Monday, October 13, 2008

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे... Ek bedhadak mulakhat

११ कोटींच्या महाराष्ट्रात ९ कोटी मराठी माणसांना गृहित धरलं जातं आणि २ कोटी परप्रांतियांना चोंबाळलं जातं... हा काय प्रकार आहे ? माझ्या आंदोलनानंतर मराठी माणूस छाती बाहेर काढून चालायला लागलाय. त्यामुळे इतरांची फाटली आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मटा डॉट कॉम ला बिनधास्त , बेधडक मुलाखत देताना बोलत होते. आतापर्यंत फक्त टिझर्स आणि ट्रेलर्स पाहिलेत... पुढे बघा आणखी कसे धक्के देतो ते... असा खणखणीत इशाराही त्यांनी भय्यांना दिला.

राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील आपल्या निवासस्थानी मटा ऑनलाइन टीमशी तब्बल दोन तास मनसोक्त संवाद साधला. कसलाही आडपडदा न ठेवता... तोही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरीला साक्षी ठेवून... निमित्त होते एनआरएम डे चे.. ! जगभर आपल्या कर्तृत्वाची पताका फडकावणा-या नॉन रेसिडेंट महाराष्ट्रीयांच्या सन्मानाचा हा दिवस. यंदाच्या वर्षी वाचकांच्या मनातील प्रश्न आम्ही थेट राज ठाकरे यांना विचारले आणि त्यांनीही नेटीझन्सच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

* पेइंग गेस्ट म्हणून यायचं आणि...
मुंबईचं सोडा , विदर्भ-मराठवाड्यातही मराठी माणसांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ग्रामीण भागातही भय्यांचे लोंढे घुसतायत. मराठी माणसाला असुरक्षित वाटतंय. राज्यकर्तेही मराठींना गृहित धरत आहेत. मुंबई महाराष्ट्रात आहे , पण मुंबईत महाराष्ट्र नाही , हे वसंतदादा पाटलांचे वाक्य मला आजही टोचतं. मुंबई मराठी माणसाच्या हातातून चाललीय , अशी ओरड होतेय. परप्रांतातून आलेली माणसं मुंबई-महाराष्ट्राचं भवितव्य ठरवू लागलीत. त्यांना हा अधिकार दिला कुणी ? तुमच्यात एवढीच हिंमत आहे तर आपापल्या गावी मुंबई करुन दाखवा ना... इकडे कशाला येता ? पेइंग गेस्ट म्हणून यायचं आणि घरावर हक्क सांगायचा , हे चालणार नाही , असे राज ठाकरे यांनी यावेळी खडसावलं.

* चुकांमधूनच माणूस शिकतो...
शिवसेनेनेही आधी मराठीचाच मुद्दा हाती घेतला होता. नंतर सोडून दिला. तुम्ही तसे करणार नाही , याची काय खात्री ? या प्रश्नावर चुकांमधून माणूस काही शिकतो की नाही ? असा प्रतिसवाल त्यांनी केला. शिवसेनेत असतानाही मराठीचा मुद्दा लावून धरला होता. यापुढेही हा मुद्दा सोडणार नाही , असे त्यांनी स्पष्ट केले. जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ मारा , असे माझे तमाम मराठी माणसांना सांगणे आहे. प्रत्येक ठिकाणी माझी लाथ पोहोचू शकणार नाही , असे ते म्हणाले. मुंबईत काही ठिकाणी जैनांच्या शाकाहारी सोसायट्या होतात. त्याठिकाणी इतरांना राहण्यास मज्जाव केला जातो , याकडे लक्ष वेधले असता , ते चुकीचेच आहे. जाणीवपूर्वक त्या गोष्टी केल्या जातात. भाजपसारखे पक्ष त्यांना पाठिंबा देतात. हे सगळं मोडून काढलं पाहिजे. शाळा-कॉलेज उभारण्यासाठी सरकारी जमिनी घ्यायच्या आणि नंतर आम्ही मायनॉरिटीसाठी कॉलेज चालवतोय , असं सांगायचं. हे थांबलं पाहिजे. याविरोधात मनसे आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही , असे त्यांनी सांगितले.

* माझी दारं-खिडक्या बंद नाहीत !
आगामी निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दाच मनसेच्या अजेंड्यावर असेल , असे सांगताना राज म्हणाले की , महाराष्ट्राच्या राजकारणात मराठीचा मुद्दा सर्व राजकीय पक्षांनी अस्पृश्य ठरवला आहे. अशा परिस्थितीत मी कुठल्यातरी युतीचा किंवा आघाडीचा विचार करून निवडणूक लढवायची , याची मला आवश्यकता वाटत नाही. कोणी जर माझ्याकडे स्वतःहून आले तर माझी दारं-खिडक्या बंद नाहीत. पण मी स्वतःहून कुठेही जाणार नाही. काही लोकांना वाटेल की मी एरोगंट आहे. प्रश्न असा आहे , मी जे करायला पाहतो आहे , ती जर भूमिका तुम्हांला पटली तर तुम्ही या!. पण तुम्ही तुमचं मराठीचं बाजूला ठेवा , तर आम्ही बरोबर येतो. तर मी म्हणेन तुम्हांला जे काही करायचं ते करा. मी तुमच्याबरोबर येणार नाही.

* इन्स्टंट कॉफीच्या मागे लागणार नाही !
काँग्रेसला सव्वाशे वर्षे झाली , जनसंघ आणि भाजपाला ६०-६५ वर्षे झाली. शिवसेनेला ४५ , आणखी राष्ट्रवादीला काय १० वर्षे झाली असतील. त्या राष्ट्रवादीला मी पक्षच मानत नाही. निवडून येणा-या माणसांची बांधलेली मोळी आहे ती! या लोकांना ख-या अर्थाने यश कधी मिळालं. २५ - ३० वर्षांनी! माझ्याकडून तुम्ही दोन-अडीच वर्षात यशाची अपेक्षा बाळगताय. यश आलं तर कोणाला नको आहे. पण याचा अर्थ मी काहीतरी इन्स्टंट कॉफी च्या मागे लागलो नाही , अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मनसेच्या आगामी निवडणुकांतील यशापयशाचा हिशेब मांडला.

* ‘ स्पाइनलेस पॉलिटिशियन ची डिश
सध्याचे राज्यकर्ते पपेट आहेत. बोनलेस चिकनप्रमाणे स्पाइनलेस पॉलिटिशियन नावाची डिश सध्या भारतीय राजकारणात फेमस आहे. मणके काढून ठेऊनच हे राजकारण करतात. अशी माणसे कोणत्याही मुद्यावर भूमिकाच घेऊ शकत नाहीत. तुमची हुकमत आहे ना , मग लाचार कसे होता ? मराठी माणसे मुंबईतून हद्दपार करण्याच्या योजना तुमच्या डोक्यात येतातच कशा ? एक बिहारचा खासदार संसदेत मराठी लोकांना सडक्या मेंदूची माणसं म्हणतो आणि महाराष्ट्रातील लोकसभेचे ४८ खासदार त्याबद्दल चकार शब्द उच्चारत नाहीत. करायचंय काय अशा खासदारांना दिल्लीला पाठवून ? अशी व्यथाही त्यांनी बोलून दाखवली.

7 comments:

Unknown said...

ek dam jakas
raj saheb tum age bhado hum thumare sath hai

Unknown said...

ek dam jakas
raj saheb tum age bhado hum thumare sath hai

Anonymous said...

rahul shinde
Raj thakare aap aaye to maharastara fir se shaktishali ho jayega

Anonymous said...

rahul shinde
Raj thakare aap aaye to maharastara fir se shaktishali ho jayega

प्रकाश बा. पिंपळे said...

Mitra rahul,
Manya ahe raj thakare apale prashna sodavatil. pan apan kahi nako ka karyala? tyanchyat vision ahe ani at takad suddha.apan sagalyani kamit kami lokat jagriti karayala ahavi ani raj thakare kinva mag itar kunihi kahi chnagal bolat asel vikasa bddala bolat asel tar tyal purn apathimba dyala hava. aapal pathimba 'vyaktila' nako vicharana hawa!
jai maharashtra.

kiran said...

RAJ THAKARE KAKA AMHI SARV MARATHI TUMACHYA SANGAT AHOT MI MARATHI ASALYACHA MALA GARV AHE PAN EK SANGATE JITHE BAGHAVE TITHE ENGLISHALA LOK DEMAND DET AHET AMHI MARATHI MEDIUM MADHYE SHIKALO AHE PLZ AMACH KAHITARI KARANA AAJ JITHE BAGHAVE TITHE MARATHICHI KHILLI UDAVILI JAT AHE PLEASE HYA MOTHYA COMPANY MADHYE FAKT ENGLISH LACH DEMAND AHE KAHITARI KARA. AMACHYA MARATHI VIDYARTHANSATHI PLZ

kiran said...

PLZ KAHITARI KARA HA MARATHI MATICHA PRASHNA AHE JEVADHE ENGLISHALA DEMAND AHE TEVDHECH MARATHILA HI RAHUDYAT.

Post a Comment