Tuesday, May 31, 2011

बदलाचे पाऊल

कालच्या वर्तमान पत्रातील ही बातमी खूप आवडली. बदलाचा नवा चेहरा हा असा हवा आणि हा चेहरा सर्वपरिचित होवून समाजाच्या प्रत्येक थराला हाच चेहरा मिळावा. अजून काय हवं होत आपल्या महापुरुषांना...
--


                                                                दलित उद्योजकांचे भारतीय उद्योग जगतात पदार्पण

- इतरांना
 मुख्य प्रवाहात आणण्यासाठी

- दलित इंडियन
 चेम्बर्स ऑफ कॉर्मस

- अँड
 इंडस्ट्रीजच्या मुंबई शाखेची स्थापना



एकेकाळी ‘दलित भांडवलवाद’ हा विषय सामाजिक-आर्थिक चर्चेच्या दृष्टीने खिजगणतीत नव्हताकाळ बदलला. काळानुसार सामाजिक मानसिकताही व्यापक होत नवोन्मेषी विचारसरणी रुजतगेली आणि अखेरीस दलित समाजातील शिकल्या सवरलेल्या लोकांनीच पुढाकार घेऊन ‘दलित इंडियन चेम्बर्स ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्रीजची (डीआयसीसीआयस्थापना करून भारतीय उद्योगजगतात मोठय़ा आत्मविश्वासाने आणि निर्धाराने पाऊल टाकलेएका अर्थाने डॉबाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले स्वप्न साकार होत आहे.

भारताची
 आर्थिक राजधानी आणि अनेकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी महानगरी म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईत शनिवारी दलित उद्योजकांनी एकत्र येऊन ‘डीआयसीसीआय’ चीस्थापना केलीकेवळ एक उद्योजकांचे संमेलन किंवा एखाद्या औद्योगिक चेंबरच्या नव्या शाखेचे उदघाटनएवढीच या घटनेची व्याप्ती नाहीतर याला एक सामाजिक आयाम आहे,समाजव्यवस्थेताली बदलाचा! कारण ही संस्था म्हणजेकेवळ आणखी एक औद्योगिक चेंबर नाहीतर देशाच्या समाजव्यवस्थेतील सर्वात वंचित घटकाने देश चालविणार्या कॉर्पोरेट क्षेत्रातकेलेली ही एन्ट्री आहे.

क्रांतीकारी
 अशा या योजनेबाबत माहिती देताना डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले कीदलित समाजाच्या उत्थानासाठी उद्योगधंदे किंवा भरीव काही आपणकरणार की नाहीअसा सवाल पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी उपस्थित केल्यानंतर आम्ही एक अँक्शन प्लॅन तयार केलात्यानुसार, डिक्कीची स्थापना करत दलित समाजाला प्राधान्यमिळण्यासाठी आम्ही काम सुरू केले.

चेंबरच्या
 कामाची सुरुवात केल्यानंतरप्रथम पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सातारासांगलीकोल्हापूर येथील शाखेची स्थापना केलीपरंतुमुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानेस्वाभाविकपणे आम्ही मुंबईतही नुकतीच शाखा सुरू केली. कॉर्पोरेट क्षेत्राचा मानबिंदू असणार्या  ताज महल हॉटेलच्या रुफटॉपवर एका आलीशान कार्यक्रमात आम्ही चेंबरच्या मुंबई शाखेचेउदघाटन केलेदलित समाजाचे आणि यशस्वी उद्योजक म्हणून गणले जाणारे देशभरातील एकूण 1 हजार उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित होतेपाच लाखांहून अधिक खर्च झालेल्या याबैठकीसाठी मुंबई शेअर बाजाराचे अनेक उच्चपदाधिकारी आवर्जून उपस्थित होतेया सर्वांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केलेर्मसिडिजबीएमडब्ल्यूऑडी अशा आलिशान गाड्यांनीताजमहल हॉटेलचा परिसर फुलून गेला होता. या ही शान गाड्यांचीर्शीमंतीची नव्हतीतर बदलाच्या एका नव्या पर्वाची होतीअसे कांबळे यांनी अभिमानाने सांगितले.

आजवर
 आम्ही रोजगाराच्या शोधातील लोक होतोपण आम्ही आता जगाला दाखवून दिले आहे कीआम्हीही रोजगार निर्मिती करू शकतो..कांबळे म्हणालेत्यांच्या या विधानाची साक्ष याकार्यक्रमातील उपस्थितांकडून आणि त्यांच्या वक्तव्यांवरून पटत होती.

550 कोटी
 रुपयांची उलाढाल असलेल्या दास ऑफशोअरचे सर्वेसर्वा अशोक खाडे म्हणाले कीआता भविष्याचा वेध घ्यायचा आहेभविष्य आपले आहेतरपेट्रोनेट इंडिया लिचे माजी मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद तेलतुंबडे म्हणाले कीकाही मोजके दलित उद्योजक आज या निर्मितीचा आनंद घेत आहेतअर्थात त्यांना जनसर्मथन मिळणेही आवश्यक आहे.

शोषित
वंचित असल्याने पिढय़ानपिढय़ा पाठीवर वागवलेल्या ओझ्याची शिदोरी..भाळी नाही रे वर्गात वावरण्याची सामाजिक शिक्षा..उपराउचल्या अशी संभावना वाट्याला आलेल्यांनी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावाअसा आर्थिक उद्धाराचा नवा प्रपंच सिद्ध केला आहेअगदी डॉबाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या उन्नतीच्या मार्गाने!





सध्या
 डिक्कीचे राज्यात 400 तर देशात एकूण एक हजार सदस्य आहेतसातारासांगलीकोल्हापूर आणि मुंबईमध्ये शाखा सुरू झाल्या आहेत. लवकरच पुणेनाशिकनागपूरऔरंगाबाद येथेशाखा सुरू होणार आहेततर त्यापाठोपाठ दिल्लीपंजाबगुजरातलुधियानासह देशात 50 ठिकाणी चेंबरच्या शाखा सुरू करण्याचा मानस मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केला. 



आम्हाला कनेक्शन हवेतकन्सेशन्स नकोत !

मिलिंद
 कांबळे,
अध्यक्ष
डिक्की


सौजन्य:  लोकमत आणि मयूर चिटणीस 

Friday, May 27, 2011

बारावीचा निकाल

बारावीचा निकाल येथे पाहता येइल  : http://msbshse.ac.in/NewSite/NewHome.html
एकंदर राज्यस्तरावर निकाल ७०.६९% आहे.
विभागीय आकडेवारी ही या त्याच संकेत स्तळावर पाहता येइल.

Friday, May 20, 2011

राजमाता जिजाऊ : आऊ साहेब डोळ्यासमोर उभा करणारा चित्रपट

एक खूप आनंदाचा क्षण अनुभायाला भेटला काल, तो म्हणजे 'राजमाता जिजाऊ' या चित्रपटाचा प्रीमियर. आऊसाहेबांच्या जीवनावर आधारित असा हा चित्रपट आज दिनांक २० मे २०११ रोजी प्रदर्शित होतोय. योगा योग असा की अगदी याच दिवशी २००८ रोजी जिजाऊ.कॉम चे पहिले पाऊल पडले.

"राजमाता जिजाऊ" हा जिजाऊ साहेबांच्या आयुष्यावर आधारित असा पहिला वहिला चित्रपट आहे. आज या मराठी मातीत आणि मराठी माणसाच्या मनात असणाऱ्या स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे बीज कधी याच मातेने शिवबा मध्ये रुजवले. या पेरणीचा  आणि पुढे स्वराज्याच्या वाढीचा आलेख म्हणजे "राजमाता जिजाऊ" हा चित्रपट.

सुंदर आणि कणखर असा मावळ प्रांत; आणि त्यात तसेच व्यक्तीमत्व असणारी एक आई आपल्या बाळाला स्वातंत्र्याचे धडे देते, त्याच्यात स्वाभिमान, समानता आणि शौर्य अशी मुल्ये रुजवते असे एकंदर कथानक. पण चित्रपट पाहिल्यावर आपण फक्त इतकच नव्हे, तर अजून खूप काही पाहिलंय ही भावना बाहेर घेऊन पडतो. लहाना पासून ते मोठ्यां पर्यंत प्रत्येकाला माझ्यासाठी 'हे' सांगितले जातेय असे वाटते.

चित्रपटातील गाणी तर इतकी अप्रतिम की प्रत्येक गाण्यागाणीस अंगावर रोमांच उभा राहतो.  कैलास खेर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, नंदेश उपम यांनी अप्रतिम अशी गीते गायली आहेत, काही ओळी काळजाला भिडतात तर काही थेट डोक्याला, तर काही थेट आपल्याला घोड्यावर बसवून शिवकाळात घेऊन जातात.

प्राचार्य स्मिता देशमुख (आता आमच्यासाठी आऊसाहेबाच) ह्या जिजाऊ साहेबांच्या भूमिकेत आहेत, तर अमोल कोल्हे हे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत आहेत. अप्रतिम अशा अभिनयाचा दाखला दोघांनी ही दिलाय. पण ज्या प्रमाणे शिवरायांच्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात प्रत्येक मावळ्याचा जसा तितकाच सहभाग होता, तसाच तितकाच कसोशीचा अभिनय इतर कलाकारांनी ही केलाय. अगदी काहीच ठिकाणी बाल कलाकार अजून अप्रतिम असा अभिनय करू शकले असते असे वाटते. पण शिवराय साकारणे तसे मुश्कीलच, नाही का? पण संवाद इतके जबरदस्त आहेत की कुठे कुठे अभिनयातील हे चढ उतार ही दिसतच नाहीत.

चित्रपटात एकापेक्षा एक असे संवाद, फार कमी वेळात जिजाऊ आणि शिव चरित्राबद्दल खूप काही सांगून जातात. बर ते सांगणे फक्त जिजाऊ आणि शिव चारीत्राबाद्दलचेच राहत नाही तर त्या काळचा इतिहास ही सांगून जातात.
चित्रपटातील आम्हाला खूप खूप आवडलेले काही दृश्य म्हणजे, पुण्यातील जमिनीवर चालवलेला सोनेरी नांगर, छत्रपती आणि जिजाऊ याच्यातील अनेक संवाद, शिवबा आणि मावळ्यांचा एकमेकांच्या डोळ्यात पाहून झालेला संवाद, शाहिस्तेखानाचा वध, राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांना दाटून आलेली शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या स्वराज्याच्या कामी आलेल्या स्वराज्याच्या आधार स्थंभांची आठवण आणि अजून काही.

चित्रपटात फक्त जिजाऊ चरित्रच नव्हे तर शिव चरित्र ही पाहिल्यावेळेस इतके त्यांच्या प्रत्येक पैलूसहित चित्र रुपात आपल्या समोर उभे राहते. "हे माझं राज्य नाही, हे रयतेचे किंवा श्रींचे राज्य आहे" म्हणजे काय हे राज्याभिषेकाचे दृश्य पाहिल्यावर कळते.

पूर्ण चित्रपटभर आऊ जिजाऊ आपल्याला खंबीर बनवत जाते, पण शेवटच्या दृश्यात जिजाऊ प्रेमींच्या डोळ्यात अश्रू उभे करून जाते.

चित्रपटाला जिजाऊ.कॉम आणि मुख्यमंत्री कार्यकर्ता च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

सहकुटुंब (लहानगे आणि स्त्रियांनी तर आवर्जून - आधुनिक जिजाऊ-शिवबा) पहावा असा हा एक मनोरंजन, विचार आणि संस्कार देणारा चित्रपट आहे.





एक छान असे संकेत स्थळ ही चित्रपटासाठी rajmatajijau.com या नावे आहे.
    

"पांगिरा" - बदलत्या गाव पांढरीची कहाणी!


"पांगिरा" - बदलत्या गाव पांढरीची कहाणी, गावाचं जगणं कसं बदललं आणि ते यापुढेही कसं बदलत जाणार हे सांगणारा एक हृदय स्पर्शी चित्रपट !

ह्य़ा रांडमुंड वस्त्या
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड
शिवारामधल्या शिवीला आणि जात्यामधल्या ओवीला
गोठय़ामधल्या गाईला आणि थानं सुकलेल्या आईला
परकर पोलक्यामधल्या तायडीला नि पाळी चुकलेल्या बायडीला
खांदा नसलेल्या कावडीला नि गळा सुकलेल्या बावडीला
घे स्वप्नांचं पीक नि जागा मिळंल तिथं वीक
विकलं गेलं तरीबी ठीक, नाहीतर जा की मरणं शीक.
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड
उंबरा तुटलेली दारं, ही चौकटी फुटलेली घरं
वांझ झालाय पापणीचा पूर, विझून गेलाय चुलीमधला धूर
कोरडय़ाठाक आभाळाचं हे मातीमोल गाऱ्हाणं
कपाळपांढऱ्या गर्भामधलं हे हंबरणारं गाणं
जन्मनागव्या पाठीवरचा हा चरचरणारा वळ
दुखपांगळ्या पायांमधलं हे थरथरणारं बळ
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड
सेनेगल, सोमालिया, व्हेनेझुएला, मेक्सिको, हाइती
चंदीगड, सिमला, तिरुअनंतपुरम, नाशिक, नगरची भावकी
तांबवे खुर्द, म्हसवे बुद्रुक, मौजे कासारवाडा ठावकी
मका लांब पळत गेला, गायब झाली तूर
रान होतं उंबरवासाचं, त्याचा हरपून गेलाय सूर
कांदा-िलबू, मिरची-कोिथबीर, खुडता येत नाही आलं,
मातीमधलं पिवळं सोनं, काळंठिक्कार झालं.
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड

- संजय कृष्णाजी पाटील

बाळासाहेब तुम्ही सुद्धा !!

सध्या राजकारणात आपली भूमिका बदलणे म्हणजे रोज कपडे बदलण्यासारखेच असते ! त्याचा आपल्याला गेल्या साठ वर्षाच्या काळात अनेक वेळा अनुभवही आला पण एक वाघ .. होय शिवसेनेचा वाघ माननीय हिंदू हृदय सम्राट यांना आपण ओळखतो ते त्यांच्या रोख ठोक आणि स्पष्ट भूमिकेमुळे , एकदा दिलेला शब्द किंवा केलेले विधान त्याच बाणेदारपणे रोखठोक पणे सांगणारा नेता म्हणून त्यांची ओळख, ९२ साली बाबरी पडली त्यावेळी सगळ्याच नेत्यांनी एका रात्रीत कशी कोलांटउडी खाल्ली हे आपल्या सर्वांना ठावूकच आहे पण सबंध भारत देशात हा एकमेव ढाण्या वाघ गरजला, " बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे !" त्यांच्या या विधानावर बराच गोंधळ हि झाला पण त्यांनी त्यावेळी त्या रोखठोक पणे भूमिका घेतली त्याची आठवण आज हि तमाम हिंदू वर्गाला आहे आणि म्हणूनच ते आज हि हिंदू ह्रदय सम्राट म्हणून ओळखले जातात.

पण सध्या रोजच आपली भूमिका बदलणाऱ्या रोगाची लागण शिवसेनेलाही झालेली दिसतेय, त्याचे कारण म्हणजे सध्या चाललेली शिवशक्ती - भीमशक्ती नावाची नवीन राजकीय खेळी.

काल परवाच्या वर्तमानपत्रात वाचले कि बाळासाहेब म्हणाले कि " मी कधीच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास विरोध केला नव्हता".. आणि थोडा विचारात पडलो, १९९४ च्या वेळी १५-२० वर्ष भिजत पडलेला नामांतराच प्रश्न आला तेव्हा मराठवाड्यात जातीय तणाव पसरला, जाळपोळ झाली, दंगे झाले कारण काय तर मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे हि बर्याच वर्ष पासूनची मागणी मान्य झाली आणि मराठवाड्यातील वातावरण तापले. त्यावेळी शिवसेनेची म्हणजेच बाळासाहेबांची भूमिका नामांतर विरोधी होती, २१ मे १९९४ रोजी परभणी येथील दत्तधाम मैदानावरील सभेमध्ये हा वाघ पुन्हा एकदा गरजला, "
आपण जीवनाच्या अखेरपर्यंत विद्यापीठ नामांतराला विरोध करीत राहू. लादलेले नामांतर कुणालाही मान्य नाही. काँग्रेसच्या मंत्र्यांना मराठवाडय़ात फिरू देऊ नका. काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाडय़ा अडवा’ असे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या सभेत केले होते. ‘नामांतराला तुमचा विरोध आहे का’ असे सभेतील नागरिकांना शिवसेनाप्रमुखांनी विचारले. हजारो नागरिकांनी हात वर करून त्यांच्या प्रश्नाला हात उंचावून होकारार्थी उत्तर दिले. ‘१९९५ मध्ये आपण नामांतरचा प्रश्न निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने सोडवून दाखवू’ असे उद्गारही शिवसेनाप्रमुखांनी या सभेत काढले होते.
‘विद्यापीठ गेट म्हणजे दलितांना वाटते ही चैत्यभूमी आहे. म्हणून गेटला नमस्कार करताहेत. अरे यांना भाकरीचे पीठ खायला मिळत नाही आणि विद्यापीठासाठी लढताहेत. घाला अशांना जात्यात आणि रगडा. पण हे पीठ कोणी खाणार नाही’ असेही बाळासाहेब ठाकरे हे या सभेत बोलले होते.

१४ जानेवारी १९९४ ला तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा केला. या घोषणेनंतर मराठवाडय़ात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि जातीव तणाव निर्माण झाला होता. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या निषेधार्थ शिवसेनेने दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ जानेवारीला मराठवाडा बंद पुकारला होता.
२१ जानेवारी १९९४ ला म्हणजे नामविस्ताराच्या घोषणेनंतर सातव्या दिवशी शिवसेनेने महाराष्ट्र बंद पुकारले होते. ते नामांतर विरोधासाठीच. मुंबई आणि मराठवाडय़ामध्ये या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला होता. अन्य महाराष्ट्रात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद गेले तरी चालेल पण बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला देणारच अशी कणखर भूमिका घेतली आणि नेहमी प्रमाणे अतिशय हुशारीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करून हा प्रश्न अत्यंत खुबीने मिटवला, समाजातील तेढ संपली आणि विद्यापीठाचा गौरव हि झाला.

पण आता काळ बदलला, राजकीय समीकरणेही बदलली. सध्या दलितांचे नेते (?) म्हणवणारे रामदास आठवले यांच्याशी जवळीक साधण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, तसे कारणही स्पष्ट आहे कारण गेली १५ वर्षे महाराष्ट्राच्या सत्तेपासून दूर असलेली शिवसेना आणि मनसे च्या धसक्याने ग्रस्त असणारी शिवसेना येणारी मुंबई महापालिका निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायच्या पूर्व तयारीत आहे. त्या साठी परत एकदा शिवशक्ती-भीमशक्ती चा प्रयोग.
राजकारणात असले प्रयोग काही नवीन नाहीयेत आणि आपले कार्यकारी प्रमुख असे एक नाही अनेक प्रयोग येणाऱ्या काळात करतीलही ( जस मध्यंतरी सेना - राष्ट्रवादी चर्चा ) त्यावर चर्चा हि होतील पण नवल वाटते ते बाळासाहेबांचे.

अख्या राजकीय जीवनात ह्या माणसाने आपली भूमिका कधी हि बदलली नाही मग आत्ताच का ? कॉंग्रेस, राष्ट्रवादी असो किंवा भाजप यांच्या कडून आम्हाला जास्त अपेक्ष हि नाहीयेत कारण या पक्षांनी अनेक प्रश्नांवर कधी स्पष्ट भूमिकाच घेतली नाही उलट प्रत्येक प्रश्नाचे राजकारण कसे करायचे त्यात हे सर्वच पक्ष अग्रेसर, परंतु मराठी माणसाच्या रक्तातून उभी राहिलेली संघटना म्हणजे शिवसेना त्यांनी वेळीच याइतर राजकीय पक्षांपासून लागलेल्या साथीच्या रोगातून मुक्त होण्याची गरज आहे कारण आज मतदार काही झोपलेला नाही, प. बंगाल मध्ये 35 वर्षे निर्विवाद सत्ता गाजवणार्या डाव्यांना त्यांची जागा दाखवणारा आजचा मतदार आहे, त्यामुळे असल्या बरबटलेल्या राजकीय खेळ्या खेळण्यापेक्षा मतदारांना एक विकासाचा विश्वास द्या, जातीचा मुद्दा कधी सेनेचा नव्हता तो कधी होऊ पण नये, जातीच्या नावावर मतांची भिक मागणार्यांच्या रांगेत शिवसेना शोभून दिसणार नाही एवढेच सांगू इच्छितो !

अगदी त्याच आदराने ..जय महाराष्ट्र !
अमोल सुरोशे(एक मराठी माणूस)

Sunday, May 15, 2011

"राजमाता जिजाऊ" चित्रपट १९ मे ला प्रदर्शित



महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब.त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.

स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जीवनावर एक चित्रपट येत आहे "राजमाता जिजाऊ". महाराष्ट्रातील प्रत्येक घरात मॉं जिजाऊ यांचे विचार, संस्कार रुजायला पाहिजेत नव्हे ती आजच्या काळाची गरजच आहे म्हणूनच जिजाऊ.कॉम आपणा सर्व मराठी जनतेला आवाहन करते आहे कि कृपया हा चित्रपट थेटर मध्ये सहकुटुंब जाऊन बघावा.

ऐतिहासिक विषयावरील भव्य अशा या कलाकृतीस जिजाऊ.कॉम तर्फे हार्दिक शुभेच्छा !

जय जिजाऊ .. जय शिवराय

www.jijau.com

Saturday, May 14, 2011

छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा !


युगपुरुष छत्रपती शिवराय, कल्याण च्या सुभेदाराची सून मातेच्या सन्मानाने परत पाठवणाऱ्या चारित्र्यवान पित्याचा पुत्र म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे ! ज्या संस्काराच्या कुशीमध्ये शिवबा घडले त्याच जिजाऊ यांच्या संस्काराच्या कुशीमध्ये वाढलेले शंभू बाळ यांची आज १४ मे रोजी जयंती !

महाराष्ट्रातील नव्हे तर तमाम भारतीय तरुणांसाठी आदर्श असणारा हा सिंहाचा छावा म्हणजे एक जिवंत वादळ ! अवघ्या आयुष्यामध्ये ज्या माणसाच्या वाट्याला डोंगर एवढी संकटे आली, जो माणूस या संकटांना अगदी कणखर पणे सामोरा गेला, प्रसंगी सह्याद्री सारखा कणखरपणा तर कधी कवी मनाचे तरल असे शिव पुत्र शंभू राजे.

वयाच्या ३२ व्या वर्षी ज्याने स्वाभिमानाने स्वराज्यासाठी बलिदान स्वीकारले पण महाराजांचा - महाराष्ट्राचा स्वाभिमान कधी हि कमी होऊ दिला नाही, अतिशय ताठ मानेने , तोच बाणेदार पण तीच करारी नजर आणि हसत मुखाने ते मृत्यूला सामोरे गेले आणि पुढे हे स्वराज्य टिकले.

नऊ वर्षे ज्या माणसाने तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळासारखा सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला, जंजिर्याच्या सिद्धी जौहर पासून ते गोवाच्या पोर्तुगीजांपर्यंत , मुगल - आदिलशाही असो व कुतुबशाही या सर्वांन्शी निकराने लढाई देणारा, या सर्वांवर आपली कायम जरब ठेवणारा स्वराज्याचा तरुण छत्रपती म्हणजे खरा खुरा स्वराज्य संरक्षक.

याच स्वराज्याच्या छत्रपतीने एक ऐतिहासिक पाऊल उचलले, महाराणी येसूबाई यांना त्या काळी एक महत्वाचे स्थान दिले, "श्री सखी राज्ञी जयति - महाराणी येसू बाई" हि राज मुद्रा त्यांच्या हाती सोपवली आणि स्वराज्याचा कारभार हाती दिला , स्त्रियांचा आदर करणारे आणि त्यांना स्वराज्याच्या एवढ्या मोठ्या स्थानावर बसवणारे हे छत्रपती !

याच छत्रपतींच्या बदनामीचा कट केला गेला, अवघ आयुष्य जो माणूस केवळ आणि केवळ लढला त्याला त्याच्या बलिदाना नन्तर सुद्धा या कट कारस्थानांशी लढाव लागतंय हे एक शोकांतिकाच !

वयाच्या चौदाव्या वर्षी या माणसाने संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, असे एक नाही तर सात ग्रंथ लिहिले, कवी मनाचे, प्रचंड भाषा समृद्ध असणारे, मराठ्यांचा मुकुटमणी आमच्या पर्यंत कधी पोहोचू दिलाच नाही , मुद्दाम संशयाचे वातावरण निर्माण करणारा इतिहास जाणीवपूर्वक लिहिला गेला आणि त्याचे पुढे उदात्तीकरण देखील करण्यात आले , पण सत्य हे सूर्यासारखे, किती काळ झाकून ठेवणार.. आज न उद्या हे सत्य समोर येणारच नव्हे ते आले हि आहे . म्हणूनच साडे तीनशे वर्षे झाली तरी हि शंभू राजे हे तमाम युवकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवतात, ज्यांच्या इतिहासाची पणे उलातांना आमच्या अंगावर काटा उभा राहतो, ज्यांच्या केवळ नामघोषाने आमची छाती भरून येते आणि मान ताठ होते.

सिंहाचा छावा, स्वराज्य संस्थापक शिवरायांचा सुपुत्र ज्याने स्वराज्य नुसते राखलेच नाही तर ते चौपटीने वाढवले त्या स्वराज्य सरंक्षक छत्रपती संभाजी राजांना आमचा मानाचा मुजरा !

तमाम मराठी युवकांना छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा !

कार्यकर्ते जिजाऊ.कॉम

Wednesday, May 4, 2011

शरद पवारांचे महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न

शेती, पाणी, वीज, उद्योग, शिक्षण या क्षेत्रांत महाराष्ट्राने आजवर आधुनिकतेचीच कास धरली आहे. मात्र, बदलत्या काळाची पावलं ओळखून त्यातही काळानुरूप नवे बदल स्वीकारणं आणि संकुचित अस्मितावादाचा त्याग करून आपली सहिष्णु वृत्ती टिकवणं, ही यापुढची निकड आहे.
आज महाराष्ट्र राज्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. अर्धशतकाची वाटचाल ही कुठल्याही राज्याच्या व समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. मी त्याकडे दोन दृष्टींनी बघतो. गेल्या पन्नास वर्षांत आपण किती मजल गाठली, आणि पुढच्या पन्नास वर्षांत आपल्या काय अपेक्षा आहेत! हा विचार करताना पुढील पन्नास वर्षांच्या नियोजनाचा कार्यक्रम आखणे योग्य नसते. त्याऐवजी दहा-दहा वर्षांंचा टप्पा कसा गाठायचा, आणि त्यात कुठल्या गोष्टींना महत्त्व देऊन कोणत्या दिशेने प्रवास सुरू ठेवायचा, याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी महाराष्ट्राची बलस्थाने आणि दुर्बल स्थाने काय आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.
१९६० साली महाराष्ट्र राज्य झाले तेव्हा लोकसंख्या साडेतीन-चार कोटी होती. आज ती दहा-साडेदहा कोटी आहे. येत्या दहा वर्षांत ती सुमारे १४-१५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आपण लोकसंख्येचा विचार करतो तेव्हा समाजाचा चेहरामोहरा (प्रोफाइल) बदलतो काय, तेही बघावे लागेल. महाराष्ट्राने कोणत्या क्षेत्रांत आपला ठसा उमटवला, आणि मराठी माणसाची दृष्टी व व्याप्ती कुठवर जाऊन पोहचली, याचा मागोवा घ्यावा लागेल. त्या अनुषंगाने पुढील मार्ग (रोडमॅप) कशा पद्धतीने असायला हवा, याचा विचार होण्याची गरज आहे. १९९१ ते २००१ मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या वाढली त्यातील २० टक्के वाढ ही अन्य राज्यांतून आलेल्या स्थलांतरितांची आहे. महाराष्ट्रात ८०-९० पर्यंत दक्षिणेतून लोक यायचे. त्यावेळी शिवसेनेचा जन्म झाला. आज मुख्यत: उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा व राजस्थान या राज्यांतून आपल्याकडे लोक येतात. हे का होते, याला दोन कारणे आहेत. एक- ज्या राज्यांतून लोक येथे येतात त्या राज्यापेक्षा अधिक संधी महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. आज जे लोक येथे येत आहेत त्यांना काही विशिष्ट क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे ते येत आहेत. कारण स्थानिक मराठी माणूस अशा क्षेत्रांमध्ये काम करण्यास तयार नाही. नागपुरातील पोलाद कारखाने वा जालना- औरंगाबाद पट्टय़ातले फौंड्रीचे कारखाने बघितले तर तिथे काम करणारे जास्तीत जास्त ओरिसातील आहेत. तापलेल्या भट्टीपाशी कष्टाचे काम करण्याची ओरिसाच्या मजुराची तयारी असते, मराठी माणसाची नसते. सुतारकाम करणारा वर्ग राजस्थानातील आहे. फलोत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. नाशिकमध्ये फळबागा खूप आहेत, पण फळांची विक्री करणारा वर्ग उत्तर भारतीय आहे. कारण हे काम करण्यास आपले लोक तयार नसतात. यंदा आणखी एक चित्र बघायला मिळते आहे. ऊसतोडणी आणि तो भरून आणण्याचं काम अत्यंत कष्टाचे असते. बीड, नगर भागातील मजूर हे काम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही करत. पण तिथली नवी पिढी शिक्षित झाल्यामुळे त्यांना या कामांत आता स्वारस्य राहिलेले नाही. त्यांची जागा मध्य प्रदेशातील लोकांनी घ्यायला सुरुवात केली आहे. अशा कष्टाच्या कामांसाठी लागणारा कामगारवर्ग महाराष्ट्राची गरज म्हणून येथे येत आहे. मध्यंतरी एका राजकीय पक्षाने उत्तर भारतीयांच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर एका महिन्याने मी काही ठिकाणी जाताना रस्त्यावर बघितले की ठिकठिकाणी छोटे कारखाने, वर्कशॉपस्नी बाहेर बोर्ड लावले होते- ‘भरती सुरू आहे!’ काही ठिकाणी थांबून मी विचारले, ‘भरती चालू आहे म्हणजे काय?’ ‘आमच्याकडे यूपी-बिहारचे लोक होते. आंदोलनामुळे ते घाबरून पळून गेले. हे काम करायला येथे कोणी येत नाही. त्यामुळे आमच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे,’ असे उत्तर ऐकायला मिळाले.
अशा अनेक कारणांमुळे आपल्या लोकसंख्येचा चेहरामोहरा बदलतो आहे. २००१ मध्ये महाराष्ट्रात ४६ टक्के लोकसंख्या १५ ते ४० वयोगटातील होती. एका बाजूला हा वर्ग वाढताना दिसतो. दुसऱ्या बाजूला साठी किंवा त्यापुढचा आम्हा लोकांचा वयोगट आहे. त्यांची लोकसंखा आता १२ टक्क्यांच्या पुढे गेली आहे. ज्येष्ठ नागरिकांचा हा एक नवीन वर्ग तयार झालेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. पूर्वी ५८ व्या वर्षी लोक निवृत्त व्हायचे. मला आठवते, आमच्या शाळेत ५८ वर्षे झाले की निरोप समारंभ व्हायचे, त्यावेळी भा. रा. तांबे यांच्या ‘ढळला रे ढळला दिन सखया’ यासारख्या कवितांची आठवण यायची. आज तसे दिसत नाही. मीच ७१ वर्षांंचा आहे. आज सहजपणाने सत्तरीनंतर काम करणारे लोक मोठय़ा प्रमाणावर दिसतात. १५ ते ४० व ५५-६० च्या पुढचा वयोगट महाराष्ट्राच्या बदलत्या चेहऱ्यामोहऱ्यात दिसतो आहे. एकीकडे जन्मदर कमी होतो आहे आणि आयुर्मान वाढते आहे. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रात ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या त्याचे हे परिणाम आहेत. अशा परिस्थितीत उपलब्ध लोकसंख्येचे मनुष्यशक्तीमध्ये आणि शक्तीमधून समाजाच्या संपत्तीमध्ये रूपांतर कसे होईल, हे पाहायला हवे.
त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे- शिक्षण. आज महाराष्ट्रात ७८ टक्क्यांच्या आसपास साक्षरता आहे. त्यांच्यात गुणवत्तावाढ केली पाहिजे. शिक्षितांमध्ये गुणवत्ता वाढवून ही नवी शिक्षित पिढी समाजाची संपत्ती बनवायला हवी. त्यांचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रांत करून घेता येईल. खेडय़ांमधून शहरांकडे येण्याची प्रवृत्ती वाढते आहे. या नागरीकरण होत असलेल्या नव्या सुविद्य पिढीला नवे मार्ग उपलब्ध करून द्यावे लागतील. त्यातला सर्वात महत्त्वाचा मार्ग- उद्योग. महाराष्ट्रात उद्योगाचे चित्र बदलते आहे. एकेकाळी मुंबईच्या गिरणगावात तीन लाख गिरणी कामगार होते. १४० गिरण्या होत्या. आज दहा-बाराच गिरण्या आहेत. ठाणे व आसपास तसेच मुंबईत इंजिनीअरिंग कारखाने होते. आज तेही गेले आहेत. ते गेले म्हणजे त्योचे स्वरूप बदलले आहे. एकेकाळी प्रीमियरची फियाट बनायची व महिंद्रची जीप मुंबईत बनायची. आता ऑटोमोबाइलचे केंद्र मुंबईपासून सरकले आहे. ते िपपरी चिंचवड आणि नाशिक येथे गेले आहे. त्याला लागणारे सुटे भाग कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, औरंगाबाद येथून तिथे येतात. वेगवेगळ्या मोटारी पुण्यात बनायला लागल्या आहेत.  पुणे हे ऑटोमोबाईल केंद्र बनले आहे. तिथून केवळ भारतातच नाही, तर जगभर गाडय़ा जात आहेत. आता हे केंद्र तिथे झाले आहे त्यासाठी आवश्यकता कशाची आहे? त्याला ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनीअर, तसेच आयटीआयचे शिक्षण घेतलेल्यांची गरज आहे.
एका बाजूला हा वर्ग आहे. दुसऱ्या बाजूला आणखी एक नवीन वर्ग तयार होतो आहे, तो म्हणजे आयटी आणि बीटीवाल्यांचा. पुण्या-मुंबईत हजारो तरुण आयटीमध्ये आहेत. आयटी आणि बीटीबरोबरच सेवाक्षेत्रातही त्यांना संधी मिळत आहेत. मुंबई पूर्वी  औद्योगिक तसेच कष्टकऱ्यांची नगरी होती, ती आजही आहेच. पण तिथल्या कष्टांचे स्वरूप बदलले आहे. आता सेवाक्षेत्रात अर्थ, विमा, आरोग्य ही नवी क्षेत्रे निर्माण झाली आहेत. ही सर्व क्षेत्रे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये वाढत आहेत. या क्षेत्रांची गरज भागविण्यासाठी लागणारी ज्ञानी पिढी तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर आहे. सुदैवाने महाराष्ट्रात खासगी, सरकारी इंजिनीअरिंग महाविद्यालये, तसंच तंत्रशिक्षण संस्थांचे चांगले जाळे निर्माण झालेले आहे. वसंतदादांनी व्यावसायिक शिक्षणाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला त्यावेळी त्यावर लोकांची टीका झाली. परंतु वसंतदादा किती दूरदृष्टीचे होते, हे आता दिसून येत आहे. आज ऑटोमोबाइल, आयटीसारख्या क्षेत्रांमध्ये जी मराठी मुले दिसतात ती केवळ महाराष्ट्रापुरती नाहीत. ती थेट न्यू जर्सीपासून जगातील अनेक देशांमध्ये दिसतात. त्याचे कारण यासंबंधीचे ज्ञान घेण्याची संधी मध्यम व निम्न मध्यमवर्गातील मुलांना स्थानिक पातळीवर मिळाली. त्यामुळे नव्या पिढीच्या माध्यमातून एक लोकसंपत्ती तयार झाली. त्याचा उपयोग महाराष्ट्राला होतो आहे. ही सर्व क्षेत्रे वाढवावी लागतील. त्यासाठी आता नुसता शिक्षणाचा विस्तार करून भागणार नाही, तर त्यात गुणवत्ता वाढवावी लागेल. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती असलेली, आत्मविश्वासाने भरलेली नवी पिढी महाराष्ट्रात तयार करावी लागेल. पुढच्या दहा वर्षांत यावर भर द्यावा लागेल.
 एकेकाळी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण की गुणवत्ता, यावरून संघर्ष झाला होता. मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना त्यांनी गुणवत्तावाढीचा कार्यक्रम हाती घेतला होता, तेव्हा त्याला फार विरोध झाला होता. गुणवत्तेच्या नावाखाली शिक्षणाच्या विस्ताराच्या प्रक्रियेतून सामान्य कुटुंबांतील मुलांना बाजूला काढत असल्याचा आरोप झाला होता. आज शिक्षणाचा विस्तार होत आहे. विस्ताराला गुणवत्तेची जोड दिली तर जी नवी क्षेत्रे आपल्याला उपलब्ध होत आहेत त्यांचा लाभ घेता येईल. 
हे करीत असताना आणखी एका क्षेत्राचा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात ५८ ते ६० टक्के लोक अजूनही शेतीवर अवलंबून आहेत. महाराष्ट्रातील शेती हा चिंतेचा विषय आहे. याचे महत्त्वाचे कारण- देशात शेतीला ४० टक्के पाणी उपलब्ध आहे, तर महाराष्ट्रात शेतीला फक्त १६ टक्केच पाणी उपलब्ध आहे. निसर्गावर अवलंबून राहणे हे महाराष्ट्राच्या शेतीचे दुखणे आहे. दुसरे कारण- दिवसेंदिवस शेतीचे प्रमाण कमी होत आहे. ज्यांची शेती पाच एकराच्या आत आहे असे ८२ टक्के शेतकरी आहेत. त्यापैकी ६० टक्क्यांना पाणीच मिळत नाही. जिथे पाणी नाही आणि जिराईत शेती आहे, तिथे ती आतबट्टय़ाचीच होणार. पाचजणांचे कुटुंब पाच एकराची जिराईत शेती चालवू शकत नाही. आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या गोष्टी ऐकायला मिळतात. याला पर्याय काय? या कुटुंबातील किमान एक मुलगा तरी शिक्षित होऊन ही जी नोकरीची नवी क्षेत्रे निर्माण होत आहेत, तिथे गेला पाहिजे. शेतीवरील दडपण कमी करण्याची आवश्यकता आहे. ६० टक्के लोकसंख्या अजूनही शेतीवर अवलंबून आहे. नवी मुंबई, िपपरी चिंचवड, औरंगाबादला सिडको नगर झाले. नागपूरचा विस्तार होत आहे. त्यासाठी शेतीची जमीन गेली. शेतीचे क्षेत्र कमी व्हायला लागले. परिणामी त्यावर अवलंबून असलेल्यांची संख्या वाढायला लागली. शेती हा आतबट्टय़ाचा व्यवहार होऊ लागली. त्यावरील दडपण कमी करणे ही महाराष्ट्राची गरज आहे. यावर पर्याय म्हणजे उद्योग व सेवाक्षेत्रांशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि त्याला सामोरे जाण्यासाठी शिक्षित नवी पिढी महाराष्ट्रात तयार करण्यात आपण जेवढे यशस्वी ठरू, तेवढे राज्य पुढे जाणार आहे.
अर्थात त्यात काही अडचणी आहेत. सर्वात मोठी अडचण आहे विजेची. आज महाराष्ट्रात भारनियमन हा परवलीचा शब्द झाला आहे. मी स्वतची बढाई म्हणून सांगतो आहे असे नाही. पण मी राज्याचा प्रमुख असेपर्यंत आम्ही दरवर्षी ठरावीक वीज तयार करायचोच. तिची आवश्यकता असो वा नसो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतानाच्या राज्याची गरज भागवून गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशला आम्ही वीज पुरवायचो. आज आम्ही बाहेरून वीज विकत घेतो. वीज हे प्रगतीचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वीज वाढवावीच लागेल. वीज वाढवून कारखानदारी, नागरीकरण वाढवावे लागेल. याप्रकारे शेतीवरचे दडपण कमी करावेच लागेल.
दुसरीकडे अधिकाधिक पाण्यासाठी गुंतवणूक करायला हवी. पाण्याची उपयुक्तता वाढवून शेती संपन्न केली पाहिजे. शेतीतही कशावर भर द्यायचा, हेही ठरवले पाहिजे. पंजाब, हरयाणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा ही राज्ये गहू, तांदूळ मोठय़ा प्रमाणावर पिकवतात. आपल्याकडे तांदूळ, गहू होतो. पण आपले राज्य शेतीतही अनुकूल आहे ते फळबागायतीसाठी. कोकणातील हापूस आंबा, मध्य व दक्षिण महाराष्ट्रातील द्राक्षे, तसेच नागपूरच्या संत्र्यांमध्ये सुधारणा करून ती आपण जगभर पाठवू शकतो. खानदेश व मराठवाडय़ातील काही भागात उत्तम केळी होतात. राज्यातील पीक पद्धतीतही बदल होत आहे. अन्नधान्याची व्यवस्था केली पाहिजे, पण त्याचबरोबर फळबागायती, ऊस, कापूस यावरही भर दिला पाहिजे. कारण मर्यादित शेती व मर्यादित पाण्यात काढले जाणारे पीक म्हणजे फळबागायती. जपून पाणी वापरता येते आणि त्यामुळे पर्यावरणालाही मदत होते. या पद्धतीची शेती केली पाहिजे. गेल्या दहा वर्षांत या क्षेत्रात प्राथमिक स्वरूपाचे काम झालेले आहे. नुसते तेवढेच करून भागणार नाही, तर शेतीउत्पादनाचे प्रोसेसिंग, मार्केटिंग कसे होईल, पुढच्या दहा वर्षांत जगाची बाजारपेठ कशी काबीज करता येईल, हीसुद्धा दृष्टी ठेवली पाहिजे. 
आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर नागरीकरण होते आहे. नागरीकरणाची गरज केवळ अन्नधान्यापुरती नाही, भाजीपालाही महत्त्वाचा आहे. मध्यंतरी मुंबई आणि दिल्लीत भाजीपाल्याचे भाव हा मोठा समस्येचा विषय बनला होता. भाजीपाल्याची पूर्तता नागरीकरण झालेल्या भागांच्या आसपासच्या परिसरातूनच कशी होईल, हे पाहायला हवे.त्यासाठी फळे, फुले व भाजीपाला लागवडीवर भर द्यावा लागेल. त्यावर प्रक्रिया करावी लागेल. साठवून ठेवण्याची व पॅकेिजगची व्यवस्था करावी लागेल. त्याकरता त्याचे तंत्र बदलावे लागेल. त्यासाठी आवश्यक असलेला शिक्षित वर्ग हा शेतकऱ्यांच्या कुटुंबातूनच आपण तयार करायला हवा. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होत आहे, त्यातून गुणवत्ता वाढवू शकलो तर नवी पिढी काहीही साध्य करू शकेल. योग्य शिक्षण व ज्ञान दिले तर आपल्याकडे ही क्षमता नक्कीच आहे. नव्या पिढीद्वारे आपण लोकसंपत्ती निर्माण करू शकतो. त्या माध्यमातून उद्याच्या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलता येईल. शेती, उद्योग, सेवाक्षेत्र, आयटी, बीटीसह जी जी क्षेत्रे असतील, त्या क्षेत्रांमध्ये जगभर जाण्याची मानसिकता आपण ठेवली पाहिजे.
मी रोज सकाळी लोकांना दोन तास भेटतो. त्यावेळी किमान दोन तरी मुले अशी असतात, ज्यांना बदली हवी असते. मला दिल्ली फार लांब पडते, येथून बदला. आपल्याकडे दिल्ली तर फार दूर राहिली, राधानगरीच्या मुलाची कोल्हापुरात किंवा सांगलीत बदली झाली तरी तो म्हणतो की, मला गावी परत जायचे आहे. आपण जगात कुठेही गेलं पाहिजे, ही भावनाच आपल्याकडे नाही. आज आपली जी मुले न्यू जर्सीसह जगभर इतरत्र गेली, त्यांचे जीवनमान सुधारले, ते श्रीमंत झाले. याचे कारण ते कुठेतरी गेले. मराठी समाजाची ही स्थितीवादी मानसिकता बदलायला हवी. उद्याचा महाराष्ट्र या पद्धतीने घडवावा लागेल. स्वभाव बदलला पाहिजे. शिक्षणासंबंधीचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. रोजंदारी कामाच्या पद्धती बदलल्या पाहिजेत. रोजगाराच्या नव्या संधी कोणत्या आहेत, ते पाहून पुढे गेले पाहिजे.
हे सारे करत असताना याला जोडमूनच स्त्रिया आणि मुलींमध्येही आत्मविश्वास निर्माण करून त्यांचेही सबलीकरण करण्याची अत्यंत गरज आहे. येथून पुढे फक्त पुरुषांनी काम करण्याचे दिवस संपले आहेत. नवरा-बायको दोघांनाही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. सुदैवाने महाराष्ट्रात मुलींना शिक्षणाची संधी मिळवून देण्यात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांच्यापासून अनेकांनी योगदान दिले आणि त्याचे हे दृश्य फलित आहे. परंतु आणखी विस्तारित स्वरूपात हे कार्य व्हायला हवे.
मला खरी चिंता वाटते ती- महाराष्ट्राचे प्रादेशिक ऐक्य कसे टिकून राहील, याची. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळातील सदस्यांची भाषणे मी कधी कधी ऐकतो, वर्तमानपत्रांतून वाचतो. त्यांना कमालीचा प्रादेशिक रंग याऊ लागला आहे. पक्षभेद सोडून सर्वजण त्यासाठी एकत्र येतात. नाशिकच्या कांद्याचा प्रश्न आला की तिथले सर्व लोकप्रतिनिधी अध्यक्षांसमोर येऊन बसतील, कापसाचा प्रश्न आला की विदर्भातील येऊन बसतील, ऊसाचा प्रश्न आला की पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी येतील. याचा अर्थ राज्य म्हणून विचार करण्याऐवजी प्रदेश म्हणून विचार करण्याची भावना वाढीस लागली आहे. त्यातून राज्याच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये कटुता वाढायला लागली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. सामाजिक व प्रादेशिक ऐक्य तसेच प्रादेशिक समतोल या गोष्टींत आपल्याला बारकाईने लक्ष घालावे लागणार आहे. पुढील काळात महाराष्ट्रात प्रादेशिक असमतोल निर्माण होऊ नये, यादृष्टीने पावले टाकावी लागतील. समाजाचे आणि विविध भागांचे ऐक्य कसे वाढीस लागेल, यासाठी प्राधान्य द्यावे लागेल. कारण समाज एकसंध नसला तर विकासाच्या कितीही योजना तुम्ही तयार करा, राज्यात स्थैर्य नसेल तर अनेक अडचणी निर्माण होतात. याकरता प्रादेशिक, विभागीय आणि जातपात-धर्मासह सामाजिक ऐक्य राखणे गरजेचे आहे.
गंमत म्हणून सांगतो. मागच्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा मी महाराष्ट्राचा दौरा केला तेव्हा माझ्या दौऱ्याची पद्धत बदलली होती. जाहीर सभा घेऊन झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही वेगळी बैठक घ्यायचो. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, पुणे, िपपरी-चिंचवडमध्ये अन्यभाषिकांच्या सभा मी घेत असे. नाशिकसारख्या ठिकाणीही दोन-तीन हजार अन्यभाषिक सभेला आले होते. असा महाराष्ट्राचा चेहरा बदलला आहे. समाजाचा स्तर बदलला आहे. आपल्याला या सर्वांची गरज आहे. त्यामुळे प्रादेशिक राग ठेवून चालणार नाही. त्यांना घालवूनही चालणार नाही. या सर्वांना बरोबर घेऊन जावे लागेल. हे करायचे असेल तर अन्य जाती-जमाती, धर्मीय आणि भाषिकांकडे थोडय़ा मोठय़ा मनाने बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राने ठेवला पाहिजे. महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे लोक कुठल्याही राजकीय पक्षाचे असोत, त्यांनी विभागीय, प्रादेशिक तसेच सामाजिक आणि भाषिक ऐक्य महाराष्ट्रात जपले पाहिजे, वाढवले पाहिजे. हे जर येत्या दहा वर्षांत आपण करू शकलो तर माझी खात्री आहे की, देशात अनेक बाबतीत महाराष्ट्र इतरांच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही.
मी राज्याचा प्रमुख असेतो आमची आणि गुजरातची स्पर्धा असे. पण आमचे संबंध फार चांगले असायचे. एखादा मोठा प्रकल्प गुजरातमध्ये उभारणे शक्य नसेल तर गुजरातचे मुख्यमंत्री तो आमच्याकडे पाठवायचे. गुजरातच्या दृष्टीने काही चांगले असेल असे वाटले तर आम्ही ते गुजरातकडे पाठवायचो. आज आपल्याला आजूबाजूच्या राज्यांचा विकासाच्या वेगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्रही विकास व औद्योगिकीकरणात पुढे गेला पाहिजे. समाजाच्या गरजा, आरोग्य, क्रीडा, शिक्षण, पर्यावरण यांच्याविषयी लोकांमध्ये जाणीवजागृती करून या गरजा भागविण्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. ग्रामीण व शहरी असे दोन थर निर्माण होत आहेत, असे चित्र निर्माण होता नये. त्यांचे मूलभूत प्रश्न सहजपणे तिथेच सोडविण्याची साधने निर्माण केली पाहिजेत. गुणवत्तावाढीबरोबरच सामाजिक व प्रादेशिक ऐक्य वाढले तर हे राज्य देशाला बळ देईल, अशी माझी खात्री आहे. आपण तर मोठे होऊच; पण भारताला मोठे करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी हातभार लावला, असा इतिहास निर्माण करण्याची गरज आहे.
पुढची दहा वर्षे आपण विकासाचा रोडमॅप तयार करून त्यादृष्टीने आखणी केली तर आपल्या महाराष्ट्राएवढे युरोपातले जे छोटे छोटे विकसित देश आहेत, त्यांच्या पंक्तीत विकासाच्या बाबतीत आपण जाऊन बसू शकू, एवढी क्षमता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या माणसांमध्ये निश्चितच आहे.          
                                                                                                                 --शरद पवार    
                                          




सौजन्य: लोकसत्ता

Sunday, May 1, 2011

बदलत्या महाराष्ट्राचा दिन




आजचा दिवस म्हणजे आनंदाचा दिनू, पण कितीक वर्षे हा दिन आनंदाचाच राहील हे माहित नाही. ज्या गतीने आपण प्रगती ( अधोगती हा शब्द बारा राहील का ......?) करत आहोत आणि ज्या गतीने ह्या प्रगतीला बाधक अशी कृत्ये करत आहोत,  यावरून या गतीच्या गणितात महाराष्ट्राला निगेटीव्हच उत्तर सध्या तरी मिळेल असे वाटत आहे.  जग ज्या गतीने विकसित होतेय, ज्या गतीने पारदर्शी होतेय, ज्या गतीने एकत्र होतेय त्याच गतीने महाराष्ट्र, मागे जात आहे, त्याच गतीने इकडे भ्रष्ट्राचार होत आहे आणि त्याच गतीने आम्ही महाराष्ट्र - मराठा, ब्राम्हण, माळी, कोळी .....  असा जातीत विभागात आहोत. हे सिद्ध करायला काही आकडेवारी ही आहे, पण त्याच पेक्षा महत्वाची जिवंत लोकांची असहनीय अशी आयुष्य आणि अनुभव आहेत.
गेल्या कितेक वर्षां पासून तीच ध्येये आणि तीच धोरणे आहेत. पण अजून ही त्यांच्या पासून आपण खूप दूर आहोत असेच  वाटते. बदल होत नाही अस नाही, पण गती काय आणि दिशा काय याला ही खूप महत्व आहे. आपल्याला फक्त साधन लोक निर्माण करायचेत की, ती सधनता टिकवणारे, वाढवणारे आणि गोर गरीबांपर्यंत त्या सधनतेचे फळ नेणारे निर्माण करायचेत हा एक मोठा प्रश्न. तस याच उत्तर आहे आपल्याकडे. पण योग्य त्या उत्तरला मूर्त स्वरूप देणे अवघड असल्याने,  सोप्पे उत्तर आपण स्वीकारत आहोत. आणि सोप्या उत्तराने आपल्या सत्तेत असणाऱ्यांना जाच ही नाही  आणि फायदा सुद्धा आहे. कारण निवडणुका जिंकायला बहुमत लागते,  मग त्या बहुमताल एकदा सधन केल  किंवा साधन केला जातंय अशी समजूत करवून दिली की झालं! आलेच दुसरे कुणी बहुमता विरोधात उभे राहायल तर त्यांना ही क्षणिक सधनता दिली की ते ही बहुमतात. मग अवघड उत्तराकडे जायचेच  कशाला.
झालाच छळ गोर गरीबांचा तर होऊ देत की; त्यांना छळ काय आणि साध आयुष्य काय यात फरकच माहित नाही. म्हणून चालाय सगळ सोयीस्कर. असो .
पण आता जास्त काळ हा सामान्य माणूस झोपेत राहणार नाही. इतकी वर्ष, अरे आपण एका जातीचे..... मलाच मत द्या, अरे शिवाजी महाराज की जय .... मलाच मत द्या, अरे त्यांच्या पासून भारतला वाचवायचे असेल तर..... मलाच मत द्या, आपल्यावर भूतकाळात अत्यचार झाला आहे म्हणून...... मलाच मत द्या. हे हे सगळे दिवस लवकरच जातील. तरुण वर्गाला शिवाजी महाराज तर  अजूनच  जवळचे वाटत आहेत, पण आता  त्यांना शिवाजी समजून घ्याला इतर कुणाची गरज भासत नाही, कुणी ही 'शिवाजी महाराज की...' म्हंटला की 'जय...' म्हणतील ही, पण चुकीच्या मार्गाला जाणर नाहीत. कुणीही उमेदवार फक्त जातीचा आहे म्हणून मतदान करणार नाही. होय आम्हाला इतिहास माहित आहे, पण भविष्यासाठी आम्हाला पुन्हा नवा इतिहास राचायचाय ह्या इर्षेने तरुण उभा राहत आहे. दिसत नसतील हे तरुण सगळीकडेच, पण एकदिवस प्रत्येक तरुणात हाच तरुण दिसल्यावर आश्चर्य करू नये. महाराष्ट्राकडे इतर काही असो की नसो, पण विचारवंतांचे विचार आहेत, त्यांची चरित्र आहेत तेच काफी. हळूहळू त्या सगळ्या चरित्रातील  आणि तरुणातील दलाल निघून गेले की संपन्न आणि उज्ज्वल महाराष्ट्र नव्याने उभा राहायला वेळ लागणार नाही .
  
हे नव्या महाराष्ट्राचा स्वप्न संपन्न होऊ दे हीच जिजाऊ आणि पांडुरंगा चरणी प्रार्थना. 
पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.                  
                                                                                                               जय महाराष्ट्र .

खूप काही बोलायचं, सुचवायचं. पण तेच कधी पासून बोलतोय, सुचवतोय , जमेल तस आम्ही करतोय ही. पण मोठ्ठ काही तरी करण्यासठी प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच योगदान हवय.