Friday, March 11, 2011

छत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण !!!


महाराष्ट्राला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणाऱ्या महापुरुषांपैकी एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जन्मापासून डोंगरासारखी संकटे ज्यांच्या वाट्याला आली, गैरसमजा मुळे म्हणा किंवा इतरांच्या कट-कारस्तानाने ज्यांना आपल्या पित्याचा ही कधी कधी राग ओढवून घ्यावा लागला आणि तरी ही अवघ्या मुघलायीशी एकट्याने युद्ध केले. लढता लढताच मरण स्वीकारले. स्वाभिमान आणि स्वत्वाचा खूप मोठा वारसा संभाजी महाराजांनी आपल्याला दिला आहे. आऊ जिजाऊच्या पदराखाली वाढलेले शंभू बाळ, कवी मनाचे शंभू बाळ पुढे अवघ्या मराठी साम्राज्याच्या रखवाली पायी सह्याद्री सारखे कणखर झाले आणि शेवटच्या श्वासापर्यंत छाव्यासारखे लढले...

स्वराज्याच्या या दुसर्या छत्रपती ला त्यांच्या पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन !!!

या वीर पुरुषाबद्दल अजून इथे वाचा - जिजाऊ.कॉम

कार्यकर्ते जिजाऊ.कॉम

No comments:

Post a Comment