन्यांच्या प्रश्नावर लढवली गेली नाही तर प्रस्थापितांना हि वेळप्रसंगी धूळ चारून कुण्या तिसऱ्याच्या हाती सत्तेचा सोपान चढवायला हि भारतीय जनता मागे पुढे पाहणार नहि.

मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये लोकांनी दाखवून दिले कि राष्ट्रीय स्तरावर कुठलेही वारे असू दे अथवा लाट या पेक्षा हि स्थानिक प्रश्नांना ज्यांनी प्रामाणिक पणे हात घातला अश्या शिवराज सिंग चौहान किंवा रमणसिंग यांचे हात अजून  बळकट केले.

केवळ लाट, हवा किंवा निवडणुकींच्या वेळी केलेली खैरात यांच्यावर स्वार  होऊन निवडणुकांच्या महोत्सवात एखाद्या पक्षाचा झेंडा बुलंद करण्याचे दिवस आता गेले, बाबासाहेबांनी दिलेलि लोकशाही आणि त्याची ताकद सामान्य जनतेला, मुख्यतः युवकांना उमगली आहे आणि ते याचा वापर देशाच्या, राष्ट्राच्या उन्नती साठी नक्कीच करून घेतील.

निवडून आलेल्या सर्व पक्षांचे , उमेदवारांचे अभिनंदन

शेवटी लोकशाहीचा विजय असो.

भारत मत कि जय !

- अमोल