Saturday, November 28, 2009

स्मरण एका क्रांतीसुर्याचे

आज २८ नोव्हेंबर, भारताचे शैक्षणिक क्रांतिसूर्य, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांची ११९ वी पुण्यतिथी.

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती ...
सामान्य माणसांसाठी .. दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले.

याच महात्म्याने रायगडावर शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, त्या समाधीची रीतसर पूजा करून शिव जयंतीची सुरुवात केली. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना "कुळवाडी भूषण" म्हणून संबोधिले . त्यांनी "शेतकऱ्यांचा आसूड " या पुस्तकातून आमच्या बळीराजाचा आवाज उठवला. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा हा खरोखरच जगासाठी एक प्रेरणा आहे. शिक्षणाची गंगा सामान्य अति-सामन्यांच्या पर्यंत पोचवणारा हा भगीरथ .. ज्याने केवळ आणि केवळ सत्याची कास धरून आपल्या या महाराष्ट्राचा वैचारिक, सामाजिक कायापालट केला.

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खर खुरा स्वतंत्र मिळवून देणारा हा महात्मा.

ज्यांचा वैचारिक वारसा घेउन अगदी कणखर पणे आपली वाटचाल करणार्या महाराष्ट्राचा त्यांच्या त्या अफाट कर्तुत्वास कोटी कोटी प्रणाम......


जय हिंद .. जय महाराष्ट्र ....

अमोल सुरोशे

Thursday, November 26, 2009

विचार .. विचार .. आणि फ़क़्त विचार !!!!!


लोकमत च्या मैत्र या पुरवणी मध्ये सदर लेख आलेला .. खरच मनाला भिडला .. ज्या विचारांच्या युद्धातून मी - तुम्ही जातो .. त्याचे उत्तर खूप सध्या आणि सोप्या भाषेत इथे नमूद केले आहे, मला खूप आवडला म्हणून आपणा सर्वांसाठी हा सदर लेख इथे टाकत आहे.
लोकमत आणि मैत्र परिवाराचे आभार ज्यांनी एवढ्या छान शब्दामध्ये विचारांचा चालू असलेला गोंधळ कमी करण्याचे काम केले.

नुसता विचार करत राहिलात, तर तुमच्या प्रश्नांना कुणी रेडीमेड उत्तर देणार नाही. जे मनापासून वाटत , ते करून पाहणे .. ज्या मार्गावर जावस वाटत; त्यावरून चार पावलं चालून पाहन - एवढा तरी जमवा .. कदाचित वाट सापडेल.

जीवन जगतांना खूप काही करण्याची इच्छा तर असते मात्र आपला नेमका काय होत .. आणि आपण नेमका काय करायला हव, हे इथे खूप छान पद्धतीने मांडले आहे ..

काय होत?

. व्यक्तिगत आयुष्यात काय किंवा सामाजिक जीवनात काय निर्णय घेणे कधीच सोपा नसते. पण नुसत्या विचारांचे पोकळ इमले बांधून तरी काय कामाचे.
. सतत खूप विचार करत राहिलो कि आपल्या डोक्यात सारे विषय जिवंत आहेत असा वाटत, पण प्रत्यक्षात त्या विषयानुरूप कामाची काहीच अंमलबजावणी काहीच होत नाही. अनेकदा अति विचार केल्याने त्या विचारांची धार कमी होते आणि मग रस्त्यात अपघात झाला तर काय या भीतीने चालण्याची सुद्धा भीती वाटते.
हेच सामाजिक प्रश्नांच्या संदर्भातही होते.
. आपल्या अवती-भोवती अनेक प्रश्न आहेत. इतके आक्राळ -विक्राळ प्रश्न कि त्यांच्या पुढे आपण कसे टिकणार आणि काय करणार असा हताश प्रश्न पडतो. हतबल वाटत. आकाशच फाटलंय कुठून शिवायला सुरुवात करणार असा प्रश्न पडतो. आपण एकटेच काय करू शकणार असा हि वाटत.
. काही जणांना नेमक माहीतच नसता आपल्या अवती भोवतीचा जग. मग बसल्या जागी सिस्टीम ला शिव्या घातल्या जातात, पण सिस्टीम काही करीतच नाही .. रद्दड सिस्टम बदलायला पअहिजे असा दिन्धोरा पिटला जातो पण त्या सिस्टम शी कधी दोन हात केलेच जात नाही. नुसत्या पोकळ वाचाळ चर्चा.
त्या चर्चेतून वाढतो गोंधळ ..
कुणीतरी आपल्या प्रश्नांची उत्तर द्यावी असा वाटत; पण आशी तयार उत्तरे मिळत नाहीत. दुसर्याने स्वतः साठी शोधलेली उत्तरे आपल्याला लागू पडत नाहीत,आणि उरतात फ़क़्त डोक्यात थैमान घालणारे विचार आणि हताश चिडचिड.

काय करता येईल ?

. विचारांची लड लावणं बंद करा आणि थेट वस्तुस्थितीला भिडा
, आपला मार्ग शोधण्याचा एकाच सोपा मार्ग म्हणजे जे करावा वाटते ते करून पहा ...
. एकदा ते करून पहिला कि आपल्याला कळत कि या कामातल्या नेमक्या अडचणी काय आहेत? ते काम करायला आपल्याला आवडतंय कि नाही ?
. त्यातल्या अडचणी काय नेमके प्रश्न काय?
. त्या अडचणी सोडवून प्रश्नांची तड लावण आपल्याला जमणार आहे का?
. जो पर्यंत प्रत्यक्ष एखादा काम करून पाहत नाहीत तो पर्यंत त्या कामातली गम्मत आणी त्या कामातला त्रास दोन्ही आपल्याला कळत नाही .
. आपल्या जीवनाचा ध्येय शोधायचा असल्यास त्या वाटेवरून एकदा थोडा तरी चालून पाहायला हवा. अनेकदा आपल्याला स्वतःच्याच क्षमतांचा अंदाज नसतो ; त्या मुळे क्षमतांचा कस लाऊन पाहन यासाठीही प्रत्यक्ष कृतीला पर्याय नाही.
. समाजातील प्रश्नांविषयी अशीच पोकळ कळकळ वाटण्यात काही हाशील नाही, तुम्हाला जो प्रश्न सतावतो, त्या प्रश्नाला जाऊन भिडा, त्यातला खाचाखोचा शोधून पहा, माणसांना भेट, त्यांचा जगन अनुभवून नाही तर त्यांच्या सारख जगुन बघा, तर कदाचित खर जग आपल्याला स्वच्छ नजरेने दिसू लागेल.
९। मग हा प्रश्नच उरणार नाही कि मी देशासाठी, समाजासाठी, आपल्या माणसांसाठी काय करू? तुमचा उत्तर तुम्हालाच सापडेल, दुसर्या कोणालाहीविचारायची गरज पडणार नाही, तुम्हालाच तुमचा मार्ग सापडेल आणि तुमच्या जगण्याच आनंददायी समाधानही


साभार : मैत्र परिवार

अमोल सुरोशे

Wednesday, November 25, 2009

पाकिस्तानी मुशर्फला ला एका भारतीयाने दिलेले हे चोख उत्तर (उत्तर कसले... नागवाच करून फटके लावले की! )

उद्या मुंबईवर झालेल्या हल्ल्याला एक वर्ष होतेय. विविधतेने नटलेला हा भारत देश अनेक जाती, धर्म आणि संस्कृतींना एकत्र बांधून आहे. बरेच प्रयत्न झाले आमच्या शांततेला मिटवण्याचे, प्रगतीला वेसन घालण्याचे. पण आम्ही कायम आहोत! आणि असूत!
आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करणारांना अशीच उत्तरे मिळतील. एक खूप छान चित्रफित आहे नक्की बघा.
पाकिस्तानी   मुशर्फला   ला  एका  भारतीयाने दिलेले  हे  चोख  उत्तर (उत्तर कसले... नागवाच करून फटके लावले की! )
 



 
साभार  : मनमौजी

Tuesday, November 24, 2009

जरा याद करो कुर्बानी .....

पुन्हा एकदा 26-11 च्या निमित्त्याने त्या काळरात्रीची दृश्ये डोळ्यासमोर आली, पुन्हा एकदा त्या काळीज चिरून जाणार्या कटू आठवणी ताज्या झाल्या।
26 नोव्हेंबर 2008 च्या त्या काळरात्री दहा पाकड्या अतिरेक्यांनी असा एक धुमाकूळ घातला ज्याचे नाट्य पुढचे ६० तास सबंध जग आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत राहिले।

फ़क़्त १० अतिरेकी आमच्या मायभूमी मध्ये येऊन काय गोंधळ घालू शकतात, हे त्या राक्षसी प्रवृत्तीच्या अतिरेक्यांनी दाखवून दिले. कित्येक निरपराध लोकांचे रक्त सांडून त्यांनी आमच्या छाताडावर पुढचे ६० तास एकच थैमान घातले. ज्या आतंकवादाला एका विशिष्ठ धर्माचे नाव देण्यात आले होते त्या आतंकवाद्यांनी आपल्या गोळ्या झाडतांना समोरच्या कोणालाही त्याचा धर्म विचारला नव्हता, त्यांचे फ़क़्त एकच ध्येय होते ते म्हणजे आम्हा भारतीयांच्या मनामध्ये एक दहशत पसरविणे, हा अतिरेकी हल्ला म्हणजे नेहमी प्रमाणे केलेला एखाद दुसरा हल्ला नव्हता, या हल्ल्याच्या निम्मित्याने त्यांनी आमच्या समोर काही प्रश्न उभे केले आहेत. आमच्या अस्तित्वाचाच प्रश्नं त्यांनी निर्माण केला आहे, मग या सर्व प्रश्नांची उत्तरे कोण शोधणार.. एक भारतीय म्हणून आपले हे कर्तव्य नव्हे काय.

एक भारतीय म्हणून मी त्या पाकड्या अतिरेक्यांना सांगू इच्छितो, आम्ही कोणासही घाबरणार नाही, नव्हे तशी हिम्मत देखील कोणी करू नये. आज हि आमच्या डोळ्यासमोर आमचे निधड्या छातीने लढलेले आमचे करकरे, कामते, साळसकर, तुकाराम ओंम्बळें आणि मेजर उन्नीकृष्णन सारखे सर्व जवान एक प्रेरणा म्हणून उभे आहेत. ज्यांनी आपला देह आमच्या संरक्षणासाठी टेकवला त्यांचे शौर्य आज हि आमच्या डोळ्यासमोर आहे. जे आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत केवळ लढले त्यांच्या बलिदानाची शपथ घेऊन सांगतो कि आम्ही या दहशतवाद समोर कधी हि आमचे गुढगे टेकवणार नाहीत. या मातृभूमीवर चालून येणाऱ्या त्या प्रत्येकास मग तो कुठल्याही धर्माचा का असेना त्याला सर्व प्रथम आमच्या या हिम्मतीशी लढाई द्यावी लागणार.

आजच्या या दिवशी मी त्या लढलेल्या प्रत्येक जवानास हजारो वेळा सलाम करतो .. सलाम त्यांच्या राष्ट्रप्रेमाला.. सलाम त्यांच्या शौर्याला ....

पण आज देखील आम्ही फ़क़्त त्यांच्या आठवणीच काढणार का? ज्या प्रमाणे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे केवळ शासकीय उपक्रम होत चालले आहेत त्या प्रमाणे आमचे शासनकर्ते २६-११ च्या घटनेला देखील केवळ शासकीय कार्यक्रम म्हणूनच साजरा करणार आहेत का? आम्ही या सर्व गोष्टी मधून काही शिकणार नाहीत का ?
मी असा नाही म्हणत आहे कि शासनाने काहीच केले नाही, त्यांनी उचललेल्या त्या प्रत्येक सकारात्मक पावला बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार.
पण दुख होते जेव्हा हे ऐकण्यात येते कि हल्ल्यात बळी पडलेल्या काही सामान्य सैनिकांच्या घरी अजून हि शासकीय मदत पोचली नाही , शासनच्या मदतीसाठी त्यांच्या कुटुंबियांना सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत, हल्ल्यानंतर आश्वासनांचा पाऊस पडणारे आज त्यांच्या घरच्यांचे दोन अश्रू पुसतांनाही कधी दिसत नाहीत. शासन आपली जबाबदारी टाळत असेल तर त्याची त्यांना जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे, आमच्यातील प्रत्येकानं त्यांच्या कुटुंबाचा आधार बनून हि जबाबदारी घेतली पाहिजे. ज्यांनी आपले कुटुंब पणाला लावले त्यांची त्या कुटुंबाचा आम्ही हि एक घटक आहोत हि जाणीव त्यांच्या कुटुंबियाना झाली पाहिजे.
दुख वाटते ते याचे कि या घटनेला एक वर्ष उलटले तरी हि त्या शहिदांच्या नावाने एक हि स्मारक या महाराष्ट्र मध्ये उभे राहू नये याचे. ज्यांनी आपले रक्त या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सांडले त्यांना आम्ही अशी घोर उपेक्षा देणार का?
केवळ शासन आणि प्रशासनाला शिव्या घालून काही होणार आहे का, १०० कोटींच्या या देशामध्ये खरोखरच आमचे सुरक्षा रक्षक प्रत्येकाच्या जीवाची हमी देऊ शकणार आहेत का?

नाही .. नाही मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची आपली जबाबदारी आहे.. केवळ आठवणी मध्ये रंगून जाण्या पेक्षा हे सर्व प्रश्न आपण स्वतः शी केला पाहिजे ..

खर तर या १०० कोटी जनतेने स्वतः च एकत्र येऊन एकमेकांचे पर्यायाने राष्ट्राचे संरक्षण केले पाहिजे, तेव्हाच या देशावर आक्रमण करणार्यांचा खरा खुरा पराभव होईल.
आपल्या देशाच्या संरक्षणार्थ आपणच डोळ्यात तेल घालून खडे टाकले पाहिजे, आपस मधील वाद विसरून एक राष्ट्र- भारत राष्ट्र सुरक्षित ठेवले पाहिजे.

बाकी आमचा इतिहासच सर्वांना सांगून जातो कि या देशावर वाकडी नजर टाकणार्याला याच माती मध्ये गाडल्याशिवाय हि मायभूमी कधी शांत झाली नाही .. दोन ओळी मनामध्ये आल्या .. त्या इथेसांगतो, लक्षात ठेवा हरामखोर पाकड्यानो ...

"इतिहास आमचा शौर्याची खान

फ़क़्त वीर जन्मती हे तू जान
असतील हजारो कसाब जरी
पुरून उरेल
भारत मातेचा एकच जवान .. एकच जवान."

या २६-११ च्या निमित्त्याने शपथ घेऊया ...
आम्ही कुठल्याही अंतर-बाह्य दहशतवादाला बळी पडणार नाहीत.
या दहशतवादच बिमोड करण्यासाठी आमच्यातील प्रत्येक जन आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार .. आम्ही कधी हि हतबल होणार नाहीत.
या लढाई मध्ये लढणाऱ्या त्या सर्व सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही खंबीर पाने उभे राहू ..
आमच्या सुरक्षे साठी असलेले नियम. कायदे आम्ही नेहमी पाळणार.. त्यांचा आदर करणार.
आणि आम्ही सर्व जन आमची करडी नजर ठेवून या राष्ट्राची सुरक्षा करणार ...

चला सामील होऊया या लढाई मध्ये आणि करुया आपल्या दुश्मनाचा नायनाट....

या आतंकवादाच्या लढाई मध्ये शहीद झालेल्या त्या तमाम वीरांना माझे कोटी कोटी प्रणाम .. आणि श्रद्धांजली.

जय हिंद .. जय जवान .. जय किसान .....

अमोल सुरोशे

"शिवप्रताप दिन".

जय महाराष्ट्र !! असे म्हणतात की "इतिहास घडवनारी माणसे इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे कधीच इतिहास घडवू शकत नाहीत !!" जगाच्या पाठीवर कुठेही जा ,ज्यानी कुणाच ना कुणाचा आभिमान बाळगला आणि प्रेरणा घेतली तीच माणसे पुढे यशस्वी झाली. आमच्या कडे शिवाजी महाराजा सारखा इतका मोठा दिव्य स्त्रोत आसताना देखिल आम्ही आपयाशी ठरत आहोत ,तीच तीच संकटे येऊन सुद्धा का आम्ही त्याच्यावर मात करू शक्त नाहीत ? कारण आम्ही ईतिहसातून काही शिकत तर नाहीत उलट आमचा इतिहास आम्हीच विसरत चाललोय. थेट प्रश्न विचारतो येत्या २४ नोव्हेंबर 2009 ला काय आहे ? तुम्हा किती लोकाना ठावुक आहे ? आरे आम्हालाच माहीत नाही तर मग आम्ही पुढच्या पिढीला काय सांगणार ? आज महाराष्ट्रावर , देशावर पुन्हा पुन्हा आतेरेकी हल्ले होत आहेत...तरीही आम्ही मात्र ग्लानी आल्या सारखे शांत पडून आहोत निंचित निपचित. माझे घर , माझी गाडी आणि माझ्या बायकोची गोल गोल साडी यातच आम्ही मग्न. कुणाला काही देणे घेणे नाही. ३५० वर्षा पूर्वी 'अफझल खान' नावाचा एक आतेरेकी आला होता ( त्याची जात धर्म बाबत मी बोलत नाही. तो या मातीचा वैरी म्हणून आम्ह्चा वैरी) तेव्हाच सगळ संपले आसते. पण शिवरायानी ज्या हिमतीने त्याचा सामना केला त्यामुळे कुठे ते हिंदवी स्वराज्य टिकले. आम्हाला ही तसाच लढा द्यावा लागणार आहे. पण त्यासाठी आधी इतिहास आठवा आणि त्यातून काही शिका..."इतिहासाचे खच खळगे चाचपुनच आम्ही भविष्याची यशश्वी वाटचाल करू शकतो !!"

येत्या २४ नोव्हेंबर 2009 ला त्या प्रताप गडाच्या "अफझल खान" वध घटनेला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत....म्हणजे ३५० वा
"शिवप्रताप दिन". पण आमुक आमुक लोकांच्या भावना दुखातिल म्हणत आमचे सरकार त्याची आठवण देखिल काढनार नाही. पण तुम्ही आम्ही सर्व सामान्य माणसाने ते विसरून चालणार नाही.आपल्याला 'धर्मआंधपणा' आणि 'स्वाभीमान' यातला फरक समजून घेता आला पाहिजे. अन्यथा ते रक्त सांडलेले, जिव गमावलेले आपले पूर्वज आम्हाला कधी माफ़ करणार नाहित...!!

आता मी काही तुम्हाला "याचा द्वेष , त्याचा द्वेष करा हे म्हणत नाही.चिथावान्या द्या म्हणत नाही" उगी टी.व्ही. चैनल वाल्या सारखे कहिचे काही अर्थ काढू नका. पण निदान क्षण भर शिवराय आणि त्यांच्या त्या विरांच्या पराक्रमाची आठवण तरी करा. तेवढा तरी त्यांचा हक्क आहे ना तुमच्यावर ? जय शिवराय !!!

- श्याम वाढेकर

(खास आपना सर्वांसाठी आपल्या या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहोत, आता तुम्हीच विचार करा ॥ आणि क्षणभर स्मरण करा त्या युग्पुरुशाला ॥ माझ्या त्या शिवबाला ..... अमोल आणि प्रकाश )

Monday, November 23, 2009

"शिवप्रताप दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा


२४ नोव्हेंबर "शिवप्रताप दिन ", याच दिवशी या स्वराज्यावर आलेल्या संकटाला यमसदनी धाडण्याचे काम प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते.

आदिलशाही दरबारात शिवरायांचा कायमचा बिमोड करण्याचा विडा उचलून एक अफाट ताकदीचा सरदार अफजल खान स्वराज्यावर चालून आला. तमाम मराठी मुलुख त्याच्या अत्याचाराखाली होरपळून निघाला होता. त्या वेळी लढाई होती अन्यायाच्या विरोधात, ती नव्हती कुठल्याही धर्माच्या विरोधात.

स्वराज्यावर, आपल्या मायभूमीवर चालून आलेल्या या संकटास कसे सामोरे जावे याचे जिवंत आणि जातिवंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाचा केलेला वध.

आज जेव्हा आपली भारत भूमी सर्वत्र संकटांनी ग्रासली असतांना, सर्वत्र अतिरेक्यांनी आणि नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातलेला असताना आम्हाला आपला स्वार्थ विसरून आपलाच इतिहास पुन्हा एकदा आठवावा लागेल.

दोन दिवसांनी आम्ही पुन्हा एकदा गेल्या वर्षीच्या अतिरेकी हल्ल्याच्या आठवणी मध्ये रंगून जाणार, पण त्या आधी आपण त्या आमच्या आराध्य छत्रपतींना क्षणभर स्मरण करूया. आठवण करूया त्यांनी केलेल्या त्या पराक्रमाची, युक्ती आणि शक्तीने आलेले संकट दूर केल्याची. या भूमी वर चालून आलेल्या दुश्मनाचा कोथळा बाहेर काढल्या शिवाय पर्याय नाही कारण आपण हे केले नाही तर आपला केवळ विश्वास घातच होत राहणार.

आतंकवादाला आणि राष्ट्रादोहाला फ़क़्त एकाच प्रकारे उत्तर दिले जाऊ शकते.

आज त्याच अफजल खानाच्या उदात्तीकरणाचे प्रयत्न काही धर्मांध शक्तींद्वारे होत आहे, त्या जुलमी खानाचा धर्म आज काही लोकांना सांगितला जात आहे. या सर्व प्रकारावर राजकीय पोळी भाजण्याचे काम चालू आहे. पण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी हा राक्षसी प्रवृत्तीचा अफजल खान म्हणजे कोण्या एका धर्माचा नव्हता, न हि तो इस्लाम चा कोणी सुफी संत होता .. तो होता एक अन्याय करणारा .. आपल्या मायभूमीवर अत्याचार करणारा, आणि त्याचा सर्वनाश हा आतलाच होता. हि ऐतिहासिक घटना कुठल्याही एका धर्मासाठी अभिमानाची न राहता ती आपण सर्वांसाठी आणि आपल्या सारख्या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट असली पाहिजे.

याच खानाला आजच्या दिवशी सुमारे ३५० वर्षापूर्वी यमसदनी पाठवण्यात आले होते, स्मरण करूया त्या पराक्रमाची .. त्या प्रखर राष्ट्रनिष्ठेची.

आमचा इतिहास हाच आमचा आत्मा आहे त्याचे विस्मरण होता कामा नये. २६-११ च्या निमित्याने या पराक्रमची नुसती आठवण करून चालणार नाही तर या मातीवर चालून येणार्यांना इथेच गाडले पाहिजे हे हि आपण शिकले पाहिजे. आणि मला आत्मविश्वास आहे शिवचरित्र मधून आम्ही नक्कीच या गोष्टी शिकू, येणाऱ्या प्रत्येक संकटाला ध्येर्याने आणि सर्वशक्तीने सामोरे जाऊ.

आपण सर्वांना "शिवप्रताप दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा.

जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे

Thursday, November 19, 2009

‘स्टार माझा’ च्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभीनंदन

स्टार माझा च्या "ब्लॉग माझा" या स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा आज झाली.
सर्व प्रथम विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन, सर्व विजेते तथा सर्व स्पर्धकांचे देखील मी इथे आभार मानतो.

मराठी भाषा आणि मराठीचे संवर्धन या विषयावर बोलतांना मला आज खरच खूप आनंद होत आहे कारण या भाषेची गोडीच एवढी आहे कि या स्पर्धेच्या माध्यमातून कित्येक मराठी प्रेमी लोकांनी या इंटरनेट विश्व मध्ये आपल्या मराठीचा पताका अगदी मानाने फडकवला.

आम्ही नेहमी एक गोष्ट सांगत असतो कि, मागील पिढी हि वर्तमान पत्रे वाचून घडली, समाजामध्ये झालेल्या क्रांती मध्ये वृत्तपत्रे, मासिक यांचा मोठा सहभाग होता, त्याच प्रमाणे येणारी पिढी हि ब्लॉग वाचून घडणार आणि येणाऱ्या काळामध्ये एक नवीन क्रांती घडवण्याचे सामर्थ्य या ब्लॉग प्रकार मध्ये आहे. या स्पर्धेच्या निमित्त्याने खूप काही शिकायला भेटले, लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. आणि आपले विचार कसे हजारो लोकां पर्यंत पोचवता येतात हे हि कळले. त्या बद्दल स्टार माझा चे धन्यवाद. अश्या प्रकारच्या स्पर्धा नक्कीच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण ठरतील.

पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ... आणि घोषित निकाल इथे आपणा सर्वांसाठी टाकत आहे.

प्रथम तिन विजेते -
Aniket Samudra http://manatale.wordpress.com
Neeraja Patwardhan http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
Dipak Shinde http://bhunga.blogspot.com

उल्लेखनीय -
Hariprasad Bhalerao www.chhota-don.blogspot.com
Devdatta Ganar http://maajhianudini.blogspot.com/
Medha Sakpal www.medhasakpal.wordpress.com
Salil Chaudhary www.netbhet.com
Pramod Dev http://purvaanubhava.blogspot.com/
Raj Kumar Jain http://rajkiranjain.blogspot.com
Minanath Dhaske http://minanath.blogspot.com
Vijaysinh Holam http://policenama.blogspot.com
deepak kulkarni http://aschkaahitri.blogspot.com/
Anand Ghare http://anandghan.blogspot.com

सर्वांचे हार्दिक अभीनंदन


अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे पाटील

Friday, November 13, 2009

महाराष्ट्रातील राजकीय चक्रीवादळ .. फयान

विधानसभेच्या निवडणुका संपल्या ... मराठी मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा सरकारमध्ये बसवले, कुठलाही जोश - जल्लोष बाजूला ठेवून हे सरकार कसे बसे स्थापन झाले, मंत्रिमंडळ स्थापनेला लागलेला अक्षम्य वेळ आणि "खाते" वाटपासाठीचा घोळ .हे सर्व संपून . सरते शेवटी .. महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाली ...

पण यंदाच्या निवडनुकीमधून एक कीड या महाराष्ट्राच्या विधानसभेला लागली .. हि कीड होती मराठी द्वेषाची .. समाजामध्ये दुही माजवणारी एक विषवल्ली ... पहिलीच गरळ ओकण्यात आली ती मराठी मधून शपथ घेण्याची .. बर मान्य तुम्हाला मराठी येत नाही पण मी फ़क़्त हिंदीतूनच शपथ घेणार हा अट्टाहास कशासाठी ... ते ही सर्व प्रसार माध्यमांच्या समोर.

महाराष्ट्राच्या सुवर्णी महोत्सवी वर्ष मध्ये सर्व निवडून आलेल्या आमदारांनी जर मराठी मध्ये शपथ घेतली तर खरच हि सन्मानाची गोष्ट राहिली असती ,, पण हा बेताल वक्तव्य करणारा .. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी थोडेच या राजकारणामध्ये आला आहे..


हा केवळ महाराष्ट्र द्वेषापोटी हिंदी मधून शपथ घेण्याचा केलेला हट्ट होता ... खर तर महाराष्ट्रामध्ये मराठी साठी आग्रह धरावा लागतो हीच केवढी मोठी शोकांतिका .. वेळोवेळी संविधानाचा संदर्भ देऊन आम्हाला राष्ट्र निष्टा शिकवली जाते ते हि यांच्या सारख्या अतिरेक्यांशी सबंध असणाऱ्या राष्ट्रद्रोही माणसांकडून ...केवळ धर्माचा राजकारण करणारे , हे धार्मिक कट्टरतावादी म्हणजे राजकीय आतीरेकीच ... मग काय बिघडले या वृत्तीच्या कानाखाली मराठी आवाज काढला तर ..

आरे आमचा इतिहासच सांगतो कि आशाच धर्मवेड्या औरंगजेब..अफजल ..शायीस्तेखान ह्यांना ह्याच मराठी माती मध्ये पाणी पाजले गेले .. मग त्यांच्या ह्या औलादीला जर मराठी हिसका दाखवला तर बिघडले कुठे.

मराठी माणसाचा आपमान करणाऱ्या किंवा मराठीचा द्वेष करणाऱ्या या वृत्तीच्या विरोधात काढलेला हा आवाज सबंध महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानमध्ये गेला असेल यात कसलीही शंका नाही.

मला मान्य आहे विधानसभेचे पावित्र्य .. पण खर सांगा खरच तिथे गेलेले सगळे काय पवित्र आहेत का .. मग जर अशी घाण साफ करायची असल्यास आपले हि थोडेसे हात खराब होणारच ना .. मग तेच झाला .. झाली आमची हि थोडी चूक .... झाले आमचे पण हात खराब .. पण हि महाराष्ट्राला लागलेली घाण बाजूला तर सारली गेली .

कालपर्यंत उर्दूला राजभाषेचा दर्जा द्या म्हणणारे आणि अचानक हिंदी प्रेम उफाळून आलेले आज मराठी शिकण्याची तयारी दाखवत आहेत .. मराठी भाषा म्हणजे माझ्या आई प्रमाणे हे बोलत आहेत .. मराठीच्या शिकवण्या लावल्या जात आहेत .. हे सर्व जर एकदा कानाखाली आवाज काढून त्यांना उमजत असेल तर काय हरकत आहे.

खर तर महाराष्ट्रामध्ये हि परिस्थती उद्भवणे हेच आमचे दुर्दैव म्हणावा लागेल, पण आता तरी सर्वांनी लोकेच्छा समजून घेऊन आता तरी मराठी चे संवर्धन केले पाहिजे .. पक्ष कोणताही असो हे सार्यांचेच कर्तव्य आहे .. ते सर्वांनी पार पाडलेच पाहिजे .. मग कोणी हि आमच्या भावनेचा असा अनादर करू शकणार नाही.

चार ओळी मराठी मध्ये बोलण्याची ज्यांची मानसिक तयारी नाही असल्या प्रवृत्तीला वेळीच ठेचले नाही तर हि कीड संपूर्ण महाराष्ट्र समाज पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हा कानाखाली काढलेला आवाज कुठल्याही प्रकारे दबू ना देता संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवला पाहिजे.. मराठी चा द्वेष करणार्यांनो सावधान .. एकदा का हा मराठी माणूस पेटला ना .. ह्याला विझवता विझवता सर्व काही जळून खाक होईल ... ते होऊ देऊ नका ,, या मराठी संस्कृतीने सर्वांनाच खूप प्रेमाने स्वीकारले आहे, मग तुम्ही हि या मराठी संस्कृतीचा स्वीकार हा केलाच पाहिजे ,, त्या शिवाय तरणोपाय नाही ...

शेवटी त्या दोन ओळी आठवतात ..

असंख्य पाहुणे पोसते मराठी .. शेवटी मद्यांध तख्त फोडते मराठी

जय महाराष्ट्र ........ जय भारत

एक मराठी माणूस ..